02/07/2023
आज माझ्याकडे तेरा वर्षांपूर्वीची नित्या नावाची मुलगी आली. तिचे निदान 2010 मध्ये सेरेब्रल पाल्सी, hypoxic ischemic injury , असे होते मी ज्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकलो त्या कॉलेजमधील HOD Dr Banigol सरांनी माझ्याकडे पाठवले होते. ज्यावेळेस ती माझ्याकडे आली होती त्यावेळेस तिचे दोन्ही पाय वाकडे होते तिच्या हातांची हालचाल अतिशय कमी होती, तोंडातून लाळ गळत होती, मतिमंद आणि गतिमंद अशी दोन्ही सर्व लक्षण तिच्यामध्ये आढळून आली. आम्ही पूर्ण आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू केली शतायू आयुर्वेद आणि रिसर्च सेंटर मध्ये सोलापूर येथे सुरुवातीला हा पेशंट महिन्यातून एकदा माझ्याकडे येत होता. त्यानंतर आम्ही तीन महिन्यातून एकदा त्यांना पाहिलं ,आणि नित्या आली त्यावेळेस तीन वर्षाची होती फक्त, आज ती 16 वर्षाची आहे. आज ती पूर्णपणे चालू शकते बोलू शकते शाळेत ही जाते आज डॉक्टर दिनाच्या निमित्त नित्या आणि तिचे आई वडील शुभेच्छा देण्यासाठी हुबळी वरून सोलापूरला आले होते. वैद्यकीय व्यवसाय करत असताना अनेक डॉक्टरांना अनेक रुग्ण वेगवेगळ्या पद्धतीने आशीर्वाद सदिच्छा देत असतात. मला आज डॉक्टर झाल्याचा प्रचंड आनंद होत आहे आणि जबाबदारी वाढली आहे याची जाणीव ही होत आहे.कारण तिच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आई-वडिलांच्या डोळ्यातील आनंद अश्रू याचा संगम आज मी पाहिला. माझे डोळे भरून आले आमच्या धन्वंतरीला मी धन्यवाद देतो .मला असं काम करण्यासाठी लोकांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणण्यासाठी ज्ञान आणि शक्ती दिली. त्याबद्दल मी धन्वंतरी चरणी नतमस्तक आहे आमच्या सेंटरमध्ये अनेक असे रुग्ण बरे होऊन जातात. पण काही रुग्ण ऋणानुबंध निर्माण करतात आणि डोळ्याची कड ओली करून जातात.
Dr Vyawahare
Remedi Polyclinic
Pune