Dr. Nitin Londhe

Dr. Nitin Londhe "Om Yoga" gives the knowledge of "yog" and how to practice it in day to day life healthy Dr. Nitin Londhe Yoga.

Like & subscribe my youtube channel regarding healthy moves by ।।OM YOGA।।. https://youtube.com/channel/UC19pVaaa25VWd5UVTZTFyng

27/10/2025

The movements that reduces the fat belly, the circumference of the abdomen and also increase appetite with digestion.

22/10/2025

लक्ष्मीपूजन ..
🪔दीपावली🪔

सण  #दीपावलीचा..दारी दिव्यांची आरास,अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,आनंद बहरलेला सर्वत्र,आणि हर्षलेले मन,आला आला दिवाळी ...
20/10/2025

सण #दीपावलीचा..

दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण..

🪔 🪔

डॉ. #नितीन_शिवराम_लोंढे.
(Expert in preventive medicine, life style modification, meditation and yoga therapy)
(जनशिल हॉस्पीटल, नेहरूनगर, पिंपरी)

18/10/2025

आरोग्य देवता,
#धन्वंतरी_जयंती 🙏🪔
या धन्वंतरी पूजन वेळी माझ्या सर्व आप्तेष्ट, मित्र, लहानथोर यांच्या आरोग्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

धनतेरस पूजा.साई प्लाझा.
18/10/2025

धनतेरस पूजा.
साई प्लाझा.

 #शरीर व  #मनस्वास्थ्य...@ #शांतता,  #समाधान व  #आनंदी_वृत्ती या त्रयस्तंभावरती शरीर व मनाचं निकोप पोषण व स्वास्थ्य अवलं...
14/10/2025

#शरीर व #मनस्वास्थ्य...

@ #शांतता, #समाधान व #आनंदी_वृत्ती या त्रयस्तंभावरती शरीर व मनाचं निकोप पोषण व स्वास्थ्य अवलंबून असते.
@चंचलता, असमाधानी व दुःखी वृत्ती या शरीर व मनाला हळुवारपणे पोखरत हानी करत असतात.

या अनुषंगाने कृती व विचार यामधला सकारात्मक व संस्कारक्षम बदल हा या त्रयस्तंभाची पहिली पायरी हवी. म्हणजे पुढील डोळ्यादेखत होणारी विनाकारणची व नकळ्तची हानी टाळता येऊ शकते.
मग त्यासाठी उसनं अवसानही कधी कधी खूप उपयोगी पडते.

13/10/2025

#प्रभाग_क्रमांक_९
(पिंपरी चिंचवड महानगरपालिका)
नेहरूनगर, विठ्ठलनगर, यशवंतनगर, स्वप्ननगरी, अंतरीक्ष कॉलनी, उद्यमनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा कॉलनी, महिंद्रा रॉयल, महिंद्रा अंथेनिया, कामगारनगर, खराळवाडी, गांधीनगर इ.

विकासासाठी कायम कटिबद्ध.
#आपला_प्रभाग_आपली_जबाबदारी.

-डॉ. #वैशाली_घोडेकर_लोंढे
(मा. महापौर, मा. नगरसेविका)

  🎂🥰
05/10/2025

🎂🥰

काही  #चॅलेंजेस.. सातत्य.@वर्तमानात राहुन काम करणं.@भूतकाळ व भविष्यकाळ यांचा वर्तमानासाठी शिताफीनं वापर करणं.@स्वभावानुर...
04/10/2025

काही #चॅलेंजेस.. सातत्य.
@वर्तमानात राहुन काम करणं.
@भूतकाळ व भविष्यकाळ यांचा वर्तमानासाठी शिताफीनं वापर करणं.
@स्वभावानुरुप आयुष्याला सजवणं.
@नवीन काही सूचणं आणि ते अमलात आणणं.
@आत्मपरीक्षणाणं स्वतःतलं चांगलं वाईट शोधून त्यानुरूप ध्येय निश्चित करणं.
@स्क्रीनचा वाढता वापर कमी करणं.
@जगण्याचा आभास की आभासी जगणं हे सोडून खऱ्याखुऱ्या जीवनाचा आनंद घेणं..

 #जागतीक_हृदय_दिन... 🤗❣️  हृदय हे प्रेम, करुणा, माया, दया, क्षमाशीलता यांचं प्रतिक. त्याचं रक्षण हे संपूर्ण शरीर स्वास्थ...
29/09/2025

#जागतीक_हृदय_दिन... 🤗❣️
हृदय हे प्रेम, करुणा, माया, दया, क्षमाशीलता यांचं प्रतिक. त्याचं रक्षण हे संपूर्ण शरीर स्वास्थ्याचं आद्य आहे. कारण पूर्वी हृदय विकार पन्नशीच्यापुढे दिसून येत. आता विशी तिशी मध्येच वेगेवेगळ्या प्रकारचे हृदय विकार आढळून येत आहे.
#महत्त्वाची_कारणे. शारीरिक निष्क्रियता, बैठी जीवनशैली. मनावरील वाढणारा ताण. नैसर्गिक आहाराच्या ऐवजी इन्स्टंट जंक फूडची सवय. व्यसने दारू, धूम्रपान ड्रग्स इ. अती वापर. झोप व मनाची शांती नाही. व्यायामाचा अभाव इ.
#लक्षणे छातीत दुखणे, डाव्या हाताकडे दुखणं जाणे, दम लागणे. छातीत जड व धडधड होणे, जखडल्यासरखे, ओढल्यासारखे वाटणे, अचानक घाम, हाताला मुंग्या येणं इ.
#काळजी वेगवेगळ्या स्वरूपात हालचाली व व्यायाम करणे, नैसर्गिक व वेळेवर आहार, पालेभाज्या, फळभाज्या, सुकामेवा इ. व्यसनं कमी करत पूर्णतः बंद करणे. मेडीटेशन, प्राणायाम, ध्यान, धारणा योगा इ. चा अवलंबन करुन मानसिक ताण तणावाचे नियोजन करणे.
- डॉ. #डॉ_नितिन_शिवराम_लोंढे
(जनशील हॉस्पिटल, ओम योगा सेंटर)

 ,  ,  ..  नकारात्मकता, मनाचे खचलेपण, काहीच करावेसे न वाटणे, सर्व काही मिथ्या वाटणे इ. इ.  अशी स्थिती का निर्माण होते? क...
20/09/2025

, , ..
नकारात्मकता, मनाचे खचलेपण, काहीच करावेसे न वाटणे, सर्व काही मिथ्या वाटणे इ. इ.
अशी स्थिती का निर्माण होते?
का? त्याची कारणे? कारणमीमांसा. लक्षणे, उपाय आणि पुन्हा होऊ नये म्हणून उपाय.
#कारणं अधिक विचार करणं. परिणामांचा नकारात्मकतेच्या दृष्टीने विचार अधिक. स्वतःच्या सक्षमतेवर नकारात्मक दृष्ट्या शंका घेणे. स्वतःवर विश्र्वास कमी. प्रयत्न कमी पडणं. वेळेचं नियोजन नाही; मनापासून नाही. आखणी नाही. इतर विषयांवर लक्ष्य भटकटने. वेळेचा अपव्यय वेळ निघून गेल्यावर त्याबद्दल खंत. खचणे, इ. इ.
#लक्षणं डोकं दुखणं, जड पडणं, धडधड, थकवा, झोप कमी; आलीच तरी शांत नाही. विविध विचारांचा डोक्यात कल्लोळ. इतरांशी संवाद नाही. चिडचिड वा अश्रू गाळणं (स्वभाव अनुरूप) हाता पायांना मुंग्या, दम लागणे, एकटं राहावसं वाटणे, आवाज सहन न होणं इ शारीरिक व मानसिक लक्षणं.
#उपाय सकारात्मकता विचार जाणून बुजून. सकारात्मक व्यक्तींशी संवाद. संबंध. पुस्तकं वाचणे, पाहणे, लिखाण, छंद वा वेळेचं नियोजन, आखणी, टार्गेट, पेपर वर्क टिपण इ.
टिव्ही मोबाईल इ गोष्टींचा वापर आपल्या अंतिम विषयासंदर्भात च करणे मनोरंजन व वेळेचा अपव्यय याला आळा घालणं शारीरिक व्यायाम, योगासने इ. मानसिक व्यायाम ध्यान, मेडीटेशन एकाग्रतेसाठी खोल श्वास, शवासन, ध्यान sitting भजन, पूजन, कीर्तन, (स्वभावानुसार) शून्यात राहणं, व्यापक दृष्टिकोन ठेवणे, निसर्गातील प्रवास व सहवास इ.
- डॉ. #वैशाली_घोडेकर_लोंढे
(मा. महापौर, नगरसेविका,
जनशील हॉस्पिटल)

Address

Janshil Hospital, Old Telco Road, Nehrunagar, Pimpri
Pune
411018

Telephone

+919423583111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Nitin Londhe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Nitin Londhe:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category