Dr. S.Abdul Rauf Care Clinic

Dr. S.Abdul Rauf Care Clinic होमिओपॅथिक उपचार :- ब्लडप्रेशर, शुगर त?

08/01/2022

#मोफत_शिबीर

मोफत सर्व रोग निदान शिबीर
29/12/2021

मोफत सर्व रोग निदान शिबीर

08/06/2021
काळजी घ्या, पथ्य पाळा ....घाबरून जाण्याचं कारण नाही 👍👍👍
08/02/2020

काळजी घ्या, पथ्य पाळा ....घाबरून जाण्याचं कारण नाही 👍👍👍

08/02/2020

This is Dr Jagdish (an ent surgeon & a Stand up Comedian) on Corona virus :- Hilarious at the same time informative

😃😃

31/07/2019

Nice 😊👍

26/04/2019

वस्तुस्थिती -
डॉक्टरने आपल्याला फुकट तपासावे किंवा फुकट उपचार द्यावे असं आपल्याला का वाटतं?
तो तुम्हाला तुमचा हक्क वाटतो की ती डॉक्टरची ड्युटी वाटते?

डॉक्टरांकडून मोफत अथवा माफक दरात सेवेची अपेक्षा ठेवणाऱ्या समाजाच्या कोणत्या घटकाने त्यांचीपण सेवा ऐच्छिक ठेवली आहे?

उदा. आयटीवाले, बँकर्स, इंजिनिअर,वकील, कापडदुकानदार, बेकरी, पुस्तक दुकानदार, शोरूम, मॉलवाले किंवा इतरही किती लोक सामाजिक बांधिलकी जोपासत सवलतीच्या दरात वा मोफत सेवा देतात?

"सेवा" या शब्दाचे दोन अर्थ होतात. पहिला म्हणजे, गरिबांची, दिन दुबळ्यांची वगैरे.. हि सेवा मानवतावादी असते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ती 'केली' जाते.

दुसरी सेवा म्हणजे, अर्थव्यवस्थेच्या सेवा.. कृषी, उद्योग, वैद्यकीय इ.
इथे सेवा 'केली' जात नाही, तर 'दिली' जाते, पुरविली जाते. अर्थातच योग्य तो मोबदला घेऊन..

वैद्यकीय सेवा हि दुसऱ्या प्रकारातली सेवा आहे.

वैद्यक व्यवसाय हा अर्थव्यवस्थेच्या सेवा क्षेत्रातील एक 'व्यवसाय'आहे. कुठलीही वस्तू किंवा सेवा फुकट मिळत नाही, तर त्यासाठी मोबदला द्यावा लागतो, म्हणून वैद्यकीय सेवा देखील फुकट मिळणार नाही हे समाजाला अजून पटतच नाहीये. गोची इथेच होते. सेवांच्या या दोन प्रकारांमध्ये गल्लत होते. आणि हि गोची समाजात, सरकारमध्ये, आणि वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांमध्ये पण पाहायला मिळते..

कुठलाही इंजिनिअर समाजासाठी डिजाईन्स फ्री बनवून देत नाही (अगदी म्हातारपणात सुद्धा..), वकील कुणाचंही सरसकट फ्री कन्सल्टेशन करत नाही, सीए समाजातील कोणाचेही फ्री मध्ये ऑडिट करून देत नाहीत, शिक्षक रिटायर झाल्यावरसुद्धा फ्री क्लासेस घेत नाहीत..

मग डॉक्टरकडूनच समाज अशी अपेक्षा का करत असावा बरं..?

बर.. समाज डॉक्टरला कोणत्या गोष्टी मोफत अथवा कमी रेट ने देतो..?
समोरचा डॉक्टर आहे म्हणून, एखादा वकील त्याच्याकडून कमी फी घेतो का? एखादा जागा कमी भावात डॉक्टरला विकतो का? एखादा फ्लॅट किंवा हॉस्पिटलचे कमी भाडे घेतो का? एखादा त्याच्या मुलाला फ्री शिकवतो का? एखादी शाळा कमी फिस घेते का? एखादा दुकानदार ना नफा ना तोटा दराने वस्तू विकतो का? एखादा शेतकरी डॉक्टरला कमी दरात धान्य किंवा भाजी विकतो का?

मग डॉक्टरने कमी दरात समाजाला उपचार द्यावेत ही अपेक्षा समाज का बाळगून असतो..?

उलट, समोरचा डॉक्टर आहे असं समजल्यावर वकीलापासून प्लम्बर पर्यंत सगळे त्याच्याकडून फी जास्त घेतात.. डॉक्टर आहे म्हणलं की जागेचा भाव पण त्याच्यासाठी जास्त असतो..

डॉक्टरांना सेवा करण्याचे डोस पाजणारे सरकार डॉक्टरांना वीज, पाणी, जागा, वाहतूक, मशिनरी यातल्या कुठल्या गोष्टीत कन्सेशन तर देत नाहीच, पण उलट "ग्राहक संरक्षण कायद्यात" हा व्यवसाय आणून सगळाच घोळ घालून ठेवते..

समाजात एकंच गोष्ट वेगवेगळ्या दर्जाची मिळत असते.. पैसे देऊन आपल्याला जास्त दर्जाच्या सेवा घेता येतात.. चहा पाच रुपयाला पण मिळतो, आणि पाचशे रुपयाला पण मिळतो..! आपण आपल्या शौकनुसार आणि खिशानुसार ठरवायचे की टपरीवरचा प्यायचा की ताज मधला प्यायचा..

ताजला चहा पिऊन तुम्ही ओरड करू शकत नाहीत की आम्हाला लुटले म्हणून..
तसंच, ब्रीचकँडी किंवा रुबी मध्ये जाऊन तुम्ही ओरड करू शकत नाही की आम्हाला लुटले म्हणून..

कुठल्याही ठिकाणी संभाव्य बिलाची साधारण पूर्वकल्पना देतात.. तुमच्या खिशाला परवडत नसेल तर जाऊ नका.. इतकं साधं गणित आहे..!

जसं स्वतःच हायफाय हॉस्पिटलमध्ये जाऊन, आपल्याला लुटल्याची तक्रार करू नये, तसंच, छोट्या आणि कमी दरात सेवा पुरविणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन हायफाय अपेक्षाही करू नये..

सरकारी हॉस्पिटलमध्ये अगदी पाच रुपयांत कसलेही ऑपरेशन होते.. इतरही सेवाभावी संस्था आणि ट्रस्टची अनेक हॉस्पिटल अत्यल्प दरात उपचार देतात..

डॉक्टरांच्या अनुभवानुसार किंवा उपलब्ध सोयीसुविधांनुसार खाजगी हॉस्पिटलचे दर ही कमी अधिक असतात.. त्यानुसार आपल्याला निवड करता येते..

पण लोकांना डॉक्टरही अनुभवी आणि बेस्ट पाहिजे असतो.. तो सहज आणि हवा तेंव्हा उपलब्धही पाहिजे असतो.. हॉस्पिटलमध्ये एसी पासून गरम पाण्यापर्यंत आणि नर्सपासून स्वीपरपर्यंत सगळ्या सोयी अपटुडेट हव्या असतात.. सगळ्या मशिनरी आणि तपासण्यांच्या सोयी एकत्र पाहिजे असतात.. आणि बिल मात्र कमी पाहिजे असतं..!!
कसं जुळणार हे गणित.?

सरकारी नॉर्मस् प्रमाणे हॉस्पिटल बांधायचे, सरकारी नॉर्मस् प्रमाणे स्टाफ आणि मशिनरी ठेवायच्या म्हणलं तर उपचाराचा खर्च किती जातो, याची काहीही कल्पना जनसामान्याला नसते.. आणि त्यांना हे समजून घ्यायची इच्छाही नसते..

असो..

डोक्याला जास्त ताण देऊ नका..
या सगळ्याची उत्तरे तुम्हाला माहिती आहेत, पण तरी पण "डॉक्टरने समाजाचा विचार करून सेवाच केली पाहिजे", हे तुमचे पालुपद कायम राहणार आहे हे ही मला माहिती आहे..

पण निदान एक कृपा तरी करा..
एखाद्या डॉक्टरला सेवाव्रती व्हावं वाटलं तर तो त्याचा वैयक्तिक दृष्टिकोन आहे.. पण म्हणून इतर डॉक्टर लुटारू किंवा कमी दर्जाचे ठरवू नका..

धन्यवाद....

forwarded post...

Address

Nagpur Chawl, Yerawada, Pune/06
Pune
411006

Opening Hours

Monday 10am - 2pm
5pm - 10pm
Tuesday 10am - 2pm
5pm - 10pm
Wednesday 10am - 2pm
5pm - 10pm
Thursday 10am - 2pm
5pm - 10pm
Friday 10am - 2pm
5pm - 10pm
Saturday 10am - 2pm
5pm - 10pm
Sunday 7pm - 10pm

Telephone

+91 81491 41302

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. S.Abdul Rauf Care Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram