23/10/2025
******गप्पांगण *******
निळू फुले नाट्यकला अकॅडमी पुणे आणि रोटरी क्लब पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात "हृदयविकार" या विषयावर माझे व्याख्यान संपन्न झाले.
खरे तर हा गप्पांचा कार्यक्रम असल्यामुळे सुरुवातीच्या व्याख्यानानंतर प्रश्नउत्तरांचा अर्थात गप्पांचा कार्यक्रम खूपच रंगतदार झाला. विविध प्रकारचे हृदयविकार आणि त्याच्यावरील विविध उपचार याबद्दल लोकांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आणि शंका असतात,
हृदयविकारांसाठी केले जाणारे ओपन हार्ट सर्जरी म्हणजेच ऑपरेशन्स नेमकी का करावी? आणि केव्हा करावी? कशासाठी करावी? ऑपरेशन्स वाचवता येतात का?
अनेक वेळा आपणाला ओपन हार्ट सर्जरी अर्थात हृदयरोगाची ऑपरेशन्स आयुर्वेदिक उपचारांनी वाचवता येतात असा माझा स्वतःचा अनेक वर्षाचा आणि माझ्या हजारो रुग्णांचा असलेला अनुभवाच्या आधारावर याबद्दल विस्ताराने शास्त्राला धरून गप्पा झाल्या. उपस्थित प्रेक्षकांना छान माहिती मिळाली असे एकंदरीत त्यांच्या नंतरच्या प्रतिक्रियांवरून स्पष्टपणे जाणवले.....
कार्यक्रम खूपच रंगतदार झाला.....
सदर कार्यक्रमाला निळू फुले नाट्यकला अकॅडमीचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी सभासद आणि रोटरी क्लब पुणे बावधन प्रेसिडेंट सेक्रेटरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.