Books by Hypnotist Manohar Naik

Books by Hypnotist Manohar Naik Books written by Famous Hypnotist Manohar Naik

subjective to Hypnotism & self Hypnosis course, Psychology, Hypnotherapy, Yoga, Healing therapy and Science

Books written On various subjects by Famous Hypnotist Manohar Naik,
specially on Hypnotherapy, Psychology, Yoga, Self Hypnosis, Healing therapies.


-hypnosis



Power of Hypnosis
16/07/2025

Power of Hypnosis

*स्पर्धा परीक्षा व हिप्नोसिस* *स्पर्धा परीक्षा*.. प्रशासकीय पदाची, उच्च . शासकीय व निम शासकीय अधिकार पदाच्या नोकरीची स्व...
12/07/2025

*स्पर्धा परीक्षा व हिप्नोसिस*

*स्पर्धा परीक्षा*.. प्रशासकीय पदाची, उच्च . शासकीय व निम शासकीय अधिकार पदाच्या नोकरीची स्वप्न पाहणाऱ्या लाखो मुलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा..
स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणं व शालेय व महाविद्यालयीन परीक्षांमध्ये यश संपादन करणे हे दोन्ही अगदी भिन्न प्रकार आहे.

कारण स्पर्धा परीक्षेमध्ये केवळ पास होऊन भागत नाही किंवा चांगले मार्क मिळून सुद्धा भागत नाही तर आवश्यक पदांच्या संख्येमध्ये तुम्ही टॉप केलेले असावे लागतं तरच तुम्हाला पद मिळण्याची निश्चितता असू शकते..

त्यामुळे थोडक्यात मुलं मनापासून प्रयत्न करतात पण कधीकधी त्यांना योग्य मार्गदर्शनाचा अभाव असतो, तर कधी..प्रयत्न कमी पडतात आणि अपयश आलं तरअपयशाने कित्येक मुलं निराश होतात.. डिप्रेशनमध्ये जातात.. कित्येक मुलांना वाटतं की आपल्या आयुष्यातली महत्त्वाची चार-पाच वर्षे आपण उगीचच या परीक्षेच्या नादाने फुकट घालवली..

*दरवर्षी बाराशे ते पंधराशे विद्यार्थी आमच्याकडून (वैयक्तिकरित्या किंवा एकत्रित आयोजित वर्ग, कार्यशाळांमध्ये ) त्यांच्या शाळा कॉलेजमधील शैक्षणिक प्रगतीसाठी हिप्नोसिस व स्व संमोहना ची मदत घेत असतात*..

*पण गेली काही वर्ष आम्ही कमी फी घेऊन खास स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष देत आहोत*..

या स्पर्धात्मक युगात खरे तर जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी हिप्नोसिस ची मदत होत असते.
पण स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना.. खरोखर संमोहन उपचाराची, व स्व संमोहनाची खूप मदत व फायदा होत असतो..

*हिप्नोसिस चा विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा होऊ शकतो हे आपण पुढे पाहू*.

* *सर्वप्रथम आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे*.. विद्यार्थ्यांना आपलं ध्येय सतत समोर राहील याप्रमाणे मनामध्ये चांगल्यापैकी प्रोग्रामिंग करता येतं त्यामुळे ते उद्दिष्टापासून व प्रयत्नपूर्वक अभ्यास करण्यापासून फारसे विचलित होत नाहीत.

* *आत्मविश्वासात वाढ होणे*.. मला जमेल की नाही मला झेपेल की नाही इथून खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या विचारांना सुरुवात होत असते आत्मविश्वासाची कमी ही प्रकर्षाने जाणवत असते आणि हिप्नोसिस व त्यातील सूचना या आत्मविश्वास वाढवण्यासाठी अतिशय रामबाण उपाय आहे.

* *एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढ* हिप्नोसिस मध्ये सूचनामुळे मनाची एकाग्रता आणि स्मरणशक्ती या मध्ये बऱ्यापैकी वाढ होते..त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थित अभ्यासवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते व तो चांगला लक्षात राहतो.

* *आपल्या नकारात्मकतेला दूर ठेवणे*.. खरंतर आपला वैरीही आपल्याबद्दल नकारात्मक वाईट चिंतनार नाही तेवढे निगेटिव्ह विचार कळत नकळतपणे आपल्या मनामध्ये येत असतात आणि त्याचा नकळत परिणाम आपल्या परफॉर्मन्सवर होत असतो त्यामुळे नकारात्मक दृष्टिकोन बदलून सकारात्मक दृष्टिकोनाची वाढ करण्यासाठी हिप्नोसिस ची प्रचंड मदत होते
*
* *भीती व स्ट्रेस कमी करणे*.. परीक्षेत आपलं काय होईल कसं होईल ही भीती.. आपला निभाव लागेल की नाही.. आणि त्याच्यासाठी येणारा स्ट्रेस -ताण.. हे सर्व कमी करण्यासाठी संमोहनाचा विद्यार्थ्यांना अतिशय चांगला उपयोग होतो विद्यार्थ्यांना कूल दृष्टिकोन ठेवणे.. शांतपणे परीक्षा देणे सहज शक्य होते.

* *परीक्षेचा वातावरणाचा मानसिक सराव*.. परीक्षेच्या वातावरणाचा मानसिक दृष्ट्या सराव करण्यासाठी आत्मसंमोहनाचा चांगला वापर होऊ शकतो ज्यामुळे प्रत्यक्ष परीक्षा देणाऱ्या वातावरणाशी अधिक परिचयित आणि कम्फर्टेबल वाटण्यास मदत होते*

* *मानसिक अडथळ्यांवर मात करणे*. स्वसंमोहन..चिंतनाने आपल्या प्रगतीपथात येणारे भावनिक अडथळे किंवा काही मानसिक बॅरियर्स, ट्रिगर्स असतील तर त्याची जाण करून घेऊन त्याच्यावर कसं सोल्युशन काढता येईल.. यासाठी चांगला उपयोग होतअसतो
*
* *याचबरोबर प्रभावी अभ्यास सवयी विकसित करणे*
*
* *वेदना व्यवस्थापन जसे चिंतेची लक्षणे डोकेदुखी, स्नायू दुखणे,अपचन किंवा काही तणावाने येणाऱ्या शारीरिक दुखणे याच्यामध्ये मात करता येते*
*
* *सकारात्मक मानसिकता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देता येते*
*
* *झोपेची गुणवत्ता सुधारणं हे हिप्नॉटिझमच्या मार्फत शक्य असते*
*
* *नकारात्मक विचारसरणी, अपेक्षा बदलून सकारात्मक विचारसरणी,अपेक्षा प्रस्थापित करणे* व त्यासाठी प्रभावी अभ्यास सवयी विकसित करणे..
*
** *या आणि यासारख्या बऱ्याचशा गोष्टी हिप्नोथेरपीने साध्य करता येतात*
. गेले कित्येक वर्ष गरजवंतांना, विद्यार्थ्यांना मदत करून *एक गुरु व ट्रेनर -कोच* म्हणून.. कायम त्यांच्या मनात स्थान मिळवण्याचं भाग्य आम्हाला लाभत आहे.

त्यामुळे इथे मला पुन्हा एकदा अतिशय प्रांजळपणे नमूद करावं असं वाटतंय की स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी एक पूरक मदत उपचार पद्धती म्हणून संमोहन हिप्नोसिस -आत्मसंमोहन ची मदत घेतली तर त्याचा प्रचंड फायदा होतो..
तेही विद्यार्थीच असल्यामुळे योग्य तो ठराविकच मोबदला गुरुदक्षिणा( फी) घेऊन आपण त्यांना जरूर मदत करावी
धन्यवाद
*विकास मनोहर नाईक*
*हिप्नोथेरपीस्ट, सायकॉलॉजीस्ट*
( *सदर लेख माझ्या 'हिप्नॉटिझम' स्टुडन्ट च्या ब्लॉग मधील आहे.. कोणाला फॉरवर्ड करायचा असल्यास तो नावानिशी करायला परवानगी आहे*.)
*

*हायपर ऍक्टिव्ह, अटेंशनल डेफिशियन्सी (ADHD) व  हिप्नोसिस उपचार*  आमचा मुलगा हायपर ऍक्टिव्ह आहे, शाळेतून मेसेज आलाय कि तु...
08/07/2025

*हायपर ऍक्टिव्ह, अटेंशनल डेफिशियन्सी (ADHD) व हिप्नोसिस उपचार*
आमचा मुलगा हायपर ऍक्टिव्ह आहे, शाळेतून मेसेज आलाय कि तुमच्या मुलाला अटेंशन डेफिनिशन्सी आहे.
कौन्सिलर सांगता येत कि तुमचा मुलगा अतिशय चंचल आहे.
हे शब्द हल्ली खूपदा ऐकण्यात येतात.. यालाअटेंशनल डेफिसेन्सी हायपर ऍक्टिव्हिटी दिसोर्डर म्हणतात.
हिप्नोथेरेपीच्या प्रॅक्टिस मध्ये तर आता अशा तऱ्हेची कित्येक मुलं आपल्याकडे वर्षावर येत असतात..
पूर्वी जसं मुलाचं वय वाढेल तसा हा आजार बर होईल अशी समजूत होती..
पण साधारण 1990 नंतरच्या संशोधनामध्ये असं जाणवलं की मोठेपणी सुद्धा हा आजार बऱ्यापैकी असू शकतो किंवा हल्ली काही मध्यम वयीन स्त्रीया किंवा मोठ्या प्रौढांना सुद्धा अटेंशनल डेफिशियन्सी आढळते..
विशेषतः शाळकरी किंवा कुमारवयीन मुलांमध्ये हे प्रमाण खूप आढळून येत आहे..

*याची काही करण पुढील प्रमाणे*

* ADHD अनुवंशिक असू शकते. जवळच्या एखाद्या नातेवाईकाला असल्यास काही वेळा अनुवंशिक लक्षणे समस्याग्रस्ताला असू शकतात
* पर्यावरणीय घटकांमध्ये जसे अकाली जन्म, कमी वजनाचे बाळंतपण.. हे कारण असू शकते..
* जनुकीय ट्रान्सपरंट मेंदूच्या विकासामध्ये न्यूरो ट्रान्समीटर चे अनियमन असणं हेही कारण असू शकते
* प्रसतीपूर्व आईकडून चुकून चुकीची औषधं घेतली जाणं.
* आईचं व्यसन करणे,
* गर्भारपणात एखाद्या विषारी पदार्थाच्या संपर्कात आईचे येणे
* मेंदूला दुखापत असणं.

हल्ली ह्या समस्येचं प्रमाण जास्त जाणवण्यामध्ये काही सामाजिक व कौटुंबिक कारणे पण जाणवलेली आहेत..
पूर्वीच्या तुलनेत समाज रचनेमध्ये आता बदल झालेले आहे..
* आई वडील दोघेही नोकरीला असतात
* एकच मूल असतं.
* भावंड नसल्यामुळे एकलकोंडे पणा असतो.
* एकच मुल असल्यामुळे आणि आपण दोघेही नोकरीवर असल्यामुळे आई-वडील मुलावर जास्त फोकस किंवा पेंपरिंग असतं.
* मुल इंग्लिश मीडियम कीवा आयसीएससी बोर्डात जात असतात तिथे अभ्यासाचा प्रेशर ताण जास्त असतं.
* घरात बिघडलेले कौटुंबिक संबंध असणं
* उच्च पातळीवर संघर्ष असणं
* कधीकधी सिंगल पेरेंट्स असणं



*आधी ADHD ची लक्षणे समजून घेऊ*. यातील काही किंवा सगळी लक्षणे एखाद्यास असू शकतात..

* दैनंदिन कामे पूर्ण करण्यास अडचणी जाणवणे
* सतत अस्वस्थता, आवेग, असमर्थता, आक्रमकता आणि बैचैन..
* सतत हालचाल करत राहणे शांतता- एकाग्रता नसणे
* बसल्या जागी सुद्धा सतत हात किंवा पाय किंवा शरीराचा भाग हलवत राहणे..
* खूप बोलत राहणे, असंबंध बोलत राहणे, सार्वजनिक स्थळी किंवा कुठेही मोठ्या मोठ्याने बोलत राहणे
* इतरांपेक्षा चंचलता असणे
* आपली पाळी किंवा संधी यायच्या आधीच बोलणे किंवा मध्येच बोलत राहणे
* कोणतीही प्रतिक्रिया विचारपूर्वक परिस्थितीचा अंदाज न करता देणे
* घरातले व शाळेतले नियम पाळण्यास न जमणे
* इतरांशी बोलताना, खेळताना सतत भांडण, हमरा तुमरी किंवा मारामारीवर येणे
* आपली वस्तू व्यवस्थित सांभाळण्यास न येणे किंवा हरवणे
* एखादे काम पूर्ण करण्यास न जमणे लक्ष देऊन न काम करणे सतत सतत विचलित होत राहणे..
* सांगितलेले काम सोडून देणे
* स्व नियंत्रण किंवा आत्म नियंत्रणाचा अभाव असणे
* मध्येच लहान मुलासारखं रडणे किंवा उड्या मारणे
* शाळेमध्ये छोट्या छोट्या इशूज वरून वायलेट होणे

वरील लक्षणे असलेले पेशंट(मुलं) येतात. पण इथे मी तुम्हाला नमूद करू इच्छितो की या मुलांमध्ये IQ चा काही प्रश्न नसतो. हि मुलं बुद्धिमान असतात या स्थितीचा आणि बुद्धिमत्तेचा तसा काही फारसा संबंध नाही..
( *गतिमंद व मतिमंद ही वेगळी कॅटेगरी आहे ती इथे लागू होत नाही* )
काही वेळा जरी हायपर ऍक्टिव्हिटी ची पातळी सामान्य असली तरी शाळेत किंवा घरी अशा मुलांच्या दैनंदिन जीवनात लाक्षणीय रित्या वागणुकीत व्यत्यय येत असतो... त्यामुळे काही वेळा चिंता दायक परिस्थिती येते
येथे असे आढळतं की सर्वच मुलांमध्ये ADHD नसते किंवा व्यक्ती- व्यक्तीत त्याची तीव्रता किंवा लक्षणे किंवा प्रकटीकरण मुलांमध्ये वेगवेगळे असू शकते
याच्यावर काय उपचार होऊ शकतात
* तज्ञ मानसोपचार तज्ञ (Psychiatrist) किंवा न्यूरोलॉजिस्ट कडून उपचार केले जातात.
* समुपदेशन ए डी एच डी असलेल्या व्यक्तीला भावना विचारांनी वर्तनांवर नियंत्रण करण्यास मदत करते
* शिक्षणामध्ये शिक्षकानी व पालकांनी विद्यार्थ्यांना समजून घेणं गरजेचं असतं कारण इतर मुलं त्याला कायम अस्वस्थ करत असतात.. त्यामुळे कधी कधी मूल अग्रेसिव्ह होऊ शकतं
* बिह्याविहार थेरेपी तज्ञ मदत करू शकतात नवीन काही सामाजिक कौशल्य, वागणूक प्रशिक्षण, शैक्षणिक प्रशिक्षण पालक आणि मुल दोघांनाही प्रशिक्षण देऊ शकतात त्यामुळे लक्ष सुधारण्यास मदत होते
* इतरही घटक नियमित व्यायाम साजगता ध्यान उपयोगी ठरतं
* लक्ष विचलित करणारे घटक समजून घेऊन कमी करणे आवश्यक असत
* ईथे एक समजून घेणे गरजेचे आहे प्रत्येक व्यक्तीला ए डी एच डी ची लक्षणे व उपचार वेगवेगळ् असू शकतात आणि उपचारांमध्ये संपूर्ण कुटुंबाचा हस्तक्षेप व सक्रिय सहभाग असणं गरजेचं असतं
*आता समजून घेऊ संमोहन उपचारांमध्ये आपण कस काय मदत करू शकतो*
सर्वात प्रथम म्हणजे मला इथे नमूद करायचे आहे की संमोहन उपचार ही पूरक उपचार पद्धती म्हणून वापरली जाते. (मुख्य उपचार नाही)
संबंधित मुलाची व त्याच्या पालकांची पूर्ण मनापासून संमती असेल तर त्याच्यावर संमोहन प्रयोग करावा
* संमोहन प्रोसेस मध्ये सर्वप्रथम त्या व्यक्तीला व्यवस्थित ट्रान्समध्ये जाण्यासाठी सूचना देऊन प्रेरित केले जाते
* मुलाच्या इमोशनल कोशन EQ चांगल्या प्रकारे कसे डेव्हलप करता येईल याचे प्रोग्रामिंग केले जाते
* एकाग्रता व सजगता वाढवण्यासाठी सूचना दिल्या जातात
* कोणत्याही काम मनापासून करावं आणि जरी वेळ लागला तरी ते काम पूर्ण करावं यासाठी प्रेरित केलं जातं
* तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी सूचना प्रोग्राम केल्या जातात
* वर्तणूक आधी समजून घेऊन चुकीची वर्तवणूक सुधारण्याकडे भर दिला जातो
* सगळ्यात महत्व त्याची स्व नियंत्रणाची भावना डेव्हलप केली जाते.. त्यामुळे व्यक्ती त्याच्या भावना विचार आणि वर्तनांवर अधिक नियंत्रण ठेवण्यात सक्षम होतो
* आत्मविश्वास वाढीसाठी प्रेरणा दिली जाते
* भावनांवर व वर्तनांवर नियंत्रण मिळू शकल्यास कसा आत्मसन्मान सन्मान वाढतो हे मनावर जवळ जातं
* आई-वडिलांचा गुरुजनांचा शिक्षकांचा आदर करण्याच्या सजेशन प्रोग्राम कराव्या लागतात
* त्याचबरोबर वर्गातील मुलं किंवा मित्र यांनी काही चिडवलं, इरिटेट केलं तरी त्याला इग्नोर करून फक्त स्वतःच्या अभ्यासाकडे व डेव्हलपमेंटकडे लक्ष फोकस करण्याचं कंडिशनिंग केलं जातं
* इतर काही समयोचित प्रॉब्लेम समस्या जर असतील तर त्या जाणून घेऊन त्यामध्ये संमोहनाचा उपचार वापरता येतो
* एकंदरीत संमोहन उपचार हे अशा मुलांमध्ये पूरक उपचार पद्धती म्हणून अतिशय प्रभावीपणे वापरता येतात.. पालकांच्या व मुलांच्या संमतीने कोणतीहि अवाजवी फी न सांगता योग्य ती गुरुदक्षिणा फी घेऊन त्याचा उपयोग जरूर करावा..
* ( टीप: ऑटिझम व एपिलीपसी हे आजार वेगळे आहेतत् यावर हिप्नॉटिझमचा फारसा उपयोग होत नाही )
* धन्यवाद🙏
* लेखन व संकलन
* *विकास मनोहर नाईक*
* *हिप्नॉटिस्ट व क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट*

*

03/07/2025
अनुभुती संमोहन साधकाची
22/06/2025

अनुभुती संमोहन साधकाची

खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे कल्याण येथे आयोजित जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य महाशिबिराच  आयोजन करण्यात आलं होतं त्यात ...
03/06/2025

खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे कल्याण येथे आयोजित जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य महाशिबिराच आयोजन करण्यात आलं होतं त्यात मानसिक आजार, येणारा ताण,आणि हिप्नोसिस व रिलॅक्सेशन विषयावर बोलण्यासाठी,प्रात्यक्षिक दाखविण्यास गेस्ट स्पीकर म्हणून मला निमंत्रित करण्यात आलं होतं.. त्यावेळी ची काही क्षणचित्र..
सोबत प्रमुख डॉक्टर सुनील खर्डीकर सर व डॉक्टर माधुरी कुलकर्णी व त्यांचे इतर डॉक्टर व सहकारी..

Hypnotism classes @ कल्याण फोन 7021536949
28/05/2025

Hypnotism classes @ कल्याण फोन 7021536949

*@आमदार राम कदम साहेब* माझ्या या हिप्नॉटिझमच्या प्रवासात अनेक मान्यवरांचा जवळून संपर्क येतच असतो.. गाठीभेटी व प्रेमाचे आ...
29/04/2025

*@आमदार राम कदम साहेब*
माझ्या या हिप्नॉटिझमच्या प्रवासात अनेक मान्यवरांचा जवळून संपर्क येतच असतो.. गाठीभेटी व प्रेमाचे आपलेपणाचे संबंध वृद्धिंगत होत असतात..... असेच माझे वडील मनोहर नाईक सरांचे अतिशय जवळचे.. मित्र व मुंबई येथील घाटकोपरचे सतत चार वेळा भारी मताधिक्याने निवडून आलेले *आमदार माननीय राम कदम साहेब* यांच्याशी बऱ्याच वर्षानी स्नेहंकित भेटीचा योग आला..

Registration for session is free, register if interested
03/04/2025

Registration for session is free, register if interested

दोडामार्ग येशील हळबे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सुभाष सावंत सर व  प्राध्यापक श्री शेटकर सर यासोबत
22/02/2025

दोडामार्ग येशील हळबे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री सुभाष सावंत सर व प्राध्यापक श्री शेटकर सर यासोबत

https://youtu.be/736-7OqtFBI?si=kGuzmmaq5tIGFkPBमेडिटेशन मराठी मध्ये... लिंक वर क्लिक kara
14/02/2025

https://youtu.be/736-7OqtFBI?si=kGuzmmaq5tIGFkPB
मेडिटेशन मराठी मध्ये... लिंक वर क्लिक kara

Guided meditation in Marathi |Vikas Manohar Naik |self Hypnotism | Hypnosis |Relaxation |स्वसंमोहन | ...

Address

Punjab

Telephone

+917021536949

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Books by Hypnotist Manohar Naik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Books by Hypnotist Manohar Naik:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram