05/04/2021
श्री. उमेश भागवत यांनी सुरू केलेल्या कर्करोगग्रस्तांसाठीच्या वैद्यकीय समाजकार्याला आज १२ महीने पुर्ण झाले. दरम्यान, ७० हून अधिक कर्करोगाच्या रुग्णांना मुक्तहस्ते, वैद्यकेतर, मार्गदर्शनस्वरूप मदत करता आली याचे समाधान आहे.
समाजातील विवीध स्तरातील लोकांना निपःक्षपातीपणे मदत करताना जाणवलेले वास्तव म्हणजे आपल्या समाजातील अनेक लोक मार्गदर्शनाअभावी जीवावर उदार होऊन आपला वेळ व पैसा खर्च करतात आणि पदरात नैराश्याव्यतिरीक्त काहीच पडत नाही.
१. वैद्यकीय तज्ञांची माहीती
२. त्यांचे शिक्षण व रुग्णसेवेचा अनूभव
३. आर्थिक मदतीसाठी संस्था व संसाधने
४. आजारादरम्यान वैद्यकीय विमा
५. योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य मदतीसाठी पोहोचण्याचे मार्गदर्शन
अनेकदा वैद्यकीय विम्याची पुर्वतयारी नसल्याने पैशांअभावी रुग्णांना उपचारांना मुकावे लागते. आजारी अवस्थेत असतानाही काही सेवाभावी संस्था विम्याची सोय रुग्णांना उपलब्ध करून देतात परंतू योग्य माहीती व मार्गदर्शन न मिळाल्याने रुग्ण अशा सुविधांपासून वंचित राहतात. वैद्यकीय विम्यासंदर्भातही योग्य ते मार्गदर्शन मिळेल.
उमेश भागवत- ९८३३७०९३४८