17/10/2025
जेव्हा क्लायंट ला डाएट आवडू लागते..
न्यूट्रीशिअनिस्ट म्हणून आम्ही क्लायंट साठी डाएट प्लान तयार करतो. त्याच्या सद्यस्थितीत सुधारणा करणे आणि गमावलेला आत्मविश्वास परत आणणे यासाठी मार्गदर्शन करतो, प्रोत्साहन देतो आणि काही वेळा सक्तीही करतो...
पण सर्वात जास्त समाधान केव्हा वाटते ?.... ज्यावेळी त्यांना डाएट आवडायला लागतो ! ज्यावेळी ते त्यातील नावीन्य स्वीकारून त्या पदार्थाचा आस्वाद घेतात.. आणि तितक्याच आवडीने फोटो पण शेअर करतात !!.
मग डायट “उपचार”,“बंधन” म्हणून न राहता “ट्रीट” होऊन जातो. आणि त्याचा परिणाम....
कमी झालेली औषधे, सुधारलेले रिपोर्टस, त्रासलेले भाव जाऊन त्याजागी आलेली एखादी स्मितरेषा..... आणि पुढचा प्लान जर बोअरिंग दिलास तर जरासुद्धा फॉलो करणार नाही अशी धमकीही!..