30/11/2025
"डॉक्टर ,खूप एकटी पडली आहे हो मी !कोणीच नाही माझं! सगळे खोटं बोलतात, चुकीचं वागतात ! खूप राग येतो मला 😡"46 वर्षाच्या स्मिताताई (नाव बदललेलं आहे) बोलत होत्या.
स्मिताताई माझ्याकडे आल्या, तेंव्हा त्यांना बरेच त्रास होते. त्यांचे पित्त वाढून खूप डोकं दुखायचं. उलट्या व्हायच्या. डोळे जड व्हायचे. छातीत जळजळ व्हायची. पोट नीट साफ व्हायचं नाही. गॅसेस व्हायचे. सारखं सर्दी खोकला व्हायचा. धडधड व्हायची, चक्कर यायची.😣
अति संतापामुळे बीपी वाढून पॅरालिसीसचा अटॅक देखील त्यांना येऊन गेला होता. त्यांचा चिडचिडपणा ,अति काळजी हे देखील खूप वाढलं होतं. त्यांना झोपही नीट लागायची नाही.🥱
जेंव्हा इतके सगळे त्रास होत असतात, त्या मागे बऱ्याचदा नक्कीच काहीतरी वेगळं कारण असतं.🤔
होमिओपॅथीने आजार बरा करताना त्याचं नेमकं कारण काय आहे हे समजून घेणे खूप आवश्यक असतं. त्याशिवाय मुळापासून आजार बरा करणे अवघड असतं.😌
स्मिताताईंची जेव्हा detail case history घेतली, बऱ्याच गोष्टी समोर आल्या.
स्मिताताई खूप धाडसी स्वभावाच्या व्यक्ती होत्या.अन्याय त्यांना जराही सहन व्हायचा नाही. चुकीच्या गोष्टी घडल्या तर कोणाशीही भांडायला त्या घाबरायच्या नाही. लोकांची स्वतःहून मदत करायच्या. पण menopause ची अवस्था सुरू झाली आणि त्यांच्या नकळत मन व शरीरात काही बदल व्हायला लागले. त्यांचं चालू असलेलं काम कोविड मध्ये बंद पडलं. अचानक आलेला रिकामा वेळ, वाढत्या वयातल्या मुलांच्या समस्या, नवऱ्याचं दुर्लक्ष अशा सगळ्याच गोष्टी त्रासदायक होऊ लागल्या.😢
खरंतर एक स्त्री म्हणून बऱ्याच काही अडचणींचा सामना आपल्याला करायला लागतो पण त्रासदायक गोष्टी आपण दाबून टाकतो आणि त्याचा विचार करणं टाळतो. या दाबलेल्या गोष्टी जसं की राग, दुःख ,चिंता, भीती पाळीच्या आसपास ,रजोनीवृतीच्या आसपास तीव्रतेने वर यायला लागतात.😓
आजकाल कॉमन असलेला विषय म्हणजेच सेक्सलेस मॅरेज हीच स्मिता ताईंची मुख्य समस्या होती. एका बायकोच्या अगदीच साधारण अशा अपेक्षा त्यांच्या नवऱ्याकडून होत्या. त्यांनी जवळ घ्यावं, प्रेम व्यक्त करावं, मन मोकळ्या गप्पा माराव्या. नवऱ्याच्या प्रेमासाठी त्या आसुसलेल्या होत्या. पण असं काहीच घडत नव्हतं. त्यामुळे चिडचिडपणा, रागाचा उद्रेक वाढत चालला होता. याशिवाय त्यांच्या रागवण्याच्या भीतीने त्यांचा नवरा बऱ्याच गोष्टी त्यांच्याशी बोलत नव्हता किंवा लपवत होता.😐
बाहेर जाणं कमी झालं होतं, काहीतरी आजार होईल अशी तीव्र भीती होती, आत्मविश्वास कमी झाला होता.😞😟
त्यांच्या केसचा सविस्तर अभ्यास केल्यावर काही गोष्टी लक्षात आल्या. त्यांचा एकटेपणा ,आयुष्यातली प्रेमाची कमतरता त्यांच्या आयुष्यातल्या समस्यांना, आजाराला कारणीभूत ठरत होते. याशिवाय त्यांचा संतापी पण सरळ, प्रामाणिक स्वभाव हा देखील त्यांना त्रासदायक ठरत होता.😥
या सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य होमिओपॅथिक औषधाचे काही डोस त्यांना दिले गेले.🙂
योग्य होमिओपॅथिक औषध आणि समुपदेशन यांनी स्मिताताईंमध्ये फरक पडत गेला.
दिलेल्या औषधाने काही दिवस त्यांना बरं वाटलं. मग परत त्रास वाढला. उठलं की डोकं दुखायचं, बोलताना दम लागायचा, चक्कर यायची. इन्फेक्शनची प्रचंड भीती वाटायची. मला काही झालं तर घरच्यांचं कसं
होईल ही एक भीती सतत त्यांच्या मनात होती.😢😨😰
त्यांना थोडा फरक पडला होता म्हणजे औषध बरोबर होतं. पण त्यांना अजून जास्त डोसची आवश्यकता होती
मग औषधाचा डोस वाढवून परत काही दिवस औषधं दिली. ज्यावेळी त्रास जास्त होईल तेंव्हासाठी तातडीने घ्यायची वेगळी औषध देखील दिली.
हळूहळू त्यांच्यामध्ये खूप फरक पडला,त्यांचं मन शांत झालं. चिडचिडपणा, रडू येणं कमी झालं. त्या हसतमुख राहू लागल्या. घरातलं वातावरणही बदललं. मोकळेपणे, शांतपणे बोलल्याने नवरा बायकोचे संबंध देखील थोडे सुधारले. नियमित व्यायाम, प्राणायाम याबरोबर नवीन कामांमध्ये ही स्मिताताईंनी स्वतःला गुंतवून घेतले. होमिओपॅथिक औषधोपचार तर चालू होतेच. काही महिन्यांच्या नियमित होमिओपॅथिक औषधोपचारानंतर स्मिताताई त्यांच्या आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या.😊😇
योग्य औषधांबरोबर रुग्णाचा डॉक्टर वरचा विश्वासही तेवढाच महत्त्वाचा असतो. कधी कधी आजार बरा व्हायला थोडा वेळ लागतो अशावेळी धीर धरायची गरज असते. स्मिता ताईंनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि उत्तम सहकार्य दिलं त्यामुळेच मी त्यांना पूर्ण बरं करू शकले😇
डॉ. जुईली कुलकर्णी
श्री होमिओपॅथिक क्लिनिक
रावेत पुणे
97669 02124