Mauli Clinical Lab

Mauli Clinical Lab Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mauli Clinical Lab, Medical and health, Aman Nagar, Sakur, Sangamner.

प्रजासत्ताक दिना निमित्त भव्य रक्त तपासणी शिबिर. माऊली क्लिनिकल लॅबोरेटरी आयोजित ६२ परिपूर्ण आरोग्य चाचण्यांची भेट.. फक्...
16/01/2021

प्रजासत्ताक दिना निमित्त भव्य रक्त तपासणी शिबिर.

माऊली क्लिनिकल लॅबोरेटरी आयोजित ६२ परिपूर्ण आरोग्य चाचण्यांची भेट..
फक्त १५५०/- रू

🟣नाव नोंदणी सुरु आहे.
मो.९७६६९०६६५७,७२४९२२२४३७

पत्ता: माऊली क्लिनिकल लॅबोरेटरी
अमन नगर ,डाॅ.थोपटे ( उज्वल हॉस्पिटल ) शेजारी साकुर.
ता.संगमनेर जि.अहमदनगर

टीप. रक्त चाचण्यांसाठी १२ तास उपाशीपोटी राहणे आवश्यक.

25/12/2020
24/12/2020
Thank's to our great Doctor's, Patient's, Colleagues, Family and lovely Friend's, we’re celebrating the completion of ou...
07/07/2020

Thank's to our great Doctor's, Patient's, Colleagues, Family and lovely Friend's, we’re celebrating the completion of our '3 Year's in Sakur. We’ve built a lot of great relationships already, and we’re looking forward to strengthening them even further.
Thank's for helping to make Mauli Clinical Laboratory a successful venture..!
😊🙏🏻

Mauli Clinical Laboratory💉
31/12/2019

Mauli Clinical Laboratory💉

आजची आरोग्य तपासणी,उद्याच्या निरोगी आयुष्याची...🔬 माऊली क्लिनिकल लॅबोरेटरी,साकुर (संगमनेर) आयोजित.📢 महा आरोग्य शिबिर 📢🔘 ...
03/04/2019

आजची आरोग्य तपासणी,उद्याच्या निरोगी आयुष्याची...

🔬 माऊली क्लिनिकल लॅबोरेटरी,साकुर (संगमनेर) आयोजित.

📢 महा आरोग्य शिबिर 📢

🔘 शिबिर दिनांक 🔘
शुक्रवार - ०५/०४/२०१९
शनीवार - ०६/०४/२०१९
रविवार - ०७/०४/२०१९

वेळ सकाळी - ८:०० वा.पासुन

🔘 खास शिबिर दर 🔘
६०० रू.मध्ये ३० तपासण्या
७०० रू.मध्ये ६० तपासण्या
१००० रू.मध्ये ६३ तपासण्या

🔘 शिबिराचे ठिकाण 🔘
माऊली क्लिनिकल लॅबोरेटरी
तांबोळी बिल्डींग,डाॅ.थोपटे (उज्वल हाॅस्पिटल) शेजारी.
साकुर (संगमनेर).

🔘 संपर्क 🔘
९७६६९०६६५७,७२४९२२२४३७

With Blessings And Support Of All Of U We Are Entering In The New Venture Of Laboratory That Is 'MAULI PATHOCARE'(Wholes...
20/12/2018

With Blessings And Support Of All Of U We Are Entering In The New Venture Of Laboratory That Is 'MAULI PATHOCARE'
(Wholesale In Laboratory Chemical Diagnostics Kits & Instrument )

माऊली क्लिनीकल लॅब घेऊन आले आहे..🙏🏻 महा आरोग्य शिबीर (६० टेस्ट)🙏🏻बुधवार दिनांक: ३०/०५/२०१८ रोजी.वेळ: सकाळी.०८ :०० वा.पास...
23/05/2018

माऊली क्लिनीकल लॅब घेऊन आले आहे..
🙏🏻 महा आरोग्य शिबीर (६० टेस्ट)🙏🏻

बुधवार दिनांक: ३०/०५/२०१८ रोजी.
वेळ: सकाळी.०८ :०० वा.पासुन.
खास शिबीर दर: ७५०/- फक्त.

♦शिबीराचे ठिकाण♦

माऊली क्लिनीकल लॅबोरेटरी
उज्वल हाॅस्पिटल ( डाॅ.थोपटे शेजारी )
साकूर ता.संगमनेर जि.अ.नगर.

धर्मेश गोरख बच्छाव
मो.नं: ९७६६९०६६५७,७२४९२२२४३७

06/05/2018

📟 *ग्लुकोज मीटर काय सांगतं ?* 📟

मधुमेह ही एक वरवर साधी वाटणारी, पण अतिशय तापदायक अशी व्याधी आहे. मधुमेहावर नियंत्रण राखलं नाही, तर त्यापायी इतर अनेक विकार पाठी लागतात. मधुमेहग्रस्त रुग्णांना आपल्या पायांना पुष्कळ जपावं लागतं. जराशीही जखम झाली तरी ती बरी होत नाही. प्रसंगी ती आतल्या आत चिरत जाते आणि गँगरीनपर्यंत बळावल्यास पाय कापूनही काढावा लागतो. मधुमेहानं डोळ्यांनाही इजा होते. खास करून डोळ्याचा पडदा निखळण्याची शक्यता वाढीस लागते. मधुमेहग्रस्तांना हृदयविकाराची बाधा होण्याचीही शक्यता असते. विशेष करून हृदयविकाराचा झटका येताना इतरांना छातीत ज्या असह्य कळा जाणवतात त्या मधुमेहग्रस्तांना जाणवत नाहीत. त्यामुळे मधुमेहाला 'सायलेंट किलर' असंच नाव दिलं गेलं आहे.

सामान्यतः आपण ज्या अन्नाचं सेवन करतो त्याचं पचन झाल्यावर त्यातून काहीचं साखरेत रूपांतर होतं. ऊर्जा मिळवण्यासाठी या साखरेचं ज्वलन होणं आवश्यक असतं. यातली काही साखर रक्तात उतरते. रक्तातल्या साखरेचं प्रमाण संतुलित राखणारी यंत्रणा निसर्गानं कार्यरत केलेली आहे. त्यात इन्शुलिन आणि ग्लुकॅगॉन या दोन संप्रेरकांची कळीची भूमिका असते. पण त्या यंत्रणेत काही दोष निर्माण झाल्यामुळे किंवा इन्सुलीनचं उत्पादन पुरेसं न झाल्यामुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढतं. यालाच मधुमेह म्हणतात. ते प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी मग काही उपचार करावे लागतात.

त्यासाठी प्रथम रक्तातल्या साखरेच्या प्रमाणाचे मोजमाप करणे आवश्यक असते. पॅथॉलॉजी केंद्रात जाऊन ते करता येतं. पण मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. त्यापैकी टाईप टू या प्रकारचा मधुमेह तुलनेने सौम्य असतो. तो सहसा उतारवयातच प्रकट होतो. तो आटोक्यात ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणं व नियमित चालण्याचा व्यायाम घेणं हे उपाय पर्याप्त ठरतात. अशा रुग्णांनी नियमितपणे, पण चार सहा महिन्यांमधून एकदा रक्ततपासणी करून भागतं.

पण टाईप वन मधुमेह अधिक गंभीर असतो. अशा मंडळींना स्वतःच रक्तातल्या साखरेचं प्रमाण मोजता यावं यासाठी ग्लूकोज मीटरचं तंत्रज्ञान विकसित केलं गेलं आहे.

यात एक पट्टी दिलेली असते. या पट्टीवर ग्लुकोज अॅक्सिडेज, डिहायड्रोजनेज किंवा हेक्झोकायनेज यासारख्या विकारांचा थर दिलेला असतो. या पट्टीवर आपल्या बोटाच्या टोकाला सुई टोचून बाहेर काढलेल्या रक्ताचा थेंब ठेवून तो पसरवला, की त्या रक्तातल्या साखरेची त्या विकरांशी प्रक्रिया होऊन एक रसायन तयार होतं. ती पट्टी मग ग्लुकोज मीटरच्या यंत्रात सरकवली, की त्यावर त्या यंत्रातल्या विशिष्ट तरंगलांबीच्या प्रकाशाचा झोत पडतो आणि परावर्तित झालेल्या प्रकाशाची दीप्ती मोजून त्या रसायनाचं प्रमाण मोजलं जातं. त्यावरून गणित करून साखरेच्या प्रमाणाचं निदान केलं जातं.!

धर्मेश गोरख बच्छाव (संचालक)
माऊली क्लिनीकल लॅब,साकूर(संगमनेर).
📱९७६६९०६६५७

05/03/2018

📙 *टायफॉइड का होतो ?* 📙

टायफॉइडला विषमज्वर किंवा मुदतीचा ताप असेही म्हणतात. 'साल्मोनेला टायफी' नावाच्या जिवाणुंमुळे होणाऱ्या या रोगात रुग्णाला ताप येतो. हा ताप सुमारे तीन आठवडे राहतो. उपचार घेतल्यास मात्र रोग लवकर आटोक्यात येतो. उपचार न घेतल्यास रोगी मरण पावण्याची शक्यताही असते. या रोगात सतत जास्त ताप असतो, थकवाही जास्त येतो, पोट दुखते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे साधारणत: कोणत्याही तापामध्ये नाडीचा दर वाढलेला असतो. विषमज्वरात मात्र तापाच्या मानाने नाडीचा दर कमी असतो. हे रोगाच्या निदानासाठी खूप महत्त्वाचे आहे.

टायफॉइड झालेल्या रुग्णाच्या विष्ठेतून या रोगाचे जीव जिवाणू बाहेर पडतात. या विष्ठेचा अन्न, पाणी किंवा हाताशी संपर्क येतो. असे दूषित अन्न, पाणी वापरणाऱ्या व्यक्तींच्या पोटात मग हे जीवाणू जातात. माशादेखील विष्ठेतील जीवाणू उघड्यावर ठेवलेल्या अन्नपदार्थांपर्यंत पोचवतात. निरोगी माणसाच्या आतड्यात हे जंतू पोहोचल्यानंतर लसिकाग्रंथीमध्ये वाढतात व तेथून रक्तात जातात. कालांतराने विषमज्वराची सर्व लक्षणे दिसून येतात. काही व्यक्तींच्या शरीरात जिवाणू प्रवेश करूनदेखील त्यांना रोग होत नाही. अशा व्यक्तींना आजार होत नसला, तरी त्या त्यांच्या संडासावाटे जिवाणू बाहेर टाकत असतात. यांना रोगवाहक असे म्हणतात. कधीकधी विषमज्वराचे जिवाणू मेंदूत शिरतात व अश्यावेळी व्यक्तीचे मरण ओढवू शकते. या रोगात आतड्यांची शक्ती क्षीण होते व त्यांना व्रण (अल्सर) होतात. आतड्यांवर जास्त ताण पडल्यास फाटण्याची शक्यता असते. अशा वेळी पोटात रक्तस्राव होतो व नंतर जंतूसंसर्ग होऊन रुग्ण दगावतो. हे टाळण्यासाठी टायफॉइडच्या रुग्णाने थोडे बरे वाटले तरी संपूर्ण विश्रांती घ्यावी, अन्यथा गुंतागुंती होऊ शकतात.

विषमज्वराचे निदान रक्त, विष्ठा यांच्या तपासणीद्वारे खात्रीशीरपणे करता येते. विषमज्वरावर सेप्ट्राॅन, क्लोरॅम्फेनिकाॅल, अॅम्पीसिलीन अशी परिणामकारक औषधे उपलब्ध आहेत. विषमज्वराच्या रुग्णाला संपूर्ण विश्रांतीचा सल्ला घ्यावा द्यावा. तसेच हलका, पातळ आहार द्यावा. अॅस्पिरीनची गोळी देऊ नये, कारण त्यामुळे आतड्याला छिद्र पडण्याची शक्यता असते.

विषमज्वराच्या प्रतिबंधासाठी तोंडाने घ्यावयाची, तसेच इंजेक्शनने देण्याची अशा दोन्ही प्रकारच्या प्रभावी लसी उपलब्ध आहेत. पण महत्त्वाचे म्हणजे खाण्यापूर्वी हात साबण व पाण्याने स्वच्छ धुणे, तसेच अन्न व पाणी यांना जंतुसंसर्ग होणार नाही याची काळजी घेणे !

धर्मेश जि.बच्छाव
माऊली क्लिनिकल लॅब,साकूर
(संगमनेर) 9766906657.

Address

Aman Nagar, Sakur
Sangamner
422605

Telephone

+91 97669 06657

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mauli Clinical Lab posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram