मधुमेहामुळे डोळ्याच्या पडद्यावर होणारे दुष्परिणामाचे निदान करणे (Medical Retina) व लेसर उपचार करणे यामध्ये त्या पारंगत बनल्या.रुग्णामध्ये व सर्वसामान्यांमध्ये मधुमेहबद्दल जागृती करण्याच्या कामी त्या अविश्रांत परिश्रम घेत आहेत.
२०१० साली आपले मॅनेजींग डायरेक्टर डॉ. सौरभ दिलीप पटवर्धन, नंदादीप नेत्रालयामध्ये रुजू झाले, जे त्यांच्या पिढीच्या डॉक्टरपैकी भारतातील सर्वोत्रम नेत्रतज्ज्ञांपैकी एक आहेत.
सेठ G.S medical college व K.E.M Hospital मुंबई इथून M.B.B.S मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम येऊन सवर्णपदक प्राप्त केले.
नेत्र वैद्यकीय पदत्यूतर अभ्यासक्रमांत देखील A.I.I.M.S, NEW DELHI येथून पुन्हा सवर्णपदक प्राप्त केले.
आज सांगली व कोल्हापूर येथे नंदादीप नेत्रालयाची ३ सुसज्ज हॉस्पिटल्स कार्यरत असून पश्चिम महाराष्ट्रमध्ये ४ व्हीजन सेंटर्स देखील सेवेत रुजू आहेत.
नेत्र वैद्यकामधील, मोतीबिंदू, कांचबिंदू, पडद्याचे आजार, चष्म्याचे नंबर कमी करण्याच्या शस्त्रक्रिया, व्हीजन थेरपी सारख्या सर्वागीण नेत्ररोगाचे निदान करणारे व उपचार करणारे ३० पेक्षा जास्त डॉक्टर्स व ऑप्टोमेट्रीस्टची टीम नंदादीप नेत्रालयात उपलब्ध आहेत.
आमच्याकडे सर्व अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असून, मुंबई – पुण्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध असणारे एकमेव SMILE Laser मशीन देखील नंदादीप मध्ये उपलब्ध आहे
आमच्या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत जगभरातून येणाऱ्या डॉक्टर्स व ऑप्टोमेट्रीस्टना प्रशिक्षण दिले जाते.
नंदादीप म्हणजे कधी ना विझणारा दिवा .. जो रात्रंदिवस प्रकाश देत राहील... नंदादीप नेत्रालयदेखील अशास पद्धतीने , आपल्या आशीर्वादाने सर्वांना दृष्टीचा प्रकाश देत राहील असा आमचा विश्वास आहे! धन्यवाद