Aarogya Mandir sangli

Aarogya Mandir sangli श्री धन्वंतरी कृपेने , आयुर्वेद क्षेत्रात १९५५ पासून कार्यरत असलेले चिकित्सालय !

बहुतेक सर्वाना आवडणारी पण बहुतेक सर्व रुग्णांना मी पथ्य म्हणून सांगत असलेली 'मिरची ' !अनेक रोगांचे कारण ही त्यांच्यात अद...
08/09/2023

बहुतेक सर्वाना आवडणारी पण बहुतेक सर्व रुग्णांना मी पथ्य म्हणून सांगत असलेली 'मिरची ' !

अनेक रोगांचे कारण ही त्यांच्यात अदृश्य असलेले अनेक घटक असतात .
अदृश्य म्हणजे वाटणात असलेले जिन्नस .
सध्या आहार हा आरोग्यदायी पेक्षा चविष्ट करण्याकडे बहुतेक सर्वांचा कल असतो .
कोलायटिस हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे .
टेस्टी चा अट्टाहास रुग्णाला २ घास खायलाही घाबरवतो . . असो !

काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे कोलायटिस ची एक रुग्णा आली होती .
काही रुग्ण कायम डिनायल मोडवरच असतात .
आपण काहीही विचारले तरी नाहीच . . नाही . . अजिबात नाही हेच बोलायचे असे ठरवून आलेले असतात .
सगळ्या प्रश्नांना नाही मिळाल्यावर शेवटी निन्जा टेकनिक ने काही प्रश्न विचारले .
तुम्ही ज्या मेस मधे जेवता त्याचे जेवण कसे असते ?
उत्तर - एकदम चविष्ट ! (मम्मी ने टिप्पणी केली - इतके छान की घरचे जेवण आता आवडत नाही तिला )
तुम्ही ज्या भाज्या जेवता त्याचा रंग एकदम लाल भडक आणि तेलाचा तवंग असेल ना ?
उत्तर - नाही . . एकदम सात्विक असते जेवण . लाल रंग नाही तेलाचा तवंग नाही .
शी . . अगदीच मिळमिळीत जेवता हो तुम्ही . . त्याला ना चव ना वास ना रंग . .
उत्तर - काहीही काय डॉक्टर . . एकदम चमचमीत आणि टेस्टी असते भाजी . स्पायसी . .

भाज्या जेव्हा रंगाने नॉर्मल पण चवीला स्पायसी असतात तेव्हा त्यात मिरचीचा खर्डा वाटीने टाकलेला असतो . .
हे बोलल्यावर मम्मी आणि मुलगी डिनायल मोड वरून थेट समर्पण मोड वर आल्या . .
नाही हो डॉक्टर . . ते जेवण ना तिखटच असतं . . इत्यादी !

सांगायचा मुद्दा असा , की आयुर्वेदात मिरची चे '' सर्व रोगकृत '' असे वर्णन आहे .
सर्व रोगांना उत्पन्न करणारी अशी मिरची आहे !
तरीही चवीला उत्तम म्हणून लोक मिरच्या आवडीने खातात आणि आजारी पडतात .

आरोग्य उत्तम हवे असेल तर , मिरचीचा स्वयंपाकात वापर कमी करावा . मिरचीचा खर्डा स्वयंपाकात वापरू नये . मिरचीचे मोठे तुकडे घालावेत म्हणजे ते पानातून काढून ठेवता येतात . आपण पैसे वडापाव चे देतो , मिरच्यांचे नाही हे कायम लक्षात ठेऊन फुकट ते पौष्टिक या न्यायाने पोटावर अन्याय करू नये .
तिखटपणासाठी मिरची ऐवजी मिरे वापरावेत !

वैद्याचे कठीण असते . समोरचा आजार कशामुळे झाला आहे हे माहित असले तरी '' तुझको मिरची लगी तो मैं क्या करू ? '' असे म्हणू शकत नाही !!
•••••••••••••••••••••••••••••••••

वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे
एम डी (आयुर्वेद )
आरोग्य मंदीर -( सांगली - पुणे )
7276338585
📍maps.app.goo.gl/waa19Q6wrdcPpMey7?g_st=ic

हो … त्वचारोग , सोरियासिस बरे होतात . त्वचारोग झाकू नका .. आम्हाला सांगा ! सिंपल पिंपल ते किचकट सोरियासिस … आम्ही बरे कर...
07/09/2023

हो … त्वचारोग , सोरियासिस बरे होतात .
त्वचारोग झाकू नका .. आम्हाला सांगा !
सिंपल पिंपल ते किचकट सोरियासिस … आम्ही बरे करतो !

🥲 त्वचारोग बरे होत नाहीत 🥲 त्वचारोगांसोबत जगावं लागतं हे गैरसमज आहेत . ✅ हो . . त्वचारोग बरे होतात . ✅ हो . . तुम्हाला न...
07/09/2023

🥲 त्वचारोग बरे होत नाहीत
🥲 त्वचारोगांसोबत जगावं लागतं

हे गैरसमज आहेत .

✅ हो . . त्वचारोग बरे होतात .
✅ हो . . तुम्हाला नितळ त्वचा मिळू शकते .

आरोग्य मंदीर मधे आम्ही सिम्पल पिंपल ते किचकट सोरियासिस पर्यंत सर्व त्वचा रोगांवर इलाज करतो .

Address

Sangli
416416

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarogya Mandir sangli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Aarogya Mandir sangli:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category