02/12/2025
पुनम पाठक या एक्टरेस आणि मॉडेल म्हणून काम करतात. त्यांना नववी मध्ये असल्यापासूनच चष्मा होता त्यासाठी त्या तेव्हापासूनच किल्लेदार सरांना डोळ्यांच्या ट्रीटमेंटसाठी दाखवत होत्या.
काही वर्षानंतर मॉडलिंग च्या दृष्टिकोनातून त्यांना चष्मा वापरत असताना अडचणी येऊ लागल्या कारण मेकअप करत असताना डोळ्यांमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या कॉन्टॅक्ट लेन्सेस चा वापर करावा लागतो.प्रत्येक वेळी त्यांना मोठ्या नंबरचे कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरावे लागायचे पण त्यामुळे सुद्धा डोळ्यांना त्रास होत होता आणि त्यात चष्मा काढण्याची लासिक ही सर्जरी करण्याची मनामध्ये खूप भीती मनात होती. कारण डोळा हा खूप नाजूक अवयव आहे आणि याबाबतीत डॉक्टर किल्लेदार सरां सोबत बोलून लासिक सर्जरी करून घेण्याचा निर्णय घेतला. आत्ता सर्जरीनंतर त्यांचा चष्म्याचा नंबर निघून गेला आहे आणि त्यांच्या प्रोफेशनच्या दृष्टिकोनातून त्यांना याचा खूप फायदा झाला आहे. आता पूर्णतः चष्मा फ्री आयुष्य त्या एन्जॉय करत आहेत.