22/09/2024
आज रस्त्यावरून जात असलेले ६५ वर्षे वयाचे एक काका भेटले. विचारपूस करताना असे कळाले की ते तेरवाड( गंगापूर) येथील सनई वादक श्री मारूती धोंडीराम कोरवी हे आहेत. कंपवाताने सतत हालणारी मान सांभाळत दारोदार फिरून सनई वाजवून १०-२० रुपये मिळवून रोजची पोटा ची खळगी भरायची.
कोरवी समाजातील हा कलाकार ज्या कुशलतेने बुट्टया बनवतो त्याच कौशल्याने शहनाई वर राग सारंग ही वाजवितो.विशाळगडाच्या जंगलातील अस्सल सागवान लाकडा पासून तयार केलेली सनई, तुटी,माडाच्या पाना पासुन केलेले जिव्हाळ हे समजून घेतले.मारूती कोरवी त्यांच्या गावाचे नाव गंगापूर चे नाम उद्गाते ही आहेत हे ऐकुन मी थक्क झालो.मूले पंख फूटल्या वर उड़ून गेली.वृध्द पत्नी व ते दोघंच आयुष्याची भैरवी अनुभवत आहेत.त्याना केशवा माधवा.. हे भक्तिगीत आर्त स्वरात गाताना ऐकुन माझाच कंठ दाटून आला..