Ashwini Sahakari Rugnalaya Ani Sanshodhan Kendra Nyt Solapur

  • Home
  • India
  • Solapur
  • Ashwini Sahakari Rugnalaya Ani Sanshodhan Kendra Nyt Solapur

Ashwini Sahakari Rugnalaya Ani Sanshodhan Kendra Nyt Solapur Welcome to Ashwini Sahakari Rugnalaya Ani Sanshodhan Kendra Nyt Solapur. This is official page of hospital.

15/10/2025
In our Gynec department 2 Beded HIgh Dependency Unit was inaugurated today by doing Pooja at the hands of Respected Dr S...
07/10/2025

In our Gynec department 2 Beded HIgh Dependency Unit was inaugurated today by doing Pooja at the hands of Respected Dr Suman Sardesai Madam & Dr Bakul Jahagirdar in the presence of Hon. Chairman Mr Bipinbhai Patel Sir, Director Mr Jayesh Patel, Director Ashok Lambture, AO, MS, Dept HODs, Nursing and support Staff of our hospital.
HDU will function under the guidance of Dr Sardeasi Madam, Consultants Dr Suryaprakash Karande, Dr Archana Shah, Dr Bakul Jahagirdar, Residents Houseman and others.
This unit will monitor patients from High Risk Group and improve patient care. This unit is one of the requirements of NABH standards for quality care of high risk pregnancies.
We thank our Hon. Chairman, Vice Chairman, Board of Directors, Medical Directors, Departments of Civil, Electrical, Biomedical and others for their support.
It's our commitment to provide quality, safe and affordable care to our patients.
We once again thank all for their support.
AO & MS

अश्विनी सहकारी रुग्णालयातर्फे सोलापूर जिल्ह्यामधील महापूरग्रस्त नागरिकांसाठी फिरता [Mobile Dispensary] दवाखान्याची सुविध...
07/10/2025

अश्विनी सहकारी रुग्णालयातर्फे सोलापूर जिल्ह्यामधील महापूरग्रस्त नागरिकांसाठी फिरता [Mobile Dispensary] दवाखान्याची सुविधा

अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित, सोलापूर यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये नुकत्याच आलेल्या महापूराने ग्रस्त नागरिकांसाठी फिरता दवाखान्याची [Mobile Dispensary] मोफत सुविधा पुरविण्यात येत आहे.
सोलापूरामध्ये अतिवृष्टीमुळे महापूराची परिस्थिती निर्माण झालेली होती. या महापुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. महापुर ओसरल्यानंतर सुध्दा आजारी रुग्णांना रुग्णालयात जाणे फार अवघड झाले आहे.
अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित, सोलापूरने सामाजिक बांधिलकीचा विचार करुन, रुग्णालयाच्या ट्रॉमा ऍ़म्ब्युलन्सद्वारे फिरत्या दवाखान्याची [Mobile Dispensary] सोय उपलब्ध केलेली आहे. दि. 3 ऑक्टोबर 2025 रोजी अश्विनी सहकारी रुग्णालयामध्ये या उपक्रमाचे उद्घाटन मा.चेअरमन श्री.बिपीनभाई पटेल व संचालक श्री.जयेशभाई पटेल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीपाद कुलकर्णी यांच्या नेतृत्वामध्ये या फिरत्या दवाखान्यासाठी [Mobile Dispensary] एक वैद्यकीय पथक गठीत करण्यात आले असून ते ह्या संपूर्ण उपक्रमासाठी कार्यरत राहील. महापूरग्रस्त भागामध्ये तेथे जागेवर पोहोचून रुग्णांवर मोफत तपासणी व आवश्यक ते उपचार करण्यात येणार आहेत. पूरग्रस्त सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक शासकीय व खाजगी वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स यांचे ह्या पथकाला सहकार्य लाभणार आहे.
अश्विनी सहकारी रुग्णालयाचा फिरता दवाखाना [Mobile Dispensary] ऍ़म्ब्युलन्सद्वारे खालील ठिकाणी तपासणी व उपचार करण्याचे नियोजन आहे.

स्थळ दिनांक वेळ
बीएमआयटी कॉलेज, बेलाटी 3 ऑक्टोबर 2025 सकाळी 10 ते दुपारी 12
भैय्यासाहेब वळसंगकर प्रशाला, 3 ऑक्टोबर 2025 दुपारी 12 ते दुपारी 2
तिऱ्हे
तरटगांव व शिंगोली 3 ऑक्टोबर 2025 दुपारी 2 ते 4
डोणगांव 4 ऑक्टोबर 2025 सकाळी 10 ते दुपारी 12
पाथरी 4 ऑक्टोबर 2025 दुपारी 12 ते दुपारी 2
तेलगांव 4 ऑक्टोबर 2025 दुपारी 2 ते 4
औराद 6 ऑक्टोबर 2025 सकाळी 10 ते दुपारी 12
नंदूर 6 ऑक्टोबर 2025 दुपारी 12 ते दुपारी 2
शमशापूर 6 ऑक्टोबर 2025 दुपारी 2 ते 4
पाकणी 7 ऑक्टोबर 2025 सकाळी 10 ते दुपारी 12
अकोले 7 ऑक्टोबर 2025 दुपारी 12 ते दुपारी 2

या उपक्रमाचे उद्घाटनप्रसंगी संचालक श्री. अशोक लांबतुरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रशांत औरंगाबादकर, प्रशासकीय अधिकारी श्री. सचिन बिज्जरगी आणि अधिकारी, कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
अश्विनी सहकारी रुग्णालयाचे मा.चेअरमन श्री.बिपीनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच रुग्णांच्या हितासाठी अशा समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. अश्विनी सहकारी रुग्णालय हे पूरग्रस्तांकरिता मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहे व आवश्यकतेनुसार हा उपक्रम पुढे चालू राहील.

आपल्या संस्थेचे हृदयरोगतज्ञ डॉ. गुरुनाथ परळे सरांनी हृदयरुग्णांसाठी विशेष असे ई.सी.जी. जॅकेटचे संशोधन केलेले आहे.  आज दि...
07/10/2025

आपल्या संस्थेचे हृदयरोगतज्ञ डॉ. गुरुनाथ परळे सरांनी हृदयरुग्णांसाठी विशेष असे ई.सी.जी. जॅकेटचे संशोधन केलेले आहे. आज दि.30/09/2025 रोजी हृदयरोगतज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांनी ई.सी.जी. जॅकेटचे प्रात्यक्षिक उपस्थित संचालक , डॉक्टर्स, अधिकारी यांना दाखविले, तसेच हृदयरोग व ई.सी.जी. जॅकेटसंबंधी माहिती डॉ. परळे यांनी दिली.
हृदयरोगतज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांच्या या विशेष संशोधनाबद्दल संस्थेचे मा. चेअरमन श्री.बिपीनभाई पटेल सरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मा. व्हा. चेअरमन डॉ.विजय पाटील सरांनी याबद्दल गौरवोद्गार काढले

Good morning , Yesterday's CME on Syndromic approach was successful with more than 80 registrations. We thank our Hon.Ch...
07/10/2025

Good morning ,
Yesterday's CME on Syndromic approach was successful with more than 80 registrations.
We thank our Hon.Chairman Mr. Bipinbhai Patel Sir, Vice Chairman Dr Vijay Patil Sir, HOD of Dept. Of Medicine Dr S M Rudrakshi Sir for their support.
I express my gratitude to the faculty Dr Jyoti Chidgupkar Madam, Dr Ramchandra Vinnu, Dr Pariksh*t Prayag ( Pune ), Dr Nirmal Tapria, DrArun Kaushik ( Bangalore), Dr Hirekerur Sir, Dr Prashant Renke for enlighting us with their presentations.
I thank our Consultants, Residents for their active participation.
I thank Dept of Microbiology for organizing the CME
Our support staff did a commendable job.
I thank Dr Lokhande Madam for conducting the CME flawlessly.
Hope we conduct such academic activities regularly.
Thank you all 🙏

वार.. मंगळवार, दि.22 जुलै २०२५ रोजी स. 1 ते दु. 5 वाजेपर्यंतस्थळ : यमाईदेवी प्राथमिक आश्रम शाळा मार्डी ता-उत्तर सोलापूर ...
23/07/2025

वार.. मंगळवार, दि.22 जुलै २०२५ रोजी
स. 1 ते दु. 5 वाजेपर्यंत
स्थळ : यमाईदेवी प्राथमिक आश्रम शाळा मार्डी ता-उत्तर सोलापूर
आणि
अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र निय., सोलापूर
यांच्या संयुक्त विद्यमाने
भव्य मोफत आरोग्य शिबिर
डॉक्टराकडून तपासणी व मोफत औषधे वाटपाचे शिबीर संपन्न
सदर मोफत आरोग्य शिबिर कार्यक्रम साठी उपस्थित मान्यवर :-
मा. श्री उज्वलकुमार माने (पत्रकार )
सौ. सुरेखाताई लांबतुरे मॅडम अध्यक्षा संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर
मा. मधुकर गवळी साहेब ( सचिव )
मा. श्री. शंकर जाधव साहेब (ज्येष्ठ पत्रकार )
मा. श्री शहाजी भोसले सर
अश्विनी हॉस्पिटल चे डॉक्टर आणि अधिकारी, कर्मचारी वर्ग
यमाईदेवी प्रथामिक आश्रम शेळेच्या मुख्याधिपीका शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी

Heart attack diagnosis patent | हार्ट अ‍ॅटॅकचे निदान करणार्‍या डॉ. परळेंच्या संशोधनास पेटंटhttp://dhunt.in/119sak?s=a&uu...
19/07/2025

Heart attack diagnosis patent | हार्ट अ‍ॅटॅकचे निदान करणार्‍या डॉ. परळेंच्या संशोधनास पेटंट

http://dhunt.in/119sak?s=a&uu=0x579adef58bec0fe9&ss=wsp
Source : "पुढारी"

रविवार, दि.०६ जुलै २०२५ रोजी स. ९ ते दु. १ वाजेपर्यंतस्थळ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान शेजारी, बुध्दराष्ट्र ...
07/07/2025

रविवार, दि.०६ जुलै २०२५ रोजी
स. ९ ते दु. १ वाजेपर्यंत
स्थळ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान शेजारी, बुध्दराष्ट्र चौक, न्यु बुधवार पेठ, सोलापूर.
छञपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित
बुध्दराष्ट्र प्रतिष्ठान आणि
अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र निय., सोलापूर
यांच्या संयुक्त विद्यमाने
भव्य मोफत आरोग्य शिबिर

सदर मोफत आरोग्य शिबिर कार्यक्रम साठी उपस्थित मान्यवर :-
संस्थापक आयोजक बुध्दराष्ट्र प्रतिष्ठान अजित गादेकर , नगरसेवक श्री. डॉ. किरण विजयकुमार देशमुख, नगरसेवक संजय कोळी,आयु. दशरथ कसबे DK, आयु. अजित भाऊ गायकवाड, आयु. कुणाल बाबारे, आयु बाळासाहेब गायकवाड,

बुधवार दि.२८/०५/२०२५ रोजी अश्विनी रुग्णालय सोलापूर आणि सोलापूर विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने सोलापूर विम...
29/05/2025

बुधवार दि.२८/०५/२०२५ रोजी
अश्विनी रुग्णालय सोलापूर आणि सोलापूर विमानतळ प्राधिकरण यांच्या
संयुक्त विद्यमानाने सोलापूर विमानतळ येथे सोलापूर विमानतळ कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर आरोग्य तपासणी शिबिरात सोलापूर विमानतळ चे अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग तसेच अश्विनी रुग्णालय चे डॉक्टर, अधिकारी वर्ग , नर्सिंग कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

बुधवार दि.२८/०५/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता अश्विनी रुग्णालय सोलापूर च्या तळमजल्यावरील नूतनीकरण केलेले न्यूरो आयसीयुचे उ...
29/05/2025

बुधवार दि.२८/०५/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता अश्विनी रुग्णालय सोलापूर च्या तळमजल्यावरील नूतनीकरण केलेले न्यूरो आयसीयुचे उद्घाटन मा. चेअरमन श्री. बिपीनभाई पटेल यांच्या हस्ते झाले. सदर कार्यक्रमास संचालक वर्ग , तज्ञ डॉक्टर, अधिकारी वर्ग , कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Address

Ashwini Hospital Solapur
Solapur
413003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashwini Sahakari Rugnalaya Ani Sanshodhan Kendra Nyt Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ashwini Sahakari Rugnalaya Ani Sanshodhan Kendra Nyt Solapur:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category