चैतन्य क्लिनिक

चैतन्य क्लिनिक Dr.Atish Borade MBBS,DPM, Consultant Psychiatrist, De-addiction Treatment & Counseling, Psychotherapist & S*x Therapist

🌸 जाने दे – जाने दे, थोडी हवा आने दे 🌸राग, संताप, चिडचिड, वैताग, धुसफूस, रुसवा या तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपाच्या भाव...
19/09/2025

🌸 जाने दे – जाने दे, थोडी हवा आने दे 🌸

राग, संताप, चिडचिड, वैताग, धुसफूस, रुसवा या तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपाच्या भावना आपल्या मानसिक स्वास्थ्याला हानिकारक ठरतात.
या भावनेमुळे जर आपले मनःस्वास्थ्य बिघडत असेल, तर त्याला कुरवाळून ठेवण्यात काय अर्थ?

म्हणूनच लेखाचे शीर्षक हिंदी चित्रपट “हसीना मान जाएगी” मधील प्रसिद्ध ओळीवर आधारित आहे –
“जाने दे – जाने दे, थोडी हवा आने दे”

❓ मुळात आपण का रागावतो?

१. सहनशीलता किंवा संयम कमी असणे
२. स्वतः चुकीचे असूनही अहंकारापोटी चूक न मानणे
३. मनोविकार किंवा मादक पदार्थांचे सेवन
४. अपेक्षा पूर्ण न होणे
५. अन्यायाची भावना
६. भीती व असुरक्षितता
७. शारीरिक व मानसिक थकवा
८. बालपणातील अनुभव
९. हॉर्मोन्स व मेंदूतील रासायनिक बदल

⚠️ रागावण्याचे दुष्परिणाम

१. नातेसंबंध बिघडतात
२. निर्णय क्षमतेवर परिणाम होतो
३. आरोग्यावर दुष्परिणाम (रक्तदाब, हृदयविकार, डोकेदुखी)
४. विनाकारण हिंसात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते

✅ रागावर नियंत्रण कसे मिळवावे?

१. थांबा आणि श्वास घ्या – प्रतिक्रिया देण्याआधी खोल श्वास
२. परिस्थितीपासून दूर जा – “टाइम-आऊट” घ्या
३. विचार बदला – नकारात्मक विचार थांबवा, तटस्थ विचार करा
४. व्यायाम करा – चालणे, धावणे, योग
५. भावना योग्य प्रकारे व्यक्त करा – शांत भाषेत “मला असे वाटते…” वापरा
६. आरोग्याची काळजी घ्या – पुरेशी झोप, संतुलित आहार
७. मनःशांतीसाठी साधना – ध्यान, प्राणायाम, संगीत
८. विनोद व सकारात्मकता – छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा
९. व्यसनापासून दूर रहा
१०. मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्या

⏱️ ५ मिनिटांत राग शांत करण्याचे तंत्र

१. थांबा (१० सेकंद)
👉 १० पर्यंत मोजा – त्वरित प्रतिक्रिया थांबते

२. श्वास (१ मिनिट)
👉 ५ सेकंद श्वास आत, ५ सेकंद थांबा, ५ सेकंद बाहेर सोडा – ५–६ वेळा

३. शरीर सैल करा (१ मिनिट)
👉 खांदे, हात, जबडा रिलॅक्स करा

४. विचार बदला (१ मिनिट)
👉 नकारात्मक विचार ओळखा आणि म्हणा –
“मी शांत राहू शकतो” / “ही परिस्थिती निघून जाईल”

५. लक्ष वळवा (२ मिनिटे)
👉 पाणी प्या, चेहऱ्यावर पाणी मारा, थोडं चालून या

🙏 चित्तशांतीची प्रार्थना

"जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया;
जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया!
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय;
माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया"

💡 लक्षात ठेवा

👉 रागावणे = कमजोरपणाचे लक्षण
👉 क्षमा करणे = दृढनिश्चय आणि खंबीरपणाचे प्रतीक

👉सल्ला किंवा मार्गदर्शन करिता संपर्क करा
✍️ डॉ. अतिश बोराडे
MBBS, DPM
मनोविकास तज्ञ, सोलापूर
📞 9323852310

With Facebook for Creators – I just got recognised as one of their top fans! 🎉
18/09/2025

With Facebook for Creators – I just got recognised as one of their top fans! 🎉

🧠 *डोकेदुखी*आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात डोकेदुखी असतेच!कधी ती प्रत्यक्षात डोकं दुखणं असतं, तर कधी एखादी व्यक्ती, प्रसं...
18/09/2025

🧠 *डोकेदुखी*

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात डोकेदुखी असतेच!
कधी ती प्रत्यक्षात डोकं दुखणं असतं, तर कधी एखादी व्यक्ती, प्रसंग, काम किंवा समस्या "डोकेदुखी" बनते.

पण लक्षात ठेवा — डोकेदुखीचं खरं मूळ बाहेर नसून *आपल्या मनातल्या विचारांमध्ये* असतं.

✨ *अतः दिप भव – आपणच आपला प्रकाश*

गौतम बुद्धांनी सांगितलेली शिकवण :
"स्वतःच आपला प्रकाश बना."

याचा अर्थ — बाहेरील घटना किंवा व्यक्ती आपल्याला त्रास देत नाहीत, तर आपल्या चुकीच्या समजुती, अढी, धारणा किंवा दृष्टीकोन हे आपलं मन अस्थिर करतात.

👤 चुकीच्या वागणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन

एखाद्या व्यक्तीने चुकीचं वागलं, बोललं – म्हणजे ते फक्त त्या क्षणापुरतं मर्यादित असतं.

पण आपण त्याला आयुष्यभरासाठी शिक्का मारतो आणि प्रत्येक वेळी त्याला पाहिलं की मनात "डोकेदुखी" निर्माण होते.

गंमत म्हणजे त्या व्यक्तीला याची जाणीवही नसते, पण आपण मात्र सतत तळमळत राहतो!

🧩 समाधान टिकवण्यासाठी काय कराल?

स्वतःला सतत विचारत राहा : "माझ्या आयुष्यात बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत, मग एका व्यक्तीच्या चुकीमुळे मी समाधान का गमवावं?"

स्वतःला त्रयस्थ ठेवा आणि इतर आनंददायी बाबींकडे लक्ष द्या.

आपल्या जबाबदाऱ्या, उद्दिष्टे, कुटुंब आणि सर्वात महत्त्वाचं — मानसिक स्वास्थ्य — हे डोळ्यासमोर ठेवा.

🌿 निष्कर्ष

आपण स्वतःच आपल्या मनाचे चिकित्सक बनलो, तर "डोकेदुखी" मोठी समस्या न राहता जीवनातील एक छोटासा प्रसंग ठरतो.

आणि मग सहजच आठवतात शायर साहिर लुधियानवींच्या ओळी :
“मैं जिंदगी का साथ निभाता चला गया,
हर फिक्र को धुएँ में उड़ाता चला गया..."

- डॉ.अतिश बोराडे, MBBS,DPM
मनोविकास तज्ञ
9323852310

आनंद मित्रहो, मनुष्यास "आनंद" प्राप्त व्हावा ही सर्वांची मनापासून इच्छा असते. याचा चुकीचा अर्थ बऱ्याचदा "सुख" प्राप्ती अ...
17/09/2025

आनंद

मित्रहो, मनुष्यास "आनंद" प्राप्त व्हावा ही सर्वांची मनापासून इच्छा असते. याचा चुकीचा अर्थ बऱ्याचदा "सुख" प्राप्ती असा घेतला जातो. साधू संतांची नावे विवेकानंद, स्वरूपानंद अशी का बरे असतील ? आणि सुखासीन व्यक्तींची नावे चैनसुख, मनसुख, धनसुख अशी का असतील ? गीते मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात कर्म करीत रहा, फळाची अपेक्षा करू नका. कारण कर्म तुम्हाला आनंदाची प्राप्ती करून देते आणि फळ हे सुख देते ; जे क्षणभंगूर असते. आपणही आज पासून आपल्याला नेमून दिलेले अथवा सर्वांना आवडेल असे कर्म करीत राहू ज्यायोगे आनंदाची प्राप्ती आपण सर्वांना होईल.
सुखी व्यक्ती आनंदी असेलच असे नाही, खरं आहे ना ?
आणि आनंदी व्यक्ती कोणत्याही परिस्थिती मध्ये समाधानी असतो !
आनंदी दिवसाच्या आपणास शुभेच्छा

कोव्हिड पूर्व काळात सोलापूर शहर व आजूबाजूच्या  अंदाजे ९० ते ९५ शाळेत ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना " How to Study Ef...
17/09/2025

कोव्हिड पूर्व काळात सोलापूर शहर व आजूबाजूच्या अंदाजे ९० ते ९५ शाळेत ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना " How to Study Effectively" या विषयावर मार्गदर्शन करीत असताना खूप छान वाटायचे. विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी, आयुष्यातील ध्येय आणि यावर कशी मात करायची याबद्दल विविध प्रशालेच्या मा.मुख्याध्यापक , शिक्षकवृंद यांचेशी संवाद साधला जायचा. आज मागे वळून पाहताना वेळेअभावी आवडत्या कर्तव्यास मुकलो असल्याची भावना निर्माण होत आहे !

I've just reached 100 followers! Thank you for continuing support. I could never have made it without each and every one...
16/09/2025

I've just reached 100 followers! Thank you for continuing support. I could never have made it without each and every one of you. 🙏🤗🎉

12/09/2025

ज्येष्ठ नागरिकांना तपासणी फी मध्ये ५०% सवलत

12/09/2025

Address

Prabha Heights, Near Kali Masjid, Chatrapati Shivaji Maharaj Chowk
Solapur
413003

Opening Hours

Monday 12:30pm - 8:30pm
Tuesday 12:30pm - 8:30pm
Wednesday 12:30pm - 8:30pm
Thursday 12:30pm - 8:30pm
Friday 12:30pm - 8:30pm
Saturday 12:30pm - 8:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when चैतन्य क्लिनिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category