27/07/2023
गाऊट ( उरिक असिड )
गाऊट म्हणजे शरीरातील युरीक असिडचे प्रमाण वाढणे होय.हे उरिक असिड सांध्यामध्ये छोट्या गाठीच्या स्वरुपात साठून राहते व सांधेदुखीचे कारण बनते.
पुरषांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.
योग्य औषधपचार व अल्कलीयुक्त आहार यामुळे हा विकार आटोक्यात आणता येतो. आहारामध्ये प्रोटीन्स व पुरिन्सचे प्रमाण कमी ठेवणे आवश्यक आहे.
युरिक असिडचा त्रास असलेल्या लोकांनी खालील अन्नपदार्थचा जेवणात समावेश करावा : -
१) फळे – लिंबू, खरबूज, कलिंगड, पपई, आंबा, केळी, द्राक्षे, सुके अंजीर.
२) भाज्या – पालक, सिमला मिरची, कोबी, आलं, लसूण, बटाटा, सालासकट भोपळा, गजर, टोमाटो.
३) ‘क’ जीवनसत्व आहार – लिंबू, संत्री, मोसंबी इ.
४) दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.
५) आवश्यक चरबीयुक्त पदार्थ – जवस, दाणे.
६) सकाळी उठल्यावर २ चमचे कच्या बटाट्याचा रस प्यायल्याने युरिक असिडचे प्रमाण कमी होते.
काही अन्नपदार्थ हे शरीरातील उरिक असिडचे प्रमाण वाढवतात; त्यामुळे ते टाळावेत :-
१) कृत्रिमरीत्या तयार केलेली साखर (Artificial sweetners)
२) चॉकलेट्स, केक, पेस्ट्रीज.
३) साखर, जाम, जेली.
४) शीतपेय, मध्यपान, बीअर, कॉफी.
५) मैदा व मैद्याचे पदार्थ – पिझ्झा, पास्ता इ.
६) भाज्या – फ्लॉवर, मशरूम, मसूर, चवळी, वाटणे, ओट.
७) मासे, अंडी, तेलकट पदार्थ, भाजलेले दाणे.
डॉ.महेश पवार, संजीवन होमिओपॅथीक क्लिनिक,सोलापूर. ९६३७३३८०९०