25/08/2025
हुमा परिवाराचा सर्वधर्म समभाव विशेष सन्मान!
सोलापूर : लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने हुमा परिवाराचा सर्वधर्म समभाव विशेष सन्मान करण्यात आला आहे.
जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांच्या हस्ते सर्वधर्म समभाव विशेष सन्मान हुमा परिवाराचे संचालक हिशाम शेख यांना देण्यात आला. याप्रसंगी लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे माजी अध्यक्ष मनुसिंग बाबावाले, हुमा परिवाराचे सदस्य आयान शेख आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.