27/11/2025
प्रिसिजन वाचन अभियान
कहाणी ’वंदे मातरम’ची!
सुमारे १५० वर्षांपूर्वी ऋषि बंकिमचंद्रांनी ’वंदे मातरम’ हे गीत लिहिले. भारतीय साहित्यातील एक अजरामर गीत ठरलेल्या वंदे मातरमने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळीच दिशा आणि प्रेरणा दिली. ’वंदे मातरम’ हे पहिले दोन शब्द भारतीय स्वातंत्र्याचा रणघोष बनले.
इंग्रजांना ज्या शब्दांची प्रचंड दहशत बसावी, असे नेमके कोणते मर्म या दोन शब्दांमध्ये आहे. ’वंदे मातरम’चा साधा, सरळ, सोपा अर्थ आहे की, ’माते, मी तुला वंदन करतो..!!’ आपल्या मुलांना अभय देणारी ही माता इंग्रजांना महिषासुराचा नाश करणाऱ्या दुर्गेप्रमाणे भासली असावी. स्वतः बंकिमचंद्रांनी भारतमातेला दुर्गेच्या, कालीमातेच्या स्वरूपात पाहिले होते. त्याच भारतमातेविषयीचा वंद्यभाव त्यांनी या अजरामर गीतातून व्यक्त केला. तोच पुढे भारतीयांच्या शौर्याची प्रेरणा बनलं..!!
गेली ३०वर्षे वंदे मातरम या एकाच विषयाचा ध्यास घेऊन संशोधन करणारे आणि ’समग्र वंदे मातरम’ या द्विखंडात्मक ग्रंथाचे लेखक मा. मिलिंद प्रभाकर सबनीस आपल्या भेटीला येतायत. त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत, दैनिक सकाळचे सहयोगी संपादक मा. सिद्धाराम पाटील..
कधीही न ऐकलेल्या, अभ्यासलेल्या जाज्वल्य इतिहासाची पाने चाळू या..!!
प्रिसिजन वाचन अभियान
शुक्रवार, दिनांक ०५ डिसेंबर २०२५
वेळ - संध्याकाळी ०६.२५ वाजता.
स्थळ - डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर
#टीम प्रिसिजन