Naturemantra

Naturemantra Consulting Naturopath, Acupressure & reflexology, massage therapy, Natural Remedies, Thane

16/08/2021
भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏💐💐
10/08/2021

भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏💐💐

श्री महाराजांचा अनमोल ठेवा                                      श्री 'महाराजांनी वेळोवेळी सांगितलेली औषधे' माणसाला होणार...
03/06/2021

श्री महाराजांचा अनमोल ठेवा श्री 'महाराजांनी वेळोवेळी सांगितलेली औषधे'
माणसाला होणारे रोग आणि त्यावरील उपाय व औषधे यांच्याबद्धल श्री महाराज यांचे म्हणणे असे-१)प्रत्येक देशात त्यातील माती,हवा,पाणी व राहणी यास अनुसरून रोग होतात.२)ज्या देशात जे रोग होतात त्यांच्यावर त्या देशात इलाज करणाऱ्या वनस्पती उगवतात असा निसर्गाचा नियम आहे रोग बरा करण्यास वनस्पतींची पाने,फळे फुले व मुळे या सर्वांचा उपयोग करता येतो.३)औषध कसे पाहिजे?तर औषधाने रोग बरा व्हावा आणि शरीराचे इतर नुकसान होऊ नये.४)एकच औषध एकाहून अधिक रोगांना लागू पडते,पण प्रत्येक रोगामध्ये त्याचे अनुपान भिन्न असते.५)रोग लवकर बरा होण्यास पथ्याची फार गरज असते.पथ्या मध्ये खाण्यापिण्यावर ताबा असतो.६)औषध शक्यतो दुर्मिळ नसावे.ते घरगुती असले तर फारच उत्तम.७)रोग बरा होण्यास थोडा वेळ लागला तरी चालेल,पण रोग्याला फार कष्ट होऊ नयेत.८)यापुढील काळात लहान मुलांच्या आणि स्त्रियांच्या रोगामध्ये वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.म्हणून लहान मुलांच्या डॉक्टरांची जास्त जरूर आहे.स्त्रिया याबाबतीत जास्त चांगले काम करू शकतील.९)वैद्यकीला पैधाचा विटाळ नसावा.१०)समाजाला सुख समाधान देण्यास दोनच माणसे खरी उपयोगी पडतात.-एक डॉक्टर आणि दुसरा संत.डॉक्टर देहाचे रोग बरे करतो आणि संत मनाचे रोग बरे करतो.दोघांनाही प्रपंचात कमी पडणार नाही असा अनुभव आहे.११)रोग प्रारब्ध ने येतात.रोगाने माणूस मरत नाहीच.रोग हे मरणाचे निमित्त होते.मृत्यूची वेळ,तऱ्हा,व परिस्थिती हे नियतीने ठरलेले असते.🙏
१)रक्तदाब (BP)जास्त वाढणे-सकाळी शौचमुखमार्जन झाल्यावर अर्धा चमचा आवळा चूर्ण तोंडात टाकून त्यावर लहान अर्धा कप कोमट दूध प्यावे.
२)रक्तदाब कमी होणे:-सकाळी शोचमुखमार्जन झाल्यानंतर पाव चमचा सुंठीची पूड मधामध्ये कालवून चाटावी.
३)थकवा मरगळ,निरुत्साह:-सकाळ व संध्याकाळ पाव लिंबाचा रस,एक चमचा मध,एक कप कोमट पाण्यात कालवून घ्यावे.
४)पाठीच्या कण्याचे मणके दुखतात:-रात्री निजण्या च्या वेळी तिळाचे तेल पाठीच्या कण्याला खालून वर चोळावे.
५)कंबर दुखणे:-वडाच्या पानाला हिरव्या बाजूला थोडे तिळाचे तेल लावावे.पान थोडे गरम करावे व कमरेला बांधून निजावे.दोन तीन पाने बांधावी लागतात.
६) संधीवाताने गुडघे दुखणे:-हरभऱ्याच्या डाळीच्या दोन दाण्याइतकी सुंठीची पूड अर्धा चमचा एरंडेल तेलात घोळावी ते मिश्रण निजायच्या वेळी चाटावे,आठ दिवसात फरक पडतो.
७)पोट साफ ठेवण्यास:-१)रात्री झोपण्याच्या आधी एक चमचा त्रिफळा चूर्ण,कोमट पाण्याबरोबर घ्यावे.२)रात्री निजण्याचे वेळी एक मोठा चमचा इसबगोल पूड कोमट पाण्याबरोबर घ्यावी.३)जेवण झाल्यावर पंधरा वीस मिनिटांनी पाव चमचा हिरड्याचे चूर्ण पाण्याबरोबर घ्यावे,४)जेवायला बसताना पहिला घास घेण्याआधी एक चमचा बदामाचे तेल घ्यावे.५)सकाळी उठल्यावर तोंड धुवावे,आणि थोडे मीठ घालून तीन चार ग्लास गरम पाणी प्यावे.६)रात्री निजायच्या वेळी एक चमचा तिळाची पूड तोंडात टाकून वर अर्धा कप कोमट दुध प्यावे.७)वयाला साठ वर्ष पूर्ण झाल्यावर आठवड्यातून दोन वेळा सकाळी एनिमा घ्यावा,(सूचना)वर सांगितलेल्या उपयांपैकी आपल्या ला जो लागू पडेल तो अंमलात आणावा
८)खोकल्याचा त्रास होणे(१):-लेंडी पिंपळीचे चूर्ण मधात कालवून ठेवावे.तास दोन तासांनी मधून मधून चाटावे.हा उपाय विषेश करून तान्ह्या व लहान मुलांना उत्तम असतो.
९)खोकल्याचा त्रास होणे(२):-जेष्ठमधाची पूड गरम पाण्यात उकळून ठेवावी.प्रमाण दोन चमचे पूड आणि दोन कप पाणी उकळून अर्धे ठेवावे.ते पाणी दोन दोन तासानी दोन दोन चमचे घ्यावे.
१०)सर्दीने डोके जड होणे व नाक वाहणे;-दुधात सुंठ उगाळावी आणि त्याचा टाळूवर लेप करावा.
११)सर्दीने घसा धरणे:-एक मोठा चमचा मध घेऊन त्यात आठ दहा तुळशीची पाने कुस्करावीत,त्याची लहान गोळी तोंडात धरावी.
१२)फ्लू चा ताप:-तुळस चार काड्या पानासकट, अर्धा चमचा सुंठीची पूड, दोन चमचे बडीशेप, आणि चार गवत गवती चहा यांचा काढा करावा.उकळून अर्धा करावा,त्याची वाफ घ्यावी.अर्धा कप काढा व अर्धा कप दूध साखर घालून दिवसातून तीनचार वेळेला घ्यावी.
१३)पोट बिघडून जुलाब होणे:-1)एक चमचा बडीशेप आणि एक चमचा बाळंतशोपा उकळून ते पाणी दोन दोन तासांनी घ्यावे.हिरव्या सालीचे पिकलेले केळ उकडून दिवसातून दोन तीन वेळा खावे.
१४)पोट बिघडून जुलाब होणे:-2बेलफळाचा मुरंबा खावा.
१५)बारीक ताप येणे:-काडेचिराइताच्या चार काड्या रात्री कपभर पाण्यात भिजत टाकाव्या.सकाळी जेवायला बसण्याच्या वेळी ते पाणी पिऊन घास घ्यावा.
१६)लघवी साफ होण्यास:-धणे थोडे भाजावे,त्याची पूड करावी,त्यात अर्धी खडीसाखरेची पूड घालावी,ते चूर्ण एक चमचा पाण्याबरोबर घ्यावे.
१७)आतड्यामध्ये उष्णता होणे:-रात्री दहा वाजता एक कपभर पाण्यात तीन चमचे दूध घालून ठेवावे.पहाटे चार वाजता ते पाणी पिऊन पुन्हा एक तास दिडतास झोप घ्यावी.
१८)उन्हांळी लागणे:-पहाटे पाचसहा वाजता खजुराच्या तीन बिया मोठ्या कपामध्ये पाण्यात भिजत टाकाव्या.नंतर दहा वाजता त्या त्याच पाण्यात कुस्कराव्या. ते पाणी गाळून पिऊन टाकावे.
१९)अर्धांगाचा सौम्य झटका:- रक्तदाबाचा सौम्य परिमाण होऊन लहानसा अर्धांगाचा झटका येतो.त्याच्यासाठी दुधाचा काढा.
अर्धा लिटर दूध तापवावे त्याला उकळी आली की त्यामध्ये बिब्याच्या तेलाचे चार थेंब टाकावे. थोडा वेळ उकळल्यावर ते दूध उतरावे. ते कोमट दूध साखर घालून दिवसांतून अर्धाअर्धा कप तीन वेळा घ्यावे. *वरून उपाय*-जे अंग लटके पडेल असेल त्यास सकाळ संध्याकाळ *तिळाचे* तेल चोळावे.
२०)फुफ्फुसांमध्ये पाणी होणे:-(एक) आळशीची जाडीभरडी पूड पाण्यात शिजवावी.शिजल्यावर त्याचे चिकट पिठले होते ते गरमगरम एका रुमालावर हाताच्या पंज्याइतके पसरावे.त्याच्यावर दुसरा रुमाल पसरावा. त्या घडीचा दोन्ही बरगड्यांना सोसेल इतका ऊन शेक द्यावा.दिवसातुन कमीतकमी दोन वेळा व जास्तीत जास्त चार वेळा द्यावा.(दोन)एक कप दुधामध्ये एक चमचा सुंठीची पुड उकळावी.ते मिश्रण साधारण दाट झाले की गरम (सोसेल इतके)दोन्ही बरगड्यांना लिंपावे.दिवसातुन एकदाच लावावे.
२१)सर्दीने डोके जड होऊन नाक वाहणे:-दोन चमचे दुधामध्ये थोडी सुंठ,वेखंड आणि जायफळ उगाळावे ते मिश्रण चांगले गरम करून टाळूवर व कपाळावर पसरावे.नाक वाहू द्यावे .ते वाहणे आपोआप थांबते.
२२)वारंवार खोकला होणे:-अर्ध्या लिंबाचा रस,तितकाच आल्याचा रस व त्यात तितकाच मध घालावा.त्या मिश्रणामध्ये एक चमचा पिंपळीची पुड घालावी.दिवसातून तीनचार वेळा ते चाटावे.काही दिवसांनी खोकला होण्याची शरीराची प्रवृत्ती बंद होते.
२३)वारंवार अमांश होणें व पचन बिघडणे:-सुंठीची पूड एक चमचा ,बडीशेप दोन चमचे, वावडिंग एक चमचा आणि पाव चमचा खसखस यांच्या पुडीचे मिश्रण करावे.रोज सकाळी शौचमुखमार्जानानंतर पाण्याबरोबर एक चमचा आणि रात्री निजण्याच्या वेळी एक चमचा ते चूर्ण घ्यावे.अगदी जुनाट अमांशदेखिल महिनादिडमहिन्याने बरा होतो.
२४)रक्तामधील लालपणा वाढणे:-(रक्तातील लालपेशी कमी झाल्या की माणूस फिका पडतो.त्यावर उपाय)चमचाभर तुळशीचा रस घेऊन त्यामध्ये पाव चमचा हळदीची पुड मिसळावी. रोज सकाळसंध्याकाळ जेवायला बसताना आधी ते मिश्रण घ्यावे.
२५)कोणताही हृदयविकार:-काळ्या तुळशीची पाच पाने चांगली ठेचावी. त्यात एक चमचा धन्याची पूड घालावी.त्यामध्ये एक चमचा मध टाकून ते मिश्रण दिवसातून चार वेळा घ्यावे.त्रिफळा घेऊन पोट साफ ठेवावे.
२६)सर्वसामान्य:-(एक) क्षयाच्या रोग्याला रोज सकाळी एक कपभर उसाचा ताजा रस द्यावा.
(दोन)मुदतीच्या तापामध्ये दिवसातून दोन वेळा एकएक कप भाताची पेज घ्यायला हरकत नाही.
(तीन)पहिलटकरणीच्या ओकाऱ्या थांबवू नयेत. तिला रोज कोकमचे सरबत किंवा सार देत जावे.
(चार)श्रमाने हातपाय ओढतात. पातेल्यांमध्ये गरम पाणी घ्यावे,त्यात खाण्याचा सोडा (चमचाभर)टाकावा.त्या पाण्यात दहा मिनिटे पाय ठेवावे.
(पाच)मानेपाशी व कंबरेपाशी पाठीचा कणा दुखतो.त्यासाठी रोज रात्री निजताना कंबरेपासून मानेपर्यंत खालून वर तिळाचे तेल चोळावे.
(सहा)रात्री निजताना त्रिफळाच्या पाण्याने डोळे स्वछ धुवावे.त्याने
म्हातारपणी दृष्टी साफ राहते.🙏
ब्रह्म चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

🍃📿श्रीराम.
🌸🍃।।श्रीराम जय राम जय जय राम।। प पु सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराज की जय।।🌸🍃

- लसूणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपली फुफ्फुसं साफ करण्यास मदत करतात. तसेच लसणाच्या वापरामुळे कफची समस्याही दूर होण...
23/01/2021

- लसूणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपली फुफ्फुसं साफ करण्यास मदत करतात. तसेच लसणाच्या वापरामुळे कफची समस्याही दूर होण्यास मदत होते.

- मनुके आपल्या फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी उपयुक्त आहेत आणि दररोज भिजलेले मनुके खाणे फायदेशीर असते.

- तुळस देखील एक अतिशय प्रभावी अँटिऑक्सिडेंट आहे आणि ती छातीत साठलेला कफ काढून टाकते

- जेष्ठमधात अँटी-इंफ्लेमेटरँटी गुणधर्म आढळतात आणि हे आपले फुफ्फुस साफ करण्यास मदत करते. बडीशेप बरोबर चिमुटभर घ्यावे

- आलं शरीरात डिटॉक्सिफाय करण्यात सर्वात फायदेशीर मानले जाते आणि दररोज सकाळी आल्याचा रस गरम पाण्यात मधासह घेतल्यास आपली फुफ्फुस डिटॉक्स होतात.

योगासने
------------------------------
भुजंगासन
शशांकासन
त्रिकोणासन
सर्वांगासन

प्राणायाम
-------------------------------
भस्त्रिका
अनुलोम विलोम
कपालभाती

Click the link below - Fill the form - Make a  payment of Rs.200 ( Bank details given at bottom)- You will receive a cal...
20/01/2021

Click the link below - Fill the form - Make a payment of Rs.200 ( Bank details given at bottom)- You will receive a call in 24 hrs - Finally you will get a soft copy(Word/pdf) containing Naturopathic treatment, dos and don'ts

https://form.jotform.com/210155249670049

Online YOGA classes for LadiesContact : Rashmi7718913400
20/01/2021

Online YOGA classes for Ladies
Contact : Rashmi
7718913400

विवेक पहाणे बरा, खरा विचार तो करा...उपासकांसी सुचना उपासना उपासना..
12/01/2021

विवेक पहाणे बरा, खरा विचार तो करा...उपासकांसी सुचना उपासना उपासना..

आपले संपूर्ण आयुष्य विस्कळीत हिंदू समाजाला सशक्त आणि संघटित करण्यात व्यतीत केलेल्या समर्थ रामदासस्वामींचा योगाभ्यास दांड...
10/01/2021

आपले संपूर्ण आयुष्य विस्कळीत हिंदू समाजाला सशक्त आणि संघटित करण्यात व्यतीत केलेल्या समर्थ रामदासस्वामींचा योगाभ्यास दांडगा होता हे तर उघडच आहे . परंतु त्यांनी योग अभ्यासाबद्दल फारसे कुठे काही लिहून ठेवल्याचे आढळत नाही, काही मोजके लिखाण उपलब्ध आहे ज्याच्या वरून समर्थांचा या विषयातला गाढा व्यासंग त्वरित लक्षात येतो. शिवाय समर्थांच्या अनेक शिष्यांनी योगाभ्यासावर भरपूर लिखाण करून ठेवलेले आहे. उदाहरणार्थ कल्याणस्वामींना तर योगीराज अशीच पदवी समर्थांच्या हयातीतच मिळाली होती .
असो अशाच एका अभंगाचा आस्वाद घेऊन ...

योगाभ्यास मग यथाशक्त्या करी।
तुटे कर्मदोरी ज्या सेवेनें॥१॥

ईडामार्गीं वायु यथाशक्त्या ओढी।
दडपावी गाढी तो कुंभक॥२॥

पिंगळेच्या मार्गे सांडावे निश्वास।
सुषुम्ना वेळ नाश होय जात॥३॥

पिंगळे करावे युक्तीनें पूरक।
होईल कुंभक तितुका कीजे॥४॥

रामदास म्हणे करावें रेचक।
जेणे जाला एक प्राणायाम॥५॥

- श्री समर्थ रामदास स्वामी

- दुधासोबत दही, मीठ, आंबट वस्तू, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे या सारखे पदार्थ हानिकारक असतात....
07/01/2021

- दुधासोबत दही, मीठ, आंबट वस्तू, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे या सारखे पदार्थ हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधासोबत खाणे हानिकारक आहेत.

- खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, खरबूज, मूळा या गोष्टी दही सोबत खाऊ नका.

- थंड दूध, थंड पाणी, मद्य तुपासोबत खाणे हानिकारक ठरू शकते.

- मूळा, खरबूज, तूप, द्राक्षे, पाणी आणि गरम पाणी मधानंतर घेऊ नका.

- फणस खाल्यानंतर पान खाणे धोक्याचे ठरते.

- मुळा : मुळा आणि गुळ एकत्र खाणे नुकसानदायक असते.

- खीर : खिचडी, आंबट पदार्थ, फणस कधीही खीर सोबत खाऊ नका.

- थंड पाणी : शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दूध किंवा गरम भोजन यानंतर थंड पाणी कधीच पिऊ नका.

- कलिंगड : पुदीना किंवा थंड पाणी कलिंगड खाल्यानंतर घेऊ नका.

- काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी चहासोबत कधीच घेऊ नका.

- दुध, उसाचा रस, मध यांचं सेवन मासे खातांना कधीच करू नका.

- तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तू उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादी कधीच खाऊ नये. या वस्तू विष युक्त होतात. अशा भांड्यमध्ये बराच वेळ ठेवलेले पदार्थ खाऊ नयेत.

20/12/2020

Food Tips for Winter

Address

Thane
400615

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

9987118013

Alerts

Be the first to know and let us send you an email when Naturemantra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Naturemantra:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram