श्री ब्रह्मांडनायक - आयुर्वेदीय व पंचकर्म चिकित्सालय

  • Home
  • India
  • Umred
  • श्री ब्रह्मांडनायक - आयुर्वेदीय व पंचकर्म चिकित्सालय

श्री ब्रह्मांडनायक - आयुर्वेदीय व पंचकर्म चिकित्सालय Offering genuine ayurvedic treatment after taking detailed history of patient.

" तस्माचिच्चकित्सार्ध इति प्रदिष्टः कृत्स्ना चिकित्सापि च बस्तिरेकैः आयुर्वेद चिकित्सा मध्ये बस्तीला कोण कोणी अर्धी वैद्...
03/06/2024

" तस्माचिच्चकित्सार्ध इति प्रदिष्टः कृत्स्ना चिकित्सापि च बस्तिरेकैः

आयुर्वेद चिकित्सा मध्ये बस्तीला कोण कोणी अर्धी वैद्यक्रिया असे म्हणतात ,
व कित्येकांच्या मते तर सर्वच चिकित्सा "बस्ती " मध्ये येते

तथा निजागन्तुविकारकारिरक्तौषधत्वेन शिराव्यधोऽपि :

हाच सिद्धान्त निजागंतु विकाराला कारणीभूत जे रक्त " त्याचे शोधन करणारा जो " शिराव्यध " त्यालाहि लागू आहे .

संपृक्ताद्दुष्टशुद्धास्राज्जलौका दुष्टशोणितम् ।
आदत्ते प्रथमं हंसः क्षीरं क्षीरोदकादिब ।।

मिसळलेल्या, शुद्ध व दुष्ट रक्तांतून जळू पहिल्याने दुष्ट रक्त पिते,
जसे पाणी घातलेल्या दुधातून हंसपक्षी दूधच पितो.

।।
' जलौका " ला विष्णूरूप आदीवैद्य भगवान धन्वंतरी आपल्या हस्ती धारण केले आहे .

बृहये__ग्रीष्मेअपरानपि।ग्रीष्म ऋतूमध्ये सर्वांना बृंहण योग्य आहे.Persons eligible for  बृंहण_nourishing therapy: * Durin...
22/05/2023

बृहये__ग्रीष्मेअपरानपि।

ग्रीष्म ऋतूमध्ये सर्वांना बृंहण योग्य आहे.

Persons eligible for बृंहण_nourishing therapy:

* During convalescence period.
* Become weak due to the treatments.
* Alcohol consumption, excessive copulation, grief etc.
* Carrying heavy loads, long walks, injury to chest.
* Thin and debilitated.
* Suffering with rate disorders.
* Pregnant, postnatal period, children, aged and everybody during summer.

Daily use of milk, sugar, ghee, e***a with unctuous substances, comfortable
sleeping and sitting, massage, bath, inducing happiness etc. gives nourishment to the body.

kindly be in contact with your vaidya As during treatment or new intakes in food like above , digestive power needs to be strong.

मांसक्षीरसितासर्पिर्मधुरस्निग्धबस्तिभिः ।। स्वप्नशय्यासुखाभ्यङ्गस्नाननिर्वृतिहर्षणैः ।

बृंहण करणे ते पुढील साधनांनी करावे:-
मांस, दूध, साखर, तूप,
मधुर व स्निग्ध औषधांच्या पिचकाऱ्या,
निद्रा घेणे,
बिछान्यावर यथेच्छ पडून राहणे,
अभ्यंगस्नान,
चित्ताचे समाधान व रंजन.
(वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली उपाय करावेत )

बृंहण चिकित्सेस जे योग्य आहेत ते येणेप्रमाणे:-
व्याधि, औषधे, लंघनार्ह स्त्रीसेवन व शोक यांच्या योगाने कृश झालेले,
ओझे वाहणे, मद्य, मार्गक्रमण व उरःक्षत यांनी थकलेले
व रूक्ष,
अशक्त,
वातप्रकृति,
गर्भिणी, बाळंतीण, बाल व वृद्ध,
आणि ग्रीष्म ऋतूमध्ये तर सर्वांना बृहण करावे; किंवा बृंहण योग्य आहे.

सुवर्णप्राशनं हि एतत् मेधाग्निबलवर्धनम् । आयुष्यं मङ्गलं पुण्यं वृष्यं वर्ण्य ग्रहापहम् ॥सूत्रस्थानम्, कश्यपसंहिता अर्था...
22/04/2023

सुवर्णप्राशनं हि एतत् मेधाग्निबलवर्धनम् ।
आयुष्यं मङ्गलं पुण्यं वृष्यं वर्ण्य ग्रहापहम् ॥

सूत्रस्थानम्, कश्यपसंहिता

अर्थात
स्वर्णप्राशन १मेधा, २अग्नी आणि शक्ती वाढवणारा.
हे जीवनदायी, हितकारक, पुण्यकारक, वृष्य ,
वर्ण्य (त्वचा उजळणारे) आणि ग्रहदुखी दूर करणारे आहे.

१.आकलनशक्ती असाही 'मेधा'चा एक अर्थ आहे. अरबी भाषेत अक्ल शब्द आहे. त्याचा मूळ धातू आहे क्लन. त्याला आ उपसर्ग लागतो आणि आकलन शब्द होतो. हे आकलन म्हणजे मेधा.

एखाद्या घडय़ाळाचे सर्व भाग सुटे केले की एका प्रकारचे ज्ञान होते. तेच भाग पुन्हा जोडले की दुसऱ्या प्रकारचे ज्ञान होते. दोन्ही मिळून होणाऱ्या आकलनाला परिपूर्ण ज्ञान किंवा आकलन म्हणता येईल. असे परिपूर्ण आकलन म्हणजेच आकलन. आधुनिक परिभाषा वापरायची झाली तर ॲनालिसिस आणि सिंथसिस म्हणजे यांचे ऐक्य म्हणजे मेधा. ती ज्या व्यक्तीला प्राप्त होते ती व्यक्ती मेधावी म्हणून ओळखली जाते.

२.अन्नाचे पचन होण्यासाठी तसेच त्यानंतर शरीरातील रसरक्‍तादी धातू नीट तयार होण्यासाठी आणि पांचभौतिक आहाराच्या माध्यमातून पोषण होण्यासाठी शरीरात एकूण तेरा अग्नी असतात. शरीराचे दैनंदिन कार्य चालविण्यासाठी शरीरात अनेक तत्त्वांची योजना केलेली असते. त्यापैकी अती महत्त्वाच्या तत्त्वातील एक तत्त्व म्हणजे शरीरस्थ अग्नी. मुख्य- जठराग्नी

एक महिन्याच्या नियमितसेवनाने लाभ -

" मासात् परममेधावी व्याधिभिर्नच धृष्यते । "

स्वर्णप्राशनाच्या नियमित सेवनाने बालक एका महिन्यात गुणवान बनते आणि विविध आजारांपासून बालकाचे रक्षण होते.

सहा महिन्यांच्या नियमित सेवनाने लाभ -

" षड्भिर्मासैः श्रुतधरः सुवर्णप्राशनाद् भवेत्॥ "

तो सहा महिन्यांत श्रुतधर (ज्याला ऐकलेले सर्व काही आठवतो) बनतो, म्हणजेच त्याची स्मरणशक्ती प्रचंड वाढते.

"_क्ताः प्राश्या मधुघृतप्लुताः ।।
वर्षं लीढा वपुर्मेधाबलवर्णकराः शुभाः।"

एक वर्ष यांचे सेवन केले असता शरीर पुष्टता, मेधा- धारणशक्ति, ताकद व वर्ण -कांती ही वाढतात व हे आरोग्यकारक;कल्याणकारी आहेत.

"पवित्र बृंहणं नेत्र्यं मेघास्मृतिमतिप्रदम् हृद्यमायुष्करं कान्तिवाग्विशुद्धिस्थिरत्वकृत्' ॥

बालवयात हे प्रयोग विशेषतः फायदेशीर ठरतात. वाग्भटांनी त्यांचे सेवन एका वर्षासाठी करण्यास सांगितले आहे, इतर आचार्य त्यांचे सेवन 12 वर्षे योग्य मानतात. किंबहुना, बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती वाढवणाऱ्या योगांमध्ये सोन्याचा प्रभाव सर्वोत्तम आहे.

_ref.A.H.

Why to Consume :
It improves intelligence, cognition, ‘Medha’ and immunity in children!
Prevents viral infections. It improves the vital energy in a child and the child becomes full of positive excitement (Harsha).
It remedies irritation, lack of sleep and anger in children.
Who Can Consume : All children from birth to 16 years

हे स्वर्णप्राशन पुष्यनक्षत्रात उत्तम प्रकारची औषधी निवडून केले जाते. पुष्यन नक्षत्रात सोने आणि औषधावर नक्षत्राचा विशेष प्रभाव असतो. स्वर्णप्राशनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने विषाणूजन्य आणि बॅक्टेरियाच्या संसर्गापासून बचाव करता येतो. स्मरणशक्ती वाढवण्यासोबतच मुलाची पचनशक्तीही वाढवते, त्यामुळे मूल धष्टपुष्ट आणि बलवान बनते. तसेच त्वचा उजळते. म्हणूनच जर एखाद्या बालकाला जन्मापासून ते 16 वर्षे वयापर्यंत स्वर्णप्राशन दिले तर तो मोठा गुणवान बनतो आणि त्याला कोणताही रोग लवकर स्पर्श करू शकत नाही.

"न सज्जते हेमपाङ्गे पद्मपत्रेऽम्बुवद्विषम् ।
जायते विपुल चायुर्गरेऽप्येष विधिः स्मृतः ।। "

पद्मपत्रावर (कमळाच्या पानावर ) जसे पाणी चिकटून रहात नाही.
तसे सुवर्णभक्षकाच्या अंगाला विष चिकटून रहात नाही. त्याचे (सुवर्णाचे) योगाने आयुष्याची वृद्धि होते.

कृत्रिम विषावरदेखिल चिकित्सा सांगताना सुवर्णाचा उल्लेख आहे।

"शर्कराक्षौद्रसंयुक्तं चूर्ण ताप्यसुवर्णयोः ।।
लेह : प्रशमयत्युग्रं सर्वयोगकृतं विषम् । "

फार उग्र कृत्रिम विषाची शांति करिता सांगितलेल्या योगात सुवर्ण मध यांचा समावेश होतो.

सर्वयोगकृतं विष - कृत्रिम विष - दुषी विष।हे कळण्यास काही उदाहरणे e.g. mosquito coil , ent chalk , chemicals, pesticides precipitation in vegetable n food etc.

सर्वात्मनानेत्रबलाययत्नंकुर्वीतनस्याञ्जनतर्पणाद्यैः । दृष्टिश्च नष्टा विविधं जगच्च तमोमयं जायत एकरूपम्  ।। नेत्रांचे बल ...
20/04/2023

सर्वात्मनानेत्रबलाययत्नंकुर्वीतनस्याञ्जनतर्पणाद्यैः ।
दृष्टिश्च नष्टा विविधं जगच्च तमोमयं जायत एकरूपम् ।।

नेत्रांचे बल राखण्याकरिता नस्य, अंजन व तर्पण इत्यादिकांचे योगाने सर्वस्वी झटावे; कारण दृष्टीचा जर नाश झाला तर एका क्षणात विविधरूपात्मक सर्वं जगत् तमोमय व एकरूप होवून जाते.

चक्षूरक्षायां सर्वकालं मनुष्यै- र्यन: कर्तव्यो जीविते यावदिच्छा व्यर्थी लोकोऽयं तुल्यरात्रिन्दिवानाम् पुंसामन्धानां विद्यमानेऽपि वित्ते ।।

जोपर्यंत जिवाची पर्वा आहे तोपर्यंत मनुष्यांनी सदोदित डोळ्यांच्या रक्षणाविषयी यत्न करावा; कारण ज्यास रात्र व दिवस सारखे अशा अंधळ्या मनुष्यास जवळ पुष्कळ पैसा जरी असला तरी हे जग व्यर्थ आहे.

'त्रिफला रुधिरस्रुतिर्विशुद्धि- र्मनसो निर्वृतिरञ्जनं च नस्यम् । शकुनाशनता सपादपूजा घृतपानं च सदैव नेत्ररक्षा ।।

त्रिफळा, रक्तस्राव, वमन, रेचक, मनाचे समाधान, अंजन, नस्य, पक्ष्याचे मांस खाणे, पायांची शुश्रुषा व घृतपान हे नेहमी नेत्ररक्षणाचे उपाय आहेत.

'अहितादशनात्सदा निवृत्ति- भृशभास्वच्चलसूक्ष्मवीक्षणाच्च । मुनिना निमिनोपदिष्टमेत- त्परमं रक्षणमीक्षणस्य पुंसाम् ।।

कुपथ्य पदार्थ कधीहि न खाणे व अत्यंत तेज:पुंज, चंचळ व सूक्ष्म (शिवणकाम, रंगाचे काम वगैरे) पदार्थ न पाहणे हे मनुष्यांच्या डोळ्यांच्या रक्षणाचे उत्तम साधन आहे, निमिमुनीने सागितले आहे.

निरोगी असताहि ज्यास डोळे चांगले रहाण्याची आवड आहे त्याने नेहमी पुढील पदार्थांचे सेवन ठेवावे :- जव, गहू, साळी, साठे साळ व हरीक ही जुनी धान्ये व मूग वगैरे कफ व पित्त यांचा नाश करणारी धान्ये ही पुष्कळ तूप घालून खावी. अशाच प्रकारची भाजी, जांगल मांस, डाळिंब, खडीसाखर, सैंधव, त्रिफळा, मनुका हे पदार्थ, पिण्यास पावसाचे पाणी, छत्री, जोडा व शास्त्रोक्त रीतीने दोषांचे शोधन (वमनादिकांनी)

वेगावरोध, अजीर्णाशन, अध्यशन, शोक, क्रोध, दिवसा निजणे, रात्री जागणे, तसेच विदाही, अवष्टंभक असे अन्न, औषध व चेष्टा ही वर्ज्य करावी.

'द्वे पादमध्ये पृथुसन्निवेशे शिरे गते ते बहुधा च नेत्रे । ताम्रक्षणोद्वर्तनलेपनादीन् पादप्रयुक्तान् नयनं नयन्ति ।। मलोष्णसङ्घट्टनपीडनाद्यै- स्ता दूषयन्ते नयनानि दुष्टाः ।

पायांमध्ये दोन मोठ्या सिरा असून त्या बहुधा डोळ्यांपर्यंत गेल्या आहेत. त्या पायांस लावलेले तेल, तूप वगैरे, उटणे व लेप यांची वीर्ये डोळ्यास पोचवितात. मळ, उष्णता व संघट्टन (पायांस चोळणे) व पीडन (दाबणे) इत्यादिकांनी त्या दूषित झाल्या असता डोळ्यांसहि विकार उत्पन्न करतात.

'भजेत्सदा दृष्टिहितानि तस्मा-दुपानदभ्यञ्जनधावनानि ।।

म्हणून जोडे घालणे, पायांस तूप/तैल लावणे, व पाय धुणे हे
प्रकार डोळ्यास हितावह आहेत. ते नेहमी करावे.

अभ्यङ्गमाचरेन्नित्यं स जराश्रमवातहा ।।७।। दृष्टिप्रसादपुष्ट्यायुःस्वप्नसुत्वक्त्वदार्व्यकृत् ।

रोज अंगास तेलाचा अभ्यंग करावा, तो वार्धक्य, श्रम व वात यांचा नाश करितो, दृष्टि स्वच्छ करितो, पुष्टि देतो, आयुष्य वाढवितो, निद्रा देतो, त्वचा सुकुमार करितो, व शरीर दृढ करितो.

शिरःश्रवणपादेषु तं विशेषेण शीलयेत् ॥
तो मुख्यत्वेकरून डोके, पाय व कान यांचे ठायी नेहमी करावा.

Origin of taste – Rasa utpatti –मधुर, अम्ल, लवण, कडू, तिखट, व तुरट हे षड् रस पंचभूतात्मकच असून प्रत्येकात कोणत्या तरी दो...
14/04/2023

Origin of taste – Rasa utpatti –

मधुर, अम्ल, लवण, कडू, तिखट, व तुरट हे षड् रस पंचभूतात्मकच असून प्रत्येकात कोणत्या तरी दोन महाभूतांचा अंश अधिक असतो. ती भूतद्वये अनुक्रमाने येणेप्रमाणे आहेत - पृथ्वी व जल, पृथ्वी व अग्नि, अनि व जल, आकाश व वायु, अनि व वायु आणि पृथ्वी व वायु.

The tastes are formed due to the combination of two Bhutas (primary elements).
Madhura (sweet) – Prithvi + Ap (earth + water)
Amla (sour) – Tejas + Ap (fire + water)
Lavana (salt) – Ap + Tejas (water + fire)
Tikta (bitter) – Akasa + Vayu (ether + air)
Katu (pungent) – Tejas + Vayu (Fire and air)
Kashaya (astringent) – Prithvi + Vayu (earth + air)

तेषां विद्यादसं स्वादु यो वक्त्रमनलिम्पति । आस्वाद्यमानो देहस्य हादनोऽक्षप्रसादनः ॥ प्रिय: पिपीलिकादीनाम्

जो भक्षण करितांना तोंडास चिकटा, देहास उत्तेजन व इंद्रियांस प्रसन्नता येते व जो मुंग्या, माश्या वगैरेना प्रिय आहे तो(हा मधुर रस जाणावा.

Characteristics of tastes - Rasa Lakshana –

Swadu / Madhura (sweet) is understood by its sticking in the oral cavity, providing a feeling of
contentment and pleasure to the body and comfort to the sense organs. It is liked even by ants.

मधुर रसांचे जन्मापासून सात्म्य (सवय) असल्यामुळे तो धातूंचे बळ अत्यंत वाढवितो. बाल, वृद्ध, उरःक्षती व क्षयी यांना आणि वर्ण , केश, इंद्रिये, कंठ व ओज यांना हितावह व पौष्टिक स्तन्यवर्धक संधानकर (हाडे सांधणारा), जड, आयुर्वर्धक, जीवनीय, स्निग्ध, वातपित्तहारक व विषघ्न आहे. त्याचे अतिसेवन केले असता, तो स्थौल्य, अग्निमांद्य, संन्यास (एक प्रकारची मूर्च्छा) मेह, गळवे, अर्बुदे इत्यादि कफमेदोजन्य रोग उत्पन्न करतो.
Sweet taste being accustomed since birth, produces greater strength in the body tissues. It is very
good for children, the aged, the wounded, the emaciated, improves skin complexion, hairs,
strength of sense organs and Ojas (essence of the tissues, immunity).
Sweet taste causes stoutness of the body, good for the throat, increases breast milk, unites
fractured bones.

तूप, सोने, गूळ, अक्रोड, केळे, नारळ, फालसा, शतावरी, काकोली, फणस, खिरणी, बला, अतिबला, नागबला, मेदा, महामेदा, शालिपर्णी, पृश्निपर्णी, मुद्गपर्णी, माषपर्णी, जीवंती, जीवक, ऋषभक, मोहाची फुले, ज्येष्ठीमध, गोड तोंडली, भुईकोहळा, श्रावणी, महाश्रावणी, क्षीरविरादि, वंशलोचन, क्षीरकाकोली, दुधी, मध, द्राक्षे इत्यादि पदार्थ मधुर वर्गांत येतात.

मधुर पदार्थ (पुढील द्रव्ये खेरीजकरून) प्रायः कफकारक असतात. जुने तांदूळ व जव, मूग, गहू, मध, साखर व जांगल मांस हे मात्र कफकारक नाहीत.

Ghrita (ghee, butter fat), Hema (gold), Guda (molasses),
Akshoda, Mocha, Chocha, Parushaka,
Abhiru, Vira, Panasa, Rajadana,
the three Bala (Bala, Atibala and Nagabala),
The two Medas – Meda and Mahameda,
The four Parni – Shalaparni, Prishnaparni, Mudgaparni, Mashaparni,
Jivanti – Leptadenia reticulata,
Jivaka – Malaxis acuminata D.Don / Microstylis wallichii Lindl. ,
Rishabhaka,
Madhuka – Licorice – Glycyrrhiza glabra,
Madhuka – Madhuka longifolia,
Bimbi – Coccinia grandis / indica,
Vidari – Pueraria tuberosa,
the two Sravani – Mundi and Sravani,
Ksheerasukla, Tugaksiri,
the two Ksheerini, Gambhari,
the two Saha, milk, sugarcane,
Gokshura, Ksaudra, Draksa etc. form the group of sweet substances.

Greeshma Ritucharya (Ayurveda Summer Regimen) Mid May – Mid July:ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्य आपल्या अतितीव्र किरणांनी पृथ्वीच...
14/04/2023

Greeshma Ritucharya (Ayurveda Summer Regimen) Mid May – Mid July:

ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्य आपल्या अतितीव्र किरणांनी पृथ्वीचे रस आकर्षण करून घेतो म्हणून कफ दिवसानुदिवस क्षीण होऊन वायुवृद्धि पावतो.

In Greesma (summer) the sun rays become powerful and appear to be destructive. Kapha
decreases day by day and Vata increases consequently, hence avoid use of salt, pungent and sour
foods, heavy physical exercises and exposure to sunlight, during this season.

यास्तव या ऋतूंत तिखट, मीठ, आंबट, व्यायाम व ऊन यांचे सेवन करू नये.

फक्त मधुर,
लघु,
स्निग्ध,
शीत व द्रव अशा आहारांचे सेवन करावे.

Food which are sweet, light (easy to digest), fatty, cold and liquid should be taken, take
cornflour mixed with cold water and sugar after taking bath in cold water.

Indication for limited use of wine during summer:
Madya (wine) should not be taken; if very necessary, taken in very little quantity or diluted with
more quantity of water; if wine is taken in large doses, it will cause inflammatory conditions, and
it will make the body fragile and weak, increases burning sensation and causes delusion.

थंड पाण्याचे स्नान करावे व भाजलेल्या सातूचे पीठ साखर घालून प्यावे ।
मद्य पिऊ नये, किंवा पिणेच झाल्यास थोडे किंवा खुप जल टाकून प्यावे.
नाही तर ते सूज, शैथिल्य, दाह व मोह इत्यादि विकार उत्पन्न करते.

During summer, boiled rice, which is white in colour, (like full moon) should be eaten along with
meat of animals of desert.
Meat juice (Mamsarasa) which is not very thick,
Rasala (curds churned and mixed with pepper powder and sugar),
Raga (syrup which is sweet, sour and salty) and
Khandava (syrup which has all the tastes, prepared with many substances),
Panaka panchasara, (syrup prepared with raisins (draksha), madhuka, dates (karjura), kasmarya,
and parushaka fruits all in equal quantities, cooled and added with powder of cinnamon leaves,
cinnamon and cardamom etc) and kept inside a fresh mud pot, along with leaves of plantain and
coconut trees, and made sour (fermented) should be drunk in mugs of mud or shell;
Very cool water kept in mud pot along with flowers of patala and karpura (camphor) should be used for drinking.

कुंदपुष्पासारखा किंवा चंद्रसारखा शुभ्र भात जांगल मासाबरोबर खावा.

फार दाट नव्हे असा मांसरस,
श्रीखंड,
निरनिराळ्या तऱ्हेची रायती,
मोरंबे,
कोऱ्या मडक्यात ठेवून गार केलेली, खोबरे व केळ्याच्या फोडी घातलेली व किंचित आंबट अशी सरबते
व मनुका, खजूर, मोहाची फुले, शिवणीची फळे व फालसा यांनी तयार केलेली पंचसार नावांची पानके मृन्मयपात्राने प्यावीत.

गुलाबाचा व कापराचा वास लावलेले थंडगार पाणीहि प्यावे

Food articles like sasanka kirana (hollow, finger-like, fried pastry made of corn flour) should be
taken at night;
Buffalo milk mixed with sugar and cooled by moonlight and the stars should be used for
drinking.

रात्री कर्पूरनाडिका (शेवया) खाऊन वर नक्षत्रांच्या किंवा चंद्राच्या चांदण्यात ठेवून शीतल झालेले म्हशीचे दूध साखर घालून प्यावे.

दुपारी उन्हाचा फार संताप होऊ लागला म्हणजे जेथे मोठमोठाले गगनचुंबी शालतालादि वृक्ष सूर्यकिरणांचा अटकाव करितात, व मोतियांच्या वेलीनी आलिंगित द्राक्षांचे घोस लोबत आहेत अशा उपवनांत जाऊन तेथील आम्रपल्लवांनी व आंब्याच्या घोसांनी व्याप्त व सुगंध शीतल जल शिंपडलेल्या पडद्यांनी युक्त अशा मंडपामध्ये कोमल केळीचे दल, कमलांचे देठ, कहारोत्पलादि कमले यांनी तयार केलेल्या व अनेक तऱ्हेच्या कुसुमपल्लवांनी युक्त अशा पुष्पशय्येवर किंवा जेथे संगमरवरी पुतळीच्या स्तनहस्तमुखांतून वाळयाच्या पाण्याची कारंजी उडत आहेत अशा धारागृहामध्ये शयन करावे.

Day time -
should be spent in forests having tall trees reaching the sky such as shala (Shorea
robusta, Tala – Borassus flabellifera etc, which obstruct the hot rays of the sun, or in houses
around which bunches of flowers and grapes are hanging from their creepers.
Sheets of cloth spreading sweet scented water, are arranged (to fan the air) , all around.
Sleep on soft bed prepared with flowers of banana, kalbara, lotus etc. with fully blossomed
flowers place all over.
Spend the day remaining inside the house cooled by water fountains, water being scented with
usheera (Cus Cus grass), and thereby relieve yourself from the heat of the sun.

Night regimen: At nights, one should sleep on the terrace, facing moonlight. Exhaustion due to
heat of the day is relieved by, anointing the body with paste of sandalwood, wearing garlands,
avoidance of sexual activities, wearing of very light and thin dress, by fanning with fans made
of leaves of Tala or large leaves of padmini (lily) made wet; syringes sprinkling cool water
softly, garlands of flowers of camphor, jasmine and of pearls and beads of white sandal paste,
children, sarika (mynah bird) and shuka (parrot) talking pleasantly; beautiful woman wearing
bangles of soft lotus stalk, blossoms of lotus in their hair, moving about nearby

निशाकरकराकीर्णे सौधपृष्ठे निशासु च ।।

रात्री जेथे चांदणे पडले आहे अशा गच्चीवर जाऊन बसावे.

21/05/2021

*म्युकरमायकोसिस होण्याची ठळक 5 कारणे व त्यांचे निराकरण:- आयुर्वेदीय दृष्टिकोनातून*

1. कोविड मध्ये वापरलेल्या औषधांमुळे कमी झालेली प्रतिकार शक्ती. 😥😥

👉🏻आजार बरा झाला असला तरी त्यानंतर त्यामळे विस्कटलेली शरीराची घडी नीट करणे या बद्दल च्या योजना आयुर्वेद शास्त्रात आहेत. त्यासाठी ताप जाऊन 15 ते 20 दिवस झाले असल्यास तुपाचा योग्य वापर आहारात करावा. आपल्या आयुर्वेद वैद्याकडून जीर्ण ज्वरा च्या चिकित्सेचा प्रोटोकॉल तयार करून घ्यावा.
शिवाय सर्व औषधोपचाराची माहिती वैद्यांना देऊन शरीराचे सार संहनन पूर्ववत करण्यासाठी रसायन औषध सुरू करावे.

2. कोविड काळात व नन्तर सुद्धा शरीराच्या स्वच्छतेकडे झालेले गंभीर दुर्लक्ष!!!!

👁️👁️कोव्हिड काळात झालेले स्वच्छतेकडे दुर्लक्ष भरून काढण्यासाठ शक्य तेवढया प्रमाणात आयुर्वेदीय जीवनशैली आचरणात आणावी. त्यातही
**अभ्यंग* (सर्वांगास औषधी तेल लावणे)

**योग्य काष्ठऔषधींनी दंतधावन* (दातांना ब्रश करणे)

**गंडूष* (औषधींच्या काढायच्या गुळण्या करण्याचा प्रकार)

**नस्य* (नाकामध्ये औषध प्रविष्ट करणे)

**अंजन* (काजळ लावल्या प्रमाणे डोळ्यांना लावायची औषधे)

**धूपन*
या आयुर्वेदातील वैशिष्ट्य पूर्ण उपक्रमांद्वारे बुरशी शरीरात वाढण्यास वावच रहात नाही.

3. पुन: पुन्हा एकच मास्क वापरणे 😷😷

👁️👁️बहुतांशी लोक कापडी मास्क वापरतात त्याची योग्य स्वच्छता ठेवावी..त्याला कडक इस्त्री करणे हा सुद्धा एक चांगला उपाय आहे.तरी आयुर्वेदातील धुपन द्रव्यांनी त्याचे धुपन रोज केल्यास त्यामार्गे बुरशी शरीरात जाण्यास आळा बसतो.

4. कोव्हिडं मध्ये व नंतर चुकीच्या पद्धतींत केलेले आहारसेवन 🍗🍖🥒🥝

👁️👁️आहाराची मात्रा व स्वरूप, जड आहार, सहज न पचणारा विष्टम्भी आहार याचे ज्ञान सामान्य माणसांना नसते.आणि या जर्जर शरीरात असा आहार रोज गेल्यास आम हा विषारी पदार्थ शरीरात तयार होतो यामुळे शरीरात कृमी (बुरशीचे मोल्स या प्रकारात मोडतात)वाढण्याची शक्यता असते. जीर्ण ज्वरासह पूर्वी झालेल्या आमाच्या अजीर्णाचे analysis वैद्य योग्य पद्धतीने करतात. आपण ते लवकरात लवकर करून घ्यावे व त्यावर वैद्याच्या सल्ल्याने उपाय योजना सुरू करावी

5. अतिप्रमाणात चिंता करणे,पुरेशी झोप न घेणे. 😞😔

👁️👁️शरीराच्या स्वास्थ्या सोबत मनाचे स्वास्थ जपणे फार गरजेचे आहे. या गोष्टीकडे 99℅ वेळा दुर्लक्ष होते. डोळ्यांच्या आजारात या बाबतीतला निष्काळजीपणा अंधत्वाचा धोका वाढवतो. योग्य समुपदेशन, शिरोधारा, पादाभ्यंग या गोष्टीनी लवकरात लवकर वरील बाबींचे निराकरण होते.
👁️👁️
हे मुद्दे संक्षेपाने लिहिलेले आहेत.या पुढे यावरील प्रत्येक मुद्द्यावर विस्तारित लिहिले जाईल.
या pandemic मध्ये उदभवलेल्या या भयानक आजाराला तोंड देण्यासाठी आयुर्वेद समर्थ आहे. अथ पासून इति पर्यंत अगदी सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी लक्षात घेऊन या जीवघेण्या आजारावर आयुर्वेदाच्या साथीने मात करता येऊ शकते

👁️👁️
वैद्य संदीप जाधव M.S. (आयुर्वेद-नेत्र)
ऋषिप्रणीत आयुर्वेदीय नेत्र चिकित्सालय, सातारा.

04/01/2021

"An apple a Day keeps Doctor away "- *एक शुध्द फसवणूक.*
😳😳😳😳

१. सफरचंद या मातीतील नव्हेच !
भारतातील केवळ हिमाचलप्रदेश आणि काश्मीर या दोन राज्यांत लागवड होऊ शकणारे सफरचंद हे फळ आज सर्व राज्यांत बाराही महिने उपलब्ध आहे. त्याचे झाड कसे दिसते ? त्याची पाने कशी असतात ? फुलोरा कसा असतो ? यांविषयी आम्हाला काहीही माहिती नाही; कारण ते मुळात भारतातील फळच नाही. इंग्रजांनी आपल्या समवेत ते भारतात आणले आणि या दोन राज्यांतील अती थंड वातावरण त्या फळाला पोषक असल्याने, ते झाड येथे राहिले, जसा चहा राहिला !

२. आरोग्यदृष्ट्या अत्यल्प उपयोगी, तरी केवळ
व्यापारी गुणधर्मामुळे जगभर प्रसिद्ध पावलेले फळ
अन्य फळांप्रमाणे सफरचंद कच्चे कधी, पक्के कधी, हे कळत नाही; कारण त्याचा रंग, रूप, वास आणि चवही पालटत नाही. अन्य कोणतेही कडक फळ पिकल्यानंतर मऊ होते, उदा. कैरीचा आंबा होतो किंवा मऊ फळ पिकल्यावर टणक होते, उदा. मऊ शहाळ्याचा टणक नारळ होतो. केवळ अधिक काळ टिकणे, या सफरचंदाच्या व्यापारी गुणधर्मामुळेच ते जागतिक स्तरावरील फळ झाले आहे. प्रत्यक्षात त्या फळात कोणतेही विशेष औषधी गुणधर्म नाहीत. भारतीय फळांमध्ये मात्र असे औषधी गुणधर्म पुष्कळ आहेत.

३. ‘दैनंदिन एक सफरचंद डॉक्टरला दूर ठेवते’, ही म्हण सपशेल फसवी !
अती थंड प्रदेशांत सफरचंदापेक्षा दुसरे मोठे फळच पिकत नाही. लिची, स्ट्रॉबेरी, मलबेरी, चेरी अशी अन्य जी फळे तिथे पिकतात, ती अगदीच लेचीपेची, नाजूक आणि न टिकणारी असतात. त्यातल्या त्यात सफरचंद जरा मोठे दिसणारे आणि टिकाऊ; म्हणून म्हणे त्यावर संशोधन केले गेले आणि म्हण रूढ केली गेली, ‘अ‍ॅन अ‍ॅपल अ डे, कीप्स द डॉक्टर अवे’ म्हणजे दैनंदिन एक सफरचंद डॉक्टरला दूर ठेवते. ही म्हण सफरचंद जिथे पिकते तिथेही लागू होत नाही; कारण प्रतिदिन सफरचंद खाल्ले जाते अशा थंड विदेशी प्रदेशांत विकार आणि रुग्ण यांची संख्या भारताच्या तुलनेत अधिक आहे. फळांच्या गुणांवरून एखादी म्हण भारतासाठी बनवायची झाल्यास ‘अ‍ॅन आवळा अ डे, किप्स द डॉक्टर अवे’ म्हणजे दैनंदिन एक आवळा डॉक्टरला दूर ठेवतो, अशी हवी !

४. भारतीय फळांच्या तुलनेत सफरचंद टाकाऊच !
आयुर्वेदानुसार आंबा हा जर फळांचा राजा असेल, तर डाळिंब हा महाराजा आहे; पण आज इंग्रजाळलेल्या वैद्यकानुसार आमचा आवळा आणि डाळिंब बिचारे मागे पडलेत. त्यांना कोणी गॉड फादर नाही किंवा कोणी साखरसम्राटांचा लॉबीवाला नाही ! अर्थात, यामुळे त्यांचे गुण काही अल्प होणार नाहीत. असो. भारतात सर्वत्र मिळणार्या, कोणत्याही फळांच्या तुलनेत सफरचंद हे फळ टाकाऊच आहे, हे मात्र खरे !

५. थंड प्रदेश सोडून अन्यत्र सफरचंद खाणे, म्हणजे विविध विकारांना आमंत्रण देणे !
सफरचंदाची स्तुती करणार्या स्तुतीपाठकांनी एक लक्षात घ्यावे, जिथे पिकते तिथेच ते मानवते, हा आयुर्वेदातील एक न्याय आहे. जिथे हे सफरचंदाचे झाड उगवते, तेथे बाराही महिने अती थंड वातावरण असते. त्या झाडाच्या मुळांशी बर्फ असतो. यामुळे आपल्या अंगी वात वाढविणारे गुण घेऊनच हे फळ जन्माला येते ! त्यामुळे सफरचंद खाणार्या व्यक्तींना आणि बालकांना वारंवार सर्दी होणे, नाक गळणे, कानातून पाणी येणे, घशातील गाठी वाढणे, लघवीचे विकार, मधुमेह यांसारखे रोग प्रकृतीनुसार अल्प-अधिक प्रमाणात होतच रहाणार. त्यांच्या आहारातून केवळ सफरचंद जरी बंद केले, तरी हे विकार बहुतांशी न्यून होतात, असा अनेक वैद्यांचा अनुभव आहे.

६. मेणाचा थर देऊन कृत्रिमपणे टिकवलेले सफरचंद पोटातील विकारांना आमंत्रण देणारे
सफरचंद अधिक काळ टिकण्यासाठी त्यावर काही रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यावर अती पातळ असा मेणाचा थर दिला जातो. त्यामुळे त्यावरील सुरकुत्या दिसत नाहीत, ते वाळलेले वाटत नाही आणि दिसायला चकचकीत दिसते. मेणाच्या थरामुळे बाह्य वातावरणाचा फळाच्या सालीशी संपर्क येत नसल्याने त्यातील पाण्याचा अंशही अधिक दिवस रहातो आणि ते टिकाऊ बनते; पण हाच टिकाऊपणा शरिराला टाकाऊ बनवतो ! त्यातील पातळ मेण आणि अन्य बुरशीजन्य वाढ डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे असे सफरचंद मलावरोध, लघवी तुंबणे वा आतड्यांच्या विकार यांना कारणीभूत होते. हा थर ओळखण्यासाठी सफरचंद उष्ण पाण्यात टाकल्यास मेणाचा तवंग स्पष्टपणे पाण्यावर तरंगतांना दिसतो किंवा विकत घेतांना हळूवारपणे नखाने घासल्यास त्यावरील मेण नखांना लागते.

७. पाश्चमात्त्य सफरचंदाला त्याहून सरस असे भारतीय पर्याय
भारतात प्रत्येक ऋतूनुसार निर्माण होणारी करवंद आणि जांभूळ यासारखी फळे आहेत. कोकणात फणस, आंबा, काजू; तर घाटमाथ्यावर द्राक्षे आणि चिकू आहेत, तसेच बारमाही पिकणारी केळी, अननस, पपई, असा अनेकविध स्वस्त फळांचा सक्षम पर्याय सफरचंदासाठी उपलब्ध आहे, तरी बाहेरून आयात कराव्या लागणार्या, पाश्चात्त्यांंच्या महागड्या सफरचंदाच्या मागे लोक आणि डॉक्टरसुद्धा का लागतात, हेच कळत नाही !

– वैद्य सुविनय दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग.

च्यवनप्राश एक लोकप्रिय रसायन आहे...रसायन म्हणजे नक्की काय?रसायन चिकित्सेने काय होईल?...आयुर्वेदानुसार...रसायनाची परिभाषा...
01/12/2019

च्यवनप्राश एक लोकप्रिय रसायन आहे...
रसायन म्हणजे नक्की काय?
रसायन चिकित्सेने काय होईल?...

आयुर्वेदानुसार...

रसायनाची परिभाषा-

लाभोपायो हि शस्तानां रसादीनां रसायनम् ||

ज्या उपायांनी किंवा साधनांनी शरीरात प्रशस्त रस-रक्तादी धातूंची प्राप्ती होत त्यांना रसायन म्हणतात.

दीर्घमायुः स्मृति मेधामारोग्यं तरुणं वयः । प्रभावर्णस्वरीदार्य देहेन्द्रियबलं परम् ॥ वाक्सिद्धि प्रणति कान्ति लभते ना रसायनात्।

रसायनाचे लाभ-रसायन सेवनाने पुरुषाला दीर्घायु, तीव्र स्मृती, उत्तम धारणाशक्ती, आरोग्य, तरुणावस्था, उत्कृष्ट प्रभा, उत्तम वर्ण, सुंदर स्वर उत्च कोटीचे शारीरिक आणि मानसिक बल, वाक्सिद्धी (जे बोलेल तसे घडणे), लोकवंदिता आणि कांती प्राप्त होते.
सामान्यत: ज्यामुळे शरीरातील आठ सार (रस-रक्तादी) संपन्न होतात आणि उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य स्थापित होते त्या औषधांना किंवा साधनांना किवा आचारांना रसायन म्हटले जाते, शाङ्कघरांनी वार्धक्य आणि रोग नष्ट करणाऱ्या औषधांना रसायन म्हटले आहे. 'यज्जराव्याधिविध्वंसि भेषजं तद्रसायनम्' ।
रसायनाचे मुख्य कार्य दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देणे हे आहे.
आचार्य डल्हणांनी औषध द्रव्यांतील रस वीर्य-विपाकादींमुळे होणाऱ्या लाभोपायांना रसायन म्हटले आहे .

च्यवनप्राशाची फलश्रुती-हे रसायन खोकला (कास) आणि दमा (वास) या रोगांना नाहीसे करण्यात विशेषत्वाने प्रशंसनीय आहे. हे रसायन बलहीन. क्षीण उर:क्षताचे रोगी, वृद्ध आणि बाल यांच्या अंगांचे संवर्धन करते. स्वरक्षय, उरोरोग, होग, वातरक्त, पिपासा, मूत्रविकार, मूत्राशय आणि शुक्राशय दोष हे रसायन दूर. करते. रोग्याच्या बलानुसार या रसायनाची अशी मात्रा (12 ते 20 ग्रॅम) ठेवावी. की त्यामुळे भोजन मात्रेत अडथळा येऊ नये.

या च्यवनप्राशाच्या प्रयोगाने जीर्णशीर्ण शरीराच्या अत्यंत वृद्ध च्यवनधीना पुनः युवावस्थासंपन्नता प्राप्त झाली, याच्या सेवनाने धारणा शक्ती, स्मरणशक्ती, कांती, आरोग्य, दीर्घायु, इंद्रिय बल,संतुष्ट करण्याची क्षमता, अत्यानंद (प्रहर्ष), जठराग्नी प्रदीप्त शरीर वर्ण प्रसन्नता व वायूचे अनुलोमन होते.

कुटी प्रादेशिक विधीने या रसायनाच्या प्रयोगाने वृद्ध पुरुषसुद्धा जराजीर्ण शरीर सोडून नवयौवन रूप प्राप्त करतात.

रसायन सेवनाचे फल-

न जरां न च दौर्बल्यं नातुयं निधनं न च । जग्मु वर्ष सहस्राणि रसायनपराः पुरा ||

ज्याप्रमाणे देवतांसाठी अमृत आणि नागांसाठी सुधा आहे त्याप्रमाणे प्राचीन काळी महासाठी रसायन विधी हातात त्या प्राचीन काळात रसायन करीत असल्याने त्यांना वृद्धावस्था दुर्बलता, रुग्णता आणि मृत्यू या कशाचाच त्रास झाला नाही व असे हजारो वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले होते.

न केवलं दीर्घमिहायुरश्नुते रसायनं यो विधिवनिषेवते।
गति स देवर्षिनिषेवितां शुभां प्रपद्यते ब्रह्मा तथेति चाक्षरम् ॥
जो मनुष्य विधिपूर्वक रसायनप्रयोगाचे सेवन करते तो केवळ दी्षायु उपभोगतो असे नसून तो देवांना प्राप्त झालेली शुभगतीसुद्धा प्राप्त करती. एवडेच नाही तर तो अनवर ब्रह्म ।
(पदमोक्ष)सुद्धा प्राप्त करतो.

रसायन प्रयोग जीवनप्रद आहे. या रसायनाचा प्रयोग अचित्य अदभुत आहे. त्याच्या प्रभावाने दीर्घायुष्य आणि आरोग्य प्राप्त होते. याच्यामुळे युवावस्था प्राप्त होते. या रसायन क्रियेने निद्रा, तंद्रा, श्रम, क्लम, आलस्य आणि दौर्बल्य दूर होते. वात-
पित्त-कफ साम्यावस्थेत येतात. शरीर दृढ होऊन त्याला स्थैर्य प्राप्त होते. यामुळे मांस पेशीतील शिथलता दूर
होते. जठराग्नी प्रज्वलित होती. या रसायन प्रयोगामुळे शरीरकांती, शरीरवर्ण आणि स्वर उत्तम होतो. या
रसायन सेवनाने (वृद्ध-जराजर्जर) च्यवनप्रभृती ऋषिगणांना पुनः यौवनावस्था प्राप्त झाली . त्यांचे शरीरावयव सम, सुंदर, सौष्ठवपूर्ण, मांसोपचित झाले. शरीर स्थिर झाले. त्यांची सर्व इंद्रिये प्रसन्न आणि शरीन बलवान आणि तेजस्वी व्णायुक्त झाले. त्यांच्या पराक्रमाला कोठही अडथळा झाला नाही व तो अपराजित पराक्रम होता. ते दृढकाय असल्याने सर्व प्रकारचे
कष्ट सहन करू शकत होते.

सत्यवादी, अक्रोधी, मद्य व मैथुननिवृत्त, हिंसाविरक्त, अतिश्रमकारक कार्यविन्मुख, शांतचित्त, प्रियवाची, जप करणारे, पवित्राचरणी, धैर्यवान, दानशील, तपस्याकर्ते, देवाय-गो-ब्राह्मण-आचार्य गुरुजन व वृद्धजन यांची सतत पूजा आणि सेवा करणारे, अक्रूर व्यवहारी, नित्य करुणाभाव व्यवहारी,
नियमितपणे योग्य वेळी व योग्य तितकी झोप घेणारे,
योग्य वेळी उठणारे, नित्य घृत-दुग्ध सेवन करणारे,
देश-कालाची परिस्थिती जाणणारे, एखादे कार्य करण्यासाठी त्याचे उत्तम पूर्वनियोजन करणारे, निरहंकारी,
उत्तम व्यवहारसंपन्न, संकुचित वृत्ती नसणारे, आध्यात्मिक विषयांकडे इंद्रियप्रवृत्त करणारे, वृद्ध, आस्तिक आणि
जितेंद्रिय पुरुषांशी सत्संग करणारे, तसेच धर्मशास्त्र स्वाध्यायात निमग्न असणारे-अशा गुणांनी युक्त ।
असणाऱ्या व्यक्ती नित्य रसायनसेवी आहेत असे समजावे.
जी पूर्वोक्त गुणयुक्त व्यक्ती रसायन सेवन करते तिला
रसायनाच्या वेळी पूर्वी सांगितलेले ते सर्व रसायन गुण मिळतात.

सामान्यतः जी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दोष दूर न करताच रसायन योगाचे सेवन करते तिला रसायनापासून होणाऱ्या सर्व लाभांची प्राप्ती होऊ शकत नाही. वार्धक्य आणि रोग दूर करणारे तसेच आयुर्वृद्धी करणारे हे रसायन योग आहेत. त्यांच्या सेवनाचा सर्वागीण लाभ केवळ मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या शुद्ध आणि संयतचित्त असणाऱ्यांनाच होतो. म्हणून रसायने निरोगी, द्विजाती नसणाच्या,
सेवाभावी मनोवृत्ती नसणाऱ्या, पतितात्मा असणाऱ्या व पापी व दुष्कर्मी लोकाना सांगू नयेत.

फराळ खावा की टाळावा?खाण्यापिण्याची सर्वाधिक चंगळ असलेला कोणता सण असेल तर तो म्हणजे दिवाळी. लाडू, करंजी, शंकरपाळे, चिरोटे...
29/10/2019

फराळ खावा की टाळावा?

खाण्यापिण्याची सर्वाधिक चंगळ असलेला कोणता सण असेल तर तो म्हणजे दिवाळी. लाडू, करंजी, शंकरपाळे, चिरोटे, अनारसे इथपासून चिवडा, चकली, शेव, कडबोळी इथपर्यंत अनेक पदार्थ घरोघरी हौशीनं बनवले जातात, एकमेकांना दिले जातात आणि त्यांचा चवीनं आस्वाद घेतला जातो. यातले बहुसंख्य पदार्थ हे तळलेले आहेत. मग इतक्या विविध प्रकारचे पदार्थ केवळ दिवाळीतच का करायचे आणि खायचे, असा प्रश्न पडतो.
थंडीचे दिवस आणि वाढणारी भूक दिवाळी हा थंडीच्या दिवसात येणारा सण आहे. थंडी सुरू झाली की हवेत खूप गारवा निर्माण होतो, हा गारवा आपलं शरीर सहन करू शकत नाही म्हणून ऊब टिकवून ठेवण्याचे शरीराचा प्रयत्न असतो.

एरव्ही जेव्हा आपल्याला खूप गरम होत असतं तेव्हा शरीराचा तापमान कमी करण्यासाठी रोमरंधं उघडून घाम बाहेर टाकले जाते. याउलट प्रक्रिया हिवाळ्यात घडते.रोम रंध्रे बंद झाली की स्वेदग्रंथींचं काम बंद होतं आणि घाम येत नाही. त्यामुळे शरीराचं एक ठरावीक तापमान, ऊब टिकवून ठेवले जाते. या सगळ्या प्रक्रियेचा परिणाम जठराग्नी वरही होतो आणि तो तीक्ष्ण होतो. त्याची अन्नपचन करण्याची क्षमता चांगलीच वाढते. त्यामुळे घेतलेला आहार लवकर पचतो आणि पुन्हा भूक लागते. तसे ही बाहेर गारठा असल्यामुळे तहान फार लागत नाही
आणि साहजिकच पाणीही कमी प्यायलं जातं. त्यामुळे पोट भरल्याची संवेदनाही लवकर येत नाही. आहार जास्त प्रमाणात घेता येतो.

यामुळेच एरव्ही पचायला जड वाटणारे पदार्थ किंवा अगदी कमी
प्रमाणात खाल्ले तरी पोट भरलं अशी संवेदना निर्माण करणारे पदार्थ थंडीत मात्र अधिक प्रमाणात खाता येतात.
दुसरीकडे हवेत आणि शरीरात दोन्हीकडे भरपूर कोरडेपणा, रूक्षता वाढल्यामुळे स्निग्ध पदार्थ खाण्याची आपोआप इच्छा होते आणि गरजही असते. त्यामुळे तेल किंवा तूप वापरून बनवलेले, तळलेले आणि विशेषकरून पौष्टिक असे तिखट किंवा गोड दोन्ही चवीचे पदार्थ खाणे या दिवसांत विशेष उपयुक्त आहे.
दिवाळीतल्या फराळामागचं शास्त्र दिवाळीत केले जाणारे सगळे फराळाचे पदार्थ हे हेच मूळ तत्त्व लक्षात घेऊन ठरवलेले आहेत. तांदूळ, सर्व प्रकारच्या डाळी, बेसन, तीळ, साखर, खसखस, वेगवेगळे सुकामेव्याचे पदार्थ, शेंगदाणे, डाळ्या असे
सगळ्या प्रकारचे मूळ घटक वापरून अनेकविध चवीढवीचे पदार्थ
दिवाळीसाठी केले जातात.

वास्तविक तळलेले पदार्थ पचायला जड होतात; पण हिवाळ्यात तीक्ष्ण झालेल्या अग्नीला अशी पौष्टिक पदार्थांची आहुती दिली तरच तब्येत उत्तम राहते, नाही तर मग हा अग्नी शरीरात साठवून ठेवलेल्या मेदाचे, चरबीचं पचन करतो आणि वजन कमी होऊ शकतं. दिवाळीत सकाळच्या वेळी फराळ करण्यामागे हे शास्त्र आहे. एरव्ही सकाळी घाईच्या वेळी पोहे, उपमा खाणारे आपण दिवाळीत मात्र सकाळच्या वेळी फराळाचे पदार्थ घेतो आणि निवांतपणे खातो. लाडू, चिवडा, चकली, करंजी, कडबोळी, शंकरपाळी, अनारसे असे कितीतरी पदार्थ आवडीनं खाल्ले जातात.

डाएट चे फॅड ला फराळ मात्र अपवाद:

हल्ली डाएट चे वेगवेगळे प्रकार उदयाला येत असतात. त्यात उगीचच आणि शास्त्रीय तथ्य जाणून न घेता दिवाळीच्या पदार्थांनाही गोवलं जातं. उगीचच तेलकट पदार्थ खायचे, तुपात घोळले बेसन लाडू
खायची, हौस करायची इतकं हे पोकळ शास्र किंवा रूढी नाही! जी शरीराची त्या काळात गरज आहे ती इतक्या सुंदर पद्धतीनं रूढी
परंपरांमध्ये गुंफली आहे की प्रत्येकजण दिवाळी फराळाचे पदार्थ
खातोच! 'हल्ली काय बारा महिने बाजारात दिवाळी फराळाचे पदार्थ मिळतात, पुन्हा काय तेच खायचं दिवाळीत! आम्ही मस्त पिझा, पास्ता, लसानिया, केक, पाव भाजी असे वेगवेगळे प्रकार बनवून खातो!' असं म्हणणारी आणि खाणारे पूर्ण चुकीचे आहे! उत्तम प्रतीचे, चवीचे आणि पौष्टिक न खाता असे फुसके पदार्थ दिवाळीत खाणे चुकीचे आहे.
विशेषत: लहान मुलांना या दिवसात चांगली वाढ होण्याच्या दृष्टीने पौष्टिक आहाराची गरज असते. त्यामुळे त्यांना हे पदार्थ मनसोक्त खाऊ द्यावेत.

या पदार्थांमुळे शरीराची झीज भरून येते, ताकद वाढते. वृद्ध व्यक्तींची पचनशक्ती जरी थोडी कमी असली तरी त्यांनाही अशा पोषक आहाराची गरज असते. त्यामुळे कमी प्रमाणात, त्यांना सोसेल, झेपेल इतपत हे सगळे पदार्थ खायला-द्यायला हरकत नाही. आपल्या भारतीय
हवामानानुसार आपण खात असलेले पदार्थ, ऋतू यांचा निश्चित असा एक संबंध आहे. त्यामुळे आपलं स्वास्थ्य उत्तम राखायची इच्छा असेल तर आपण दिवाळी आणि फराळ ही परंपरा सोडू नये हेच उत्तम!
फक्त एकच धोक्याची घंटा काहीही शारीरिक हालचाल, शम न करता नुसताच पौष्टिक आहार आणि तोही भरपूर मात्रेत घेत राहिलं तर स्थूलता आणि त्याच्या हातात हात घालून येणारे हृदयविकार, मधुमेह असे व्याधी हे मुक्कामी येऊ शकतात. म्हणून उत्तम आहाराबरोबरच व्यवस्थित व्यायाम, शारीरिक श्रम करणेदेखील गरजेचा आहे. ज्यांनी याचा उत्तम प्रकारे मेळ घातला त्यांना उत्तम आरोग्याची दिवाळी भेट मिळणार हे मात्र निश्चितच!

-वैद्य राजश्री कुलकर्णी

Address

श्री ब्रह्मांडनायक Shree Bramhandnayak Plot No 28 REWATKAR-LAY-OUT, Bypass Nagpur Road, Dist/Nagpur
Umred
441203

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री ब्रह्मांडनायक - आयुर्वेदीय व पंचकर्म चिकित्सालय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to श्री ब्रह्मांडनायक - आयुर्वेदीय व पंचकर्म चिकित्सालय:

Share

Category