14/06/2021
नाणोस गावात ४५ वर्षांवरील नागरीकांचे लसिकरण मोहिम.
प्राथमिक आरोग्य केंद्र मळेवाड यांच्या सहकार्याने,
ग्रामपंचायत नाणोस आणि कोकण फार्मास्युटिकल नाणोस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाणोस गावात लसिकरण मोहिम आज संपन्न झाली.
#नाणोस, #तिरोडा गावातील ४५ वर्षावरील बहुतांश नागरीकांनी #कोविड प्रतिबंधात्मक #लसिकरण घेऊन सकारात्मक प्रतिसाद दर्शविला #नाणोस, #तिरोडा गावातील सर्वांचे मनापासून आभार या लसिकरणाचे औपचारिक उद्घाटन आरोग्य सेवक श्री सुशांत कामत, माझी. सरपंच श्री सोमकांत नाणोसकर, ग्रामसेवक श्री ज्ञानेश करंगुटकर, नाणोस सरपंच श्री वासुदेव जोशी, उपसरपंच श्री संजय नाणोसकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री सागर नाणोसकर, पोलिस पाटील श्री लवू रगजी, परीचारीका सौ अमिता आरोलकर, आरोग्य सेविका सौ जोस्ना नवार, आरोग्य सेविका सौ सिमाली गवाणकर, आशाताईं सौ उर्मिला तळकर, सदस्य सौ विद्या नाणोसकर, सौ रसिका जोशी आदि मान्यवर आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
अजुनही #लसिकरणाबाबत खुप गैरसमज आहेत तरी एकमेकांना लसिकरणाचे महत्व पटवून देवून आपल्या गावातील प्रत्येकाला लसिकरण करण्यास प्रवृत्त करणे आवश्यक आहे.
लसिकरण केले तरच धोका आटोक्यात येण्यास मदत होईल.
या परीस्थितीत हेवेदावे विसरून एकमेकांना सहकार्य करा मदतीचा हात पुढे करा जेणेकरून आपले जिवाभावाचे नातेसंभद घट्ट होतील.
ग्रामपंचायत नाणोस.
Covid-19 Vaccine Study