08/10/2025
होमिओपॅथ आई!!!
दिनांक 29 सप्टेंबर 2025 सोमवारची सकाळ. 9 वर्षाच्या मुलीला शाळेत जाण्यासाठी उठवायला गेले असता आधीच शाळेत जाण्याची नकार घंटा.
तिचा उतरलेला चेहरा बघून काहीतरी बिघडल्याचा अंदाज आला. नको जाऊ शाळेत म्हटल्यावर पुन्हा झोपली.
थोड्या वेळाने चेक केलं तर ताप आला होता. तापाचे सत्र चालू झाले. नेहमी 48 तासांमध्ये होमिओपॅथिक औषध घेऊन फरक पडत असताना यावेळेस काही केल्या ताप कमी होईना. 104°फॅरेनहिट पर्यंत ताप होता. त्यामुळे तापाचे औषध (Ibugesic Plus) चालू केले. त्याच बरोबर रक्त तपासणी करून घेतली. रिपोर्टमध्ये सर्व नॉर्मल आले. बुधवारी रात्री एक होमिओपॅथी औषध दिल्यानंतर ताप गुरूवार रात्री पर्यंत कमी आला.
शनिवार 4 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री अडीच वाजता पुन्हा अंग गरम लागले, ताप 102° फॅरेनहिट. ताप आल्यानंतर यावेळेस नेहमी पेक्षा वेगळेच झाले आहे याची पक्की खात्री झाली. शनिवारी सकाळी औषध चालू करून रक्त तपासणी पुन्हा पाठवली. रिपोर्ट मध्ये प्लेटलेट काउंट आणि पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या. शनिवारी पुन्हा होमिओपॅथी औषध सुरू केले, रविवारी सकाळपर्यंत ताप कमी झाला.
शनिवारी लघवी तपासणी मध्ये प्रोटीन्स आले. आतापर्यंत डेंग्यू मलेरिया टायफाईड यांची टेस्ट निगेटिव्ह आली होती. सोमवारी पुन्हा रक्त तपासणी केले असता डेंग्यू पुन्हा निगेटिव्ह आला आणि प्लेटलेटची संख्या पुरेशी व पांढऱ्या पेशी वाढल्या.
या सर्व दरम्यान मुलीचे खाणे पिणे पूर्णपणे बंद झाले होते त्यामुळे मुलीच्या वडिलांची म्हणजेच बाबांची चिडचिड वाढली, "माझी मुलगी खात पीत नाही तिचे वजन कमी झाले, आपण हिला बाहेरच्या दवाखान्यात घेऊन जाऊ, औषध सुरू करून ही लवकर बरी होईल."
पण मुलीला बाहेरचे औषध घेण्याची अजिबात इच्छा नसते आणि तिचा आई वरचा विश्वास की आई मला तिच्या औषधानेच (होमिओपॅथी ) बरं करेल.
मुलीने दाखवलेल्या विश्वासामुळे माझा आत्मविश्वास वाढला, परंतु बाबांना मुलीला पाहून खूप अस्वस्थ वाटत होते, आणि हे साहजिकच होते. "लेक म्हणजे बाबाचा जीव की प्राणच."
माझ्याकडून छोटीशी सुद्धा चूक होऊ नये म्हणून मी माझ्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करूनच औषध देत होते.
या सर्व अनुभवावरून माझा होमिओपॅथी औषध पद्धतीवर असणारा विश्वास अजूनच घट्ट झाला आहे आणि खूप काही शिकायला सुद्धा मिळाले.
धन्यवाद.
डॉ तृष्णा
एम. डी. होमिओपॅथ.
8850618275.