15/10/2025
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग,महाराष्ट्र शासन व आयुष संचालनालय,महाराष्ट राज्यद्वारा पुरस्कृत,आयुर्वेद जनजागृती अभियानांतर्गत,साई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित,साई आयुर्वेद कॉलेज,वैराग तर्फे दिनांक १४ ऑक्टोंबर २०२५ रोजी कायचिकित्सा विभागातर्फे सासुरे -वैराग,तालुका-बार्शी येथे सामान्य नागरिकांसाठी ,
या कार्यक्रमात, डॉ. सागर डोके सहाय्यक प्राध्यापक, कायचिकित्सा विभाग, साई आयुर्वेद कॉलेज ,वैराग यांनी मधुमेह आणि उच्य रक्तदाब हे रोग कसे होतात आणि त्याचा प्रतिबंध कसा करावा याची माहिती दिली व सोबत रुग्णतपासणी करून औषधेही दिली . सासुरे गावातील मधुमेह स्थौल्य उच्च रक्तदाब व इतर विकाराच्या एकूण ६० लोकांनी उपस्थिती नोंदवून या तपासणीचा लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई आयुर्वेद कॉलेज ,वैराग च्या संस्थापिका डॉ. मीरा सूर्यवंशी मॅडम, प्राचार्य डॉ. साहेबराव गायकवाड सर ( विभागप्रमुख), डॉ. परिणीती कल्याणी (प्रपाठक), डॉ. संध्या माने (प्रपाठक), डॉ. अनुपमा भोसले ( सहाय्यक प्राध्यापक) यांचे मार्गदर्शन लाभले आणि इंटर्नस आणि हॉस्पिटल स्टाफ यांनी सहकार्य केले.