20/10/2025
नमस्कार , आमचा एक छोटासा प्रयत्न जनजागृती साठी.
आज १९ ऑक्टोबर २०२५ , या नैसर्गिक आपत्ति, कौटुंबिक, आर्थिक, मानसिक, सांस्कृतीक, बेरोजगारी, आत्महत्या, नैराश्य, वादविवाद,असे वैयकटीक तथा सामाजिक व जागतिक अत्यंत भस्मासुरासारखे प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत.
आज आपण प्रगती केली व पुढे गेलो असे म्हणताना; whatsapp, युट्यूब, snapchat, instagram अश्या विविध सोशल साईट मधून नको ते ज्ञान युवा व बाल पिढीच्या हातात मिळू लागले आहे. आज त्यांना अगदी लहान वयात, प्रौढ चुकीची माहिती मिळू लागली आहे.
सेंद्रिय पोषक अन्न सोडून, इंजेक्शन युक्त मांसाहार, भेसळ दूध, रासायनिक पॅकफूड, फास्टफूड अगदी लहान पणापासून घराशेजारी मिळू लागले आहे. आपणच बाल हट्ट किंवा नाईलाज म्हणून त्यांना ही देतो. वर काही पैसे देण्याची आधुनिक पद्धत आपण सुरू केली.
हिंदू संस्कारी, शिष्टाचार युक्त संस्कृती जोपासणाऱ्या घरातील आजची नवीन पिढी,आज वैयक्तिक स्वातंत्र्य , उत्तम शिक्षण, आर्थिक सुबत्ता, स्वावलंबन या नावाखाली मनमानी वागू लागली आहे. ना मोठ्यांचा आदर, ना बोलण्यात शिस्त..! वर घर सोडून जाण्याच्या किंवा आत्महत्या करण्याच्या धमक्या देऊन आज ही दहशत माजवतात.
विभक्त किंवा स्वतंत्र जगताना मन मोकळे करता न येणे, वस्तुरूपी गोष्टींवर अवलंबून क्षणिक आनंद; यामुळे ती एकटी व व्यसनाधीन होत आहे.
आजच्या प्रगतीरूपी नरकसुराला मारायचे असेल तर, आपल्याला आता नियम, निर्बंध, मर्यादा, साधे जीवनमान व नैसर्गिक जीवनशैली जोपासणे गरजेचे आहे.
बघा एकदा विचार करून.. धन्यवाद..