27/11/2019
माणसांची माणूसकी जपणारा संवेदनशील डॉक्टर सन्मा. श्री. भाई वलटे सर, दुपारेपाडा ......*
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता खंबीरपणे उभे राहून परीस्थितीवर मात करायची आहे.चहूकडे अंधार दाटला असताना स्वप्रकाशाने वाट धुंडाळायची आहे.कुणाचे मागॅदशॅन नाही कि कौतुकाची पाठीवर थाप नाही . अश्या नाजूक स्थितीत शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही .याची पूरेपूर जाणीव मनात बालगून वाडा तालुक्यातील दुपारेपाडा सारख्या एका दुर्गम खेडेगावातून एक तरुण 40 वर्षापूर्वी शिक्षणासाठी मुंबईच्या महानगरात दाखल होतो. अश्या बिकट स्थितीतही केवळ ज्ञान ग्रहणाची अंतरीक जिद्द मनाशी बालगून हा तरुण अथक प्रयत्नाने डाॅक्टर होतो. लहानपणापासून पाहीलेली आपल्याच माणसांच्या आरोग्याची अक्षम्य हेलसांड दूर करण्यासाठी शिरीषपाडा नाक्यावर एका पत्र्याच्या शेडवजा ठिकाणी दवाखाना सुरू करतो.आसपासच्या गावातील कुणीही पेशंट रात्रीअपरात्री आला.रूग्णसेवेचे बिल मिलेलं वा नाही याची मनात विचार ही न करता उपचार करणे. अतिशय गंभीर रुग्ण असला तर त्याला स्वखर्चाने ठाणे - मुंबईत उपचारासाठी पाठवणे. अश्या निष्काम सेवेने हा डाॅक्टर गेली 25 वर्षे माणुसकीच्या रस्त्यावर चालत राहीला. म्हणतात ना कि प्रसिद्धीपासून दूर सवॅसामान्यांना त्यांच्या दुखदः प्रसंगी मदततत्पर तेही अनामिक रितीने. अबालवृद्धांशी मैत्रीपूर्ण सबंधाचं आपुलकीचं दृढघट्ट नातं.कोणत्याही समस्येवर सुयोग्य मागॅदशॅन करण्यास तत्पर .. वा तत्सम अश्याच येणाऱ्या अनेक कठीण प्रसंगात असणारी स्थितप्रज्ञता. ही माणसातला माणूस जिवंत असल्याची साक्ष देतात. अनं हे केवळ एका दिवसात पूर्ण होणे अशक्य त्यासाठी एक तप पूर्ण करावे लागते...
होय मी लिहतोय अशाच एका लपलेल्या तार्यांविषयी जो माणसांच्या माणूसकिचा जिवंत खळाळत वाहणारा झरा आहे..
*डाॅ. भाई वलटे*. दुपारेपाडा गावातील या व्यक्तिमत्त्वाने आज संपूर्ण वाडा तालुक्याला आश्वस्त व आपलसं केल आहे. माणसांच्या जखमांवर मलमपट्टी करतानाच या व्यक्तिने त्यांची दुःख आपलीसी करून घेतली. महिला सबलीकरण, कृषीविकास, ग्रामशिक्षण, क्रीडा,ग्रामसंस्कृती, आरोग्य अश्या अनेक समाजविधायक कामांना कुठल्याही राजकीय, आर्थिक व खंबीर बाजू नसताना जमेल तितके, जमेल तसे, जमेल त्यांना सोबत घेवून पूर्ण करायचा ध्यास घेतला आहे.
मागील अनेक वर्षांपासून पालघर जिल्हातील खेडोपाड्यात, वाड्यावस्त्यात डाॅक्टर असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून आरोग्यदूत बनवण्याचं निर्मल काम प्रसिद्धी पासून दूर राहून करत आहेत. स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्यावी म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, खादी ग्रामोद्योग विभाग यांच्या मदतीने शेळीपालन, कुक्कुटपालन,मधुमक्षिका पालन, दुग्धपालन यांची प्रशिक्षण शिबिर आयोजित केली आहेत लोकांची गरज लक्षात घेऊन शिरीषपाडा येथे आठवडी बाजार सुरू करण्यासाठी महत्वपूर्ण भुमिका बजावली आहे. स्वतः अष्टपैलू क्रिकेट खेळाडू असल्याने जिल्हाच क्रिडा संकुल असावं या मागणीसाठी डॉक्टरांनी अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा केला आहे. शिरीषपाडा येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्यामागे भाई वलटे सरांचीच प्रेरणा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या लहानांपासून थोरांपर्यंतच्या गुरूवर्याना व्यासपीठावर एकत्र करून त्यांचा सन्मान करण्याची प्रेरणाही वलटे सरांचीच. ग्रामीण विचार मंच या वटवृक्षाच्या छायेखाली सवाॅना सामावून घेवून तरुणांच्या अंगभूत क्षमतांना वाव मिळण्यासाठी संधी मिळावी यासाठी हे व्यासपीठ सरांनी उपलब्ध करून दिले आहे. स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थीना नेहमीच प्रोत्साहन सरांचे राहीले आहे. डाॅक्टरकी बरोबरच आपल्यातील नियोजनबद्धतेला बिल्डींग उभारणीत लावून आज शिरीषपाडा येथे भव्य निवासी व व्यापारी काॅम्लेक्स बांधले आहे.
अश्या या तार्यांने आपल्यातील क्षमतांना योग्य वेळी ओळखून सामाजिक बांधीलकीचा वसा निस्वाथॅपणे जिवंत ठेवला आहे.