27/03/2018
वाई हे प्रचीन काळापासून अत्यंत पवित्र समजले गेलेले क्षेत्र आहे. येथे प्राचीन काळी पांडव वनवासात रहात असत. भीमाने येथे कीचकास ठार मारले अशी कथा आहे.
येत्रे पुष्कळ घाट व देवळे आहेत. गहगापुरीच्या घाटापैकी पहिला दोनशे फुटांचा भाग गंगाधरराव रास्तयांनी 1789 मधे बांधला. याला भाऊ जोशी यांनी आणखी 76 फुटाची व दुसर्या बाजीरावाने ऐंशी फुटाची जोड दिली. जवळच गंगापुरी वाडा व उमामहेश्वर पंचायतानाचे देऊळ आहे. हे देऊळही रास्त्यांनी 1784 मध्ये बांधले. या मंदिराच्या चारी कोपर्यात विष्णु, लक्ष्मी, गणपती व सुर्याची मंदिरे आहेत. गंगारामेश्वराचे मंदिरही रास्त्यानी 1780 मधे बांधले. जवळच ढाकळेश्वर महादेवाचे देऊळ आहे. त्याच्यापुढे एक मोठा नंदी आहे. गणपतराव भिकाजी रास्ते यांनी 1762 साली 1,60,000/- खर्चून गणपतीचे प्रचंड देऊळ बांधले. जवळचा घाट गणपतरावांचा भाऊ आनंदराव भिकाजी रास्ते यांनी बांधला. गणपतीच्या देवळाची उंची सत्तर फूट आहे. सर्व देवळात उत्तम असे काशी विश्वेश्वराचे मंदिर आनंदराव रास्त्यानी 1757 मधे बांधले. या व अन्य काही देवळांवर मुसलमानी शिल्पांचा प्रभाव आहे. या देवळातील नंदीच्या गळ्यातील घंटा व फुले प्रेक्षणीय आहेत.
मंडईच्या पूर्वेला महालक्ष्मी मंदिर आनंदराव रास्त्यांनी 2,75,630 रू. खचे करून 1778 मधे बांधले. याच रास्त्यांनी 1774 मधे 2,16, 250 खर्चून विष्णु मंदिर बांधले. 1740 ते 1854 ज्या दरम्यान महादेवाची आठ मंदिरे बांधण्यात आली. 1785 मधे आनंदराव रास्त्यांनी बाधलेल्या घाटावर व्यंकोबा बाबाने 1861 साली एक दत्त मंदिर बांधले. भोरकरांच्या पणजीने ताईसाहेबांनी विठोबाचे देऊळ बांधले.
1789 मधे आनंदराव रास्त्यांनी मोतीबाग हा महत्वाचा वाडा बांधला. या वाड्यात सुरेख चित्रे होती. पेशव्यांनी कृष्णेच्या दुसर्या तीरावर जाण्यास एक पूल बांधला होता.
समर्थांनी येथे रोकडोबा मारूती येथे स्थापन केला.
वाईच्या दक्षिणेस अफजलखानाने ब्रह्मणाना वेठीला धरून आपला वाडाडा बांधला. एका बाजूला कृष्णा नदी व दोन बाजूनी ओढे अशा रितीने वाड्याच्या तिन्ही बाजूनी पाणी होते. वाड्याचा दगड किकलीतले देऊळ उद्ध्वस्त करून आणला होता.
1429 मधे दौलताबादच्या मालिक उत् तुजार नावाच्या बहामश्री सरदाराने रामोशी आणि खटावचे बंंडखोरांचा पराभव करून वाई घेतली. 1453 ते 1480च्या दरम्यान वाई बहामनी राज्याचे महत्वाचे लष्करी ठाणे होते.
1648 मधे अफजलखान हा विजापूरचा सुभेदार म्हणून येथे अंमल गाजवित होता. वध होण्यापूर्वी अफजलखानाचा सेनेसह येथे मुक्काम होता. अफजलखान वधानंतर वाई मराठ्याच्या ताब्यात आली.
1687 मधे विजापूरच्या शारजाखानाने वाईवर हल्ला केला. तेव्हा हंबीरराव मोहित्यांनी त्याचा पराभव केला, पण या लढाईत माहिते मात्र मारले गेले. 1690 साली राजारामाच्या कारकीर्दीत पुन्हा वाई जिंकली. कापशीच्या घोरपडे घराण्यातील संताजी घोरपडे यांनी राजारामांच्या कारकीर्दीतच वाई पुन्हा जिंकून घेतली. रामचंद्रपंतांचा मुतालिक शंकराजी नारायण येथील मुख्य अधिकारी झाला. नंतर वाई पेशव्यांच्या ताब्यात गेली. 1753 मधे राजारामाची बायको ताराबाई यानी 5000 रामोशी व मराठे यांचे सैन्य घेउन वाई काबीज केली. 1774 मधे राघोबादादाना मृत्यूदंड सुनावल्यानंतर पेशव्यांचे निस्पृह न्यायाधिश रामशास्त्री प्रभुणे वाईजवळ पांडव वाडीस येऊन राहिले. 1790 च्या सुमारास रास्ते येथे आले त्यानी येथे अनेक वाडे व देवळे बांधली. 1796 मधे आपल्या विरूद्ध बाजीराव व दौलतराव शिंदे यांची एकी झालेली पाहून वाईस मुक्काम ठोकला. पण पुढच्याच वर्षी हरिपंत फहके सैन्यासह आपल्याला पकडण्यास येत आहेत असे पाहून कोकणात पळ काढला.
1664 साली वाई प्रांत बाजी घोरपड्यांच्या ताब्यात हाता. तो त्याला मारून शिवाजी महाराजांनी घेतला. अफजलखान आल्यावेळी महाराजांचा हेर विश्वासराव दिघे बातम्या काढर्यासाठी येथे होता. खानाने आपली बायका मुले येथेच ठेवली होती. अफजलखानाचे वकिल कृष्णाजी भास्कर कुलकर्णी येथे राहणारे व अफजलखानाचे विश्वासू नोकर होते. येथूनच प्रतापगडावर बोलणी करण्यास खानाने त्याना पाठवले.
1776 मधे शिवाजी महाराजांनी वाईस वेढा दिलात्यांचा खिराच्या बागेत तळ होता. त्या वेळी वाईला कोट होता. वाई सर झाली. 1683 मधे संभाजी महाराजांशी लढताना येथे मरण पावला. 1689साली फितुरी केल्याबद्दल बक्षिस म्हणून औरंगजेबाने सूर्याजी पिसाळास येथील देशमुखी दिली 1690 मधे शंकराजी नारायणाने वाई काबीज केली. हैदरवर स्वारी करण्यास जाताना थोरल्या माधवरावांचा मुक्काम येथे होता. 1730 साली नानासाहेब पेशव्याचे रास्त्यांची मुलगी गोपिकाबाईंशी लग्न झाले.
वाईच्या उत्तरेस चार मैलावर लोहारे गावाजवळ आठ गुहा आहेत.
1818 दुसर्या बाजीरावाच्या कारकीर्दित ब्राह्मणाना दान दक्षिणा देण्यात खूप खर्च होई. सातारचे राज्य खालसा झाल्यावर ब्राह्मणात असंतोष पसरू नये म्हणून एलफिस्टनने येथे ब्रह्मणांची सभा बोलावून पूर्वीप्रमाणे दान दक्षिणा चाले राहिल असे आध्वासन दिले. स्वत: एलफिस्टनने येथे येऊन दानधर्म केला.

( साहित्य, नाटक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात नावारूपाला आलेल्या कोल्हटकरांचे मुळ पुरूष वाई येथेच प्रथम पुजापाठास आले. साहित्यीक वारसा महादेवशास्त्री यांच्या रूपाने सुरू झाला. मराठी भाषेतील पहिला छापील काव्यसंग्रंह जो 1860च्या आसपास प्रकाशित झाला त्याचे नाव प्राकृत कवितांचे पहिले मराठी पुस्तक असे आहे. यांच्या पुडील पिढ्यात वामनराव, श्रीपाद कृष्ण, अच्युत बलवंत, महाराष्ट्रमित्रकार गणेश नारायण, चिंतामणराव, चित्तरंजन, बाळ कोल्हटकर आणि दिलीप कोल्हटकर यांचा समावेश होतो. माझ्या नावाचा उल्लेख करण्याइतपत माझे कर्तृत्व नसले तरी मी याच घराशी संबंधित, असो.) संजय कोल्हटकर