27/01/2026
महाराष्ट्रातील सर्व पद्म-पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
आपल्या अपार कर्तृत्व, निष्ठा आणि समाजासाठी केलेल्या अमूल्य योगदानामुळे महाराष्ट्राची ओळख देश-विदेशात झाली आहे. विविध क्षेत्रांतून आपण दिलेले योगदान हे संपूर्ण राज्यासाठी अभिमानास्पद आहे.
आपल्या कार्यातून प्रेरणा घेऊन नव्या पिढ्यांना नवे स्वप्न पाहण्याची दिशा मिळते. महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणाऱ्या आपल्या या यशासाठी संपूर्ण महाराष्ट्र आपला ऋणी आहे. सर्व पद्म पुरस्कार प्राप्त विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!