26/07/2021
जुनी लोकं हुशार होती की नवी हेच कळत नाही...
हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील ,पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी स्लो किंवा हळू हळू निष्क्रिय होत जाते ....
त्यामुळे जुनी लोक केळीच्या पानावर जेवण घायचे कारण गरम भात किंवा इतर पदार्थ त्यावर टाकले की तो चिकट द्रव त्या अन्नातून पोटात जायचा ...
पण आज उलट झालंय प्लास्टिक व थर्मोकोल मुळे महा भयानक परिस्थिती ओढवत आहे, नाल्या जॅम होऊन पूर येत आहे...
शहरी भागात खेडोपाडी लग्नात प्लास्टिक कोटिंग पत्रावळी, द्रोण मग त्यात गरम पदार्थ टाकल्याने ते पोटात अन्न द्वारे जाऊन कॅन्सर वाढवत आहेत... कृपया वेळ आली आहे,
"जूनं ते सोनं " आहे, हे प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे सिद्ध झाले आहे ..
केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात.
- केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.
- केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात.
- त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.
सगळ्याच भारतीय परंपरा टाकाऊ नसतात. किंबहुना भारतीय परंपरांमागे असलेला निसर्गाचा आणि मानवी आरोग्याचा सूक्ष्म विचार पाहून शास्त्रज्ञही वेगळ्या दृष्टीकोनातून त्यांकडे पाहू लागले आहेत. भारतीय संस्कृती ही मुळातच निसर्गपूजक आहे. निसर्गपूजेतून निसर्गरक्षणाचा विचार त्यामागे आहे. आपल्या संस्कृतीत सूर्य, वारा, पाऊस अशा निसर्गातील शक्तींनाच देव मानून त्यांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृती ही निसर्गाचं ‘दोहन’ करायला शिकवते;’शोषण’ नव्हे. उदा. आपण गाईचं दूध तेवढं काढून घेतो, पण गाईला मारून टाकत नाही. गाईलाच मारून टाकणं हे झालं ‘शोषण’ आणि गाय जिवंत ठेवून दूध, गोमुत्र आणि शेण आपल्या उपयोगासाठी घेणं म्हणज़े ‘दोहन’. अशाप्रकारे निसर्गातील संसाधनांचा उपभोग घेताना त्यांची पुनर्भरण क्षमता अबाधित ठ