15/06/2020
*सुशांत सिंग राजपुत यांची बातमी तुमच्यापर्यंत पोहचली असेल, म्हणुनचं आवर्जून सांगेन की, आमचे कुबेर लेखक मित्र डाँ. अशोक माळी यांचा संकलित लेख कालचं थ्रेड मध्ये ट्विट केला आहे, एकदा नक्की वाचा...*
*मला कधी कधी आश्चर्य वाटतं की, आपण ज्यांना सर्वज्ञ, अभ्यासू आणि खंबीर व्यक्ती मानतो, आणि म्हणून आपण त्यांना गुरूही मानतो, अशी माणसंही एवढी अविचारी का होत असतील? जगात दुःखं आहेत, समस्या आहेत पण एखाद्याच्या आयुष्यापेक्षा त्या नक्कीच मोठ्या नाहीत...*
*कोणतंही दुःख किंवा समस्या ही आपल्या आयुष्याचा भाग असते, ते दुःख किंवा ती समस्या म्हणजे आपलं आयुष्य नसतं, हे आता आपल्याला कळलं पाहिजे...*
*काही काही लोक नवराबायको मध्ये पटत नाही, म्हणून आत्महत्या करायला उठतात, मी म्हणतो तुमचं पटत नाही ना, मग द्या ना सोडून, जीवन संपवण्यापेक्षा रिलेशन संपवा ना! संपवा रिलेशन आणि करा नवी सुरुवात...*
*जगात सगळं आपल्या मानासारखंचं कसं होईल? एखादा व्यवसाय, एखादी नोकरी आपल्याला लाभली नाही, तर आपण ती बदलतोच की! नातेसंबंधाचंही असंच असतं...*
*एखादं नातं नाही लाभलं, तर घाला माती आणि चाला पुढं, नवी नाती मिळतील तुम्हांला, जग खूप मोठं आहे...आणि नाही मिळाली तर एकट्यानं जगा... एकट्यानं जगा पण जगा...*
*काही लोक कर्जबाजारी झालो म्हणून आत्महत्या करतात, तुम्ही कर्ज काढता त्यावेळी तुमच्याकडे काही असेट्स असल्याशिवाय बँक तुम्हांला कर्ज देते का? विका ती मालमत्ता आणि नव्यानं सुरुवात करा...*
*काही मुलं परीक्षेत मार्क कमी मिळाले, म्हणून स्वतःला संपवतात तर कोणी आजाराला कंटाळून, मला एवढंच म्हणायचं आहे की, शिक्षण, मार्क्स हे आपल्याला आयुष्य चांगलं जगण्यासाठी उपयोगी असतात...*
*पण शिक्षण मिळालं नाही, तर माणूस जगूचं शकत नाही, असं थोडंच आहे? आपले आजी आजोबा कुठं शिकले होते? तरीही त्यांचं आयुष्य चांगलंच गेलं की!...आणि आजाराचं म्हणाल तर तुम्ही रस्त्यावर उतरलात की, तुम्ही कितीही काळजी घेतलीत, तरी एखादी धडक तुम्हांला बसू शकतेच! आजाराचंही तसंच आहे...*
*शरीर आणि मन आहे, म्हटल्यावर एखादी व्याधीही तुमच्या बरोबर येणार, डिप्रेशन येणार, एकदा हे मान्य केलं की, मग सगळं सोपं होऊन जातं, डिप्रेशन हाही एक आजारचं आहे, हा आजार आहे आणि यातून बरे होण्यासाठी आपण तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात कसलाही कमीपणा बाळगण्याचं कारण नाही...*
*सगळ्या आत्महत्यांच्या मागं एक गोष्ट असते, लोक काय म्हणतील? मी दहा वर्षे संसार करून बायकोला सोडलं, तर लोक काय म्हणतील? मी माझी जमीन विकली, तर लोक काय म्हणतील? बँकेनं लिलाव काढला तर लोक काय म्हणतील? मी नापास झालो तर लोक काय म्हणतील..?*
*लोक काय म्हणतील, या एका विचारानं माणसं आधीच निम्मी अर्धी मरतात, आणि याचा विचार करून करून मग एक दिवस खऱ्या अर्थानं मरतात...*
*आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, कोणतंही संकट हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नव्हे...*
*आज आपल्याला जी दुःखं मोठी वाटतात ना, काही वर्षांनी तुम्ही पाहाल ना, तर ती तुम्हांला एवढी क्षुल्लक वाटतील की, तुम्हीच तुमच्यावर हसाल...आणि जे लोक स्वतःची प्रतिमा जपण्यात मश्गुल असतात तेचं लोक अमहत्येचे जास्त बळी ठरतात...जीवनापेक्षा त्यांना प्रतिमा जास्त महत्वाची वाटते...*
*बाकी माणूस म्हणून सगळ्यांचे पाय मातीचेच! मला विचाराल, तर मी म्हणेन आत्महत्या हे कोणत्याचं समस्येचं उत्तर होऊ शकत नाही...तुमचं निर्भीड जगणं हे मात्र तुमच्या सर्वच समस्यांचं उत्तर ठरू शकतं...*
*©️डॉ.अशोक माळी, मिरज...*
Copy pest